english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
डेली मन्ना

बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश

Friday, 10th of November 2023
20 12 1591
Categories : Faith Fear
 मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती.” (लूक १९:२०)

लूक १९:२०-२३ मधील मोहरांचा दृष्टांत एक गंभीर वास्तविकता दर्शवते: न वापरलेली क्षमता ही देवाच्या राज्यात एक शोकांतिका आहे. तिसरा दास, भयग्रस्त आणि गैरसमजूत होऊन त्याने त्याची मोहर रुमालात दडवली होती. सेवेपेक्षा सुरक्षितता, गुंतवणुकीपेक्षा निष्क्रियता निवडणे.

१ योहान ४:१८ म्हणते, भीतीमध्ये शासन आहे, आणि हे ते शासन होते ज्याने तिसऱ्या दासाच्या कार्य करण्याच्या क्षमतेला बांधून ठेवले होते. धन्याची कठोरता आणि मागणी करण्याबद्दलची त्याची समज त्याला पक्षघाती करते, ज्यामुळे त्याने त्याची क्षमता वापरण्याऐवजी ती लपवली. अपयशाची ही भीती, अपेक्षांची पूर्तता न करणे हे आज अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये प्रतिध्वनित होते.

दासाचा त्याच्या धन्यावरील आरोप त्याच्या चारित्र्याबद्दलच्या सदोष समजुतीत मुळावलेला होता. त्याचप्रमाणे, देवाबद्दलचा विकृत दृष्टीकोन आपल्याला आपली वरदाने त्याच्या गौरवासाठी वापरण्याऐवजी लपविण्याकडे नेऊ शकते. तरीही, स्तोत्र. १०३:८ आपल्याला सांगते, “परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.”

जेव्हा धनी परत येतो, तेव्हा दासाचे समर्थन करणे हे त्याचा न्याय करणे होते. नीतिसूत्रे १८:२१ यावर जोर देते, ‘जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन आहे’ आणि खरोखरच दासाच्या स्वतःच्या शब्दांनीच त्याला दोषी ठरवले. कार्य करण्यात त्याचे अपयश, भय आणि आरोप करण्याद्वारे न्यायोचित झाले, परिणामस्वरूप संधी आणि बक्षीस गमावण्यात झाले.

धन्याचे कानउघाडणी करणे स्पष्ट आहे: कमीत कमी प्रयत्न देखील, जसे पैसे बँकेत ठेवणे, हे निष्क्रीयतेपेक्षा श्रेयस्कर ठरते. आपल्याला याकोब २:२६ ची आठवण करून दिली जाते. “म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रीयांवाचून निर्जीव आहे.” आपल्याला वाढीसाठी जे काही दिले आहे त्याची गुंतवणूक करून आपला विश्वास आपल्या कृतीतून दिसून येतो.

आपल्या प्रत्येकाला ‘मोहर’ दिली गेली आहे –प्रतिभा, वेळ, स्त्रोत –ही अपेक्षा करून की आपण त्यांची शहाणपणाने गुंतवणूक करणार आहोत. मत्तय २५:२३ आपल्याला हे दाखवते की ते जे त्यांच्या प्रतिभांना चांगल्या प्रकारे वापरतात त्यांना बक्षीस देण्यात देव आनंदित होतो-हे म्हणत, शाबाश, भल्या व विश्वासू दासा.”

तिसऱ्या दासापासून शिकवण आपल्याला धाडसी सेवा करण्यास पाचारण करते. २ तीमथ्य. १:७ आपल्याला आठवण देते की, “कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” धाडसीपणे व शहाणपणाने आपली वरदाने उपयोगात आणण्यासाठी आपल्याला सक्षम केले गेले आहे.

दासाच्या अपयशामुळे जागृत होत, देवाच्या सत्याशी जुळणाऱ्या शब्दांचे महत्व आपण शिकतो. इफिस. ४:२९ आपल्याला आग्रह करते की, “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.” आपल्या शब्दांनी आपला विश्वास आणि आपण ज्या देवाची सेवा करतो त्याचे चरित्र प्रतिबिंबित केले पाहिजे.

चला मग आपण भीतीपासून विश्वासाकडे, दोष देण्यापासून ते कृती करण्याकडे जाऊ या. गलती. ६:९ आपल्याला प्रोत्साहन देते की, “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” आपला सक्रीय विश्वास आणि सेवकपण हे आपल्याला आशीर्वाद आणि संधीच्या विपुल वाढीकडे नेऊ शकतात.

तिसऱ्या दासाची कथा ही एक सावधगिरीची कथा आहे, ती आपल्याला आग्रह करते की देवाने आपल्याला दिलेले मोठे कार्य पूर्ण करण्यापासून आपल्याला भीती किंवा खोट्या समजुतींना रोखू देऊ नका. त्याऐवजी, आपल्याला आपली मोहरे उघडण्यास पाचारण केलेले आहे, आणि राज्याच्या कामात त्यांची गुंतवणूक करा, आपल्या धन्याचा चांगुलपणा आणि कृपेवर विश्वास ठेवत.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमची वरदाने भीतीपासून मुक्त, अशी तुझ्या गौरवासाठी उपयोगात आणण्यास आम्हांला समर्थ कर. तुला स्पष्टपणे पाहण्यास आणि तुझ्या सत्यास प्रतिध्वनित करणारे जीवनाचे शब्द बोलण्यास आम्हांला मदत कर. आम्ही धाडसी सेवक व्हावे, तुझ्या राज्यासाठी आमच्या मोहरांची गुंतवणूक करणारे व्हावे असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● देवासारखा विश्वास
● आपल्या निवडींचा प्रभाव
● तुमच्या रांगेतच राहा
● धन्यवाद आणि स्तुतिचा दिवस (दिवस १९)
● शर्यत धावण्यासाठी योजना
● बीज चे सामर्थ्य-१
● विश्वसनीय साक्षी
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन