देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६, KJV)
काही वर्षापूर्वी, दक्षिण वेल्सच्या टेकड्यांमधून जात असताना, एका तरुण आईला अंधार्या, प्रचंड हिमवृष्टीने गाठले, आणि त्या धडपडीत तिचा जीव गेला. तथापि, मृत्यूच्या आधी तिने तिचे सर्व बाह्य वस्त्र काढून आपल्या मुलाला त्याने गुंडाळले असल्याचे समजले. आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा बाळाला त्या वस्त्रांतून काढले गेले, तेव्हा ते बाळ जिवंत आणि व्यवस्थित होते. तिने आपल्या शरीराखाली त्या बाळाला घेतले आणि मातृत्वाचा गहण प्रेमळपणा दाखवत आपल्या लेकरासाठी तिने आपला प्राण दिला.
काही वर्षांनंतर, तो मुलगा, डेव्हिड लॉयड जॉर्ज, प्रौढ होऊन ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान झाला, आणि यात काही शंका नाही की तो इंग्लंडच्या महान राजकर्त्यांपैकी एक होता. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने आपला प्राण दिला नसता तर हे शक्य झाले नसते. हे अत्यंत त्यागाचे प्रेम होते. तिने देण्याद्वारे प्रेम व्यक्त केले!
त्याचप्रमाणे, मोठ्या संदर्भामध्ये, योहान ३:१६ हे वचन दर्शविते की देवाने त्याचा पुत्र येशु ख्रिस्त यास आपल्यासाठी देऊन कसे त्याचे आपल्यासाठी असलेले प्रेम शेवटी दाखविले. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला...”. त्याने त्याच्यासाठी असलेली सर्वांत मोल्यवान गोष्ट दिली— ती म्हणजे त्याचा पुत्र! त्याने असेच काहीतरी दिले नाही , तर त्याने आपला एकुलता एक पुत्र बलिदान केला.
जणू ते पुरेसे नाही की, तेच वचन आपल्याला देवाच्या अफाट प्रेमाला व्यक्त करण्याबद्दल अधिक दाखवते. त्या वचनातून आपल्या हे दिसते की ज्या कारणासाठी देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला बलिदान केले ते त्याच्या फायद्यासाठी देखील नव्हते; ते आपल्यासाठी होते: ह्यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.
हे अँमी कार्मिकलच्या शब्दांची पुष्टी करते: “ प्रेम न करता आपण देऊ शकता परंतु न देता आपण प्रेम करु शकत नाही.” देवाने स्पष्टपणे बलिदान करण्याद्वारे आपले प्रेम प्रकट केले, स्वत:साठी नाही किंवा स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, परंतु इतरांसाठी. तो एवढ्या दुर गेला की तुमचा व माझ्या नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे. हे खरच खुप आश्चर्यकारक आहे .
देवाने आपल्याला उदाहरण दिले आहे की लोकांकडून घेण्यात प्रेम नाही; परंतु त्यांच्यापर्यंत पोहचण्यात आहे; ते केवळ भावणेपुरते नाही, तर ते देण्यात आहे, ते आपल्यासाठी काय करु शकतात यामध्ये नाही, तर आपण त्यांच्यासाठी काय करु शकतो यामध्ये आहे. प्रेमात आपण इतरांची काळजी घेणे याचा समावेश जसे की त्यांचे चांगले असावे अशी आपली इच्छा असावी.
जरी त्यांनी आपल्याला संपर्क केला नाही तरीही त्यांना संपर्क करा. ते आपल्यासाठी प्रार्थना करीत नाही हे माहीत असताना देखिल त्यांच्यासाठी प्रार्थना करा.ते कधीच परत करणार नाही हे आपल्याला माहीत असता काही अन्नाचा भाग त्यांना पाठवा. कारण परमेश्वर सर्वकाही पाहतो.
आपल्याला लोकांकडून काय मिळेल फक्त हेच असु देऊ नका. तर देवाने त्याचा पुत्र आपल्यासाठी देऊन आपल्यासाठी असलेले त्याचे प्रेम कसे प्रकट केले याची आठवण करा. आपले आयुष्य जग असताना, इतरांसाठी आशीर्वादाचे कारण होऊन त्यांच्याप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.
Most Read
● छाटण्याचा समय● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
● तुमच्या मनाला धैर्य दया
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● तुमचा गुरु कोण आहे - I
● लोकांचे पाच गट येशूला भेटले # 1