ख्रिस्ती म्हणून, देवाच्या वचनाला अत्यंत आदर आणि काळजीपूर्वक हाताळण्यासाठी आपल्याला पाचारण केलेले आहे. बायबल हे केवळ कोणतेही साधारण पुस्तक नाही; ते प्रेरित, निष्कलंक आणि जिवंत देवाचे अचूक वचन आहे. तो एक आधारपाया आहे ज्यानुसार आपण आपले जीवन घडवतो आणि सत्याचे स्त्रोत आहे जे ख्रिस्ताबरोबरच्या आपल्या चालण्यात आपल्याला मार्गदर्शन करते. त्यामुळे हे महत्वाचे आहे की आपण देवाच्या वचनाकडे नम्रतेचा दृष्टीकोन ठेवावा आणि त्याच्या संदेशात काहीही जोडणे किंवा वगळण्यावाचून त्याचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा ठेवावी.
देवाचे वचन जतन करण्याचे महत्व
अनुवाद ४:२ मध्ये, आपल्याला आज्ञा दिली आहे, “जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका.” हे वचन देवाच्या वचनाच्या अखंडतेचे जतन करण्याच्या महत्वावर जोर देते. जेव्हा आपण वचनात काही जोडतो किंवा त्यातून काही काढून टाकतो, तेव्हा आपण प्रामुख्याने प्रत्यक्ष देवाच्या वचनात बदल करत आहोत, जो एक गंभीर गुन्हा आहे.
नीतिसूत्र पुस्तक आपल्याला देवाच्या वचनाशी छेडछाड करण्याच्या विरोधात चेतावणी देते : ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे; त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील” (नीतिसूत्रे ३०: ५-६). वचनात सुधारणा करण्याच्या प्रयत्नाने, आपण हे सुचवतो की देवाचे वचन कसेतरी चूक किंवा अपूर्ण आहे, जे गर्व आणि उद्धटपणाचा प्रकार आहे.
देवाच्या वचनात बदल करण्याचे परिणाम
जेव्हा आपण देवाच्या वचनात बदल करतो, तेव्हा आपण त्याचे सामर्थ्य आणि अधिकाराला नष्ट करतो. जसे यिर्मया संदेष्ट्याला समजले, देवाच्या वचनाला त्याच्या पूर्णतेत सांगितले पाहिजे, काहीही न गाळता किंवा बदल करता. यिर्मया २६:२ मध्ये, देवाने संदेष्ट्याला उपदेश दिला, “एकही शब्द गाळू नकोस.” संदेश कमी करण्याने किंवा बदलण्याने, ते जे ऐकत आहेत त्यांच्या जीवनावरील त्याची छाप आणि प्रभावाला आपण कमी करतो.
याशिवाय, देवाच्या वचनात बदल करणे हे आध्यात्मिक गोंधळ आणि फसवणूक करू शकते. जेव्हा एदेन बागेत हव्वा सर्पाद्वारे प्रलोभनात पडली, तेव्हा तिने देवाच्या आज्ञेतून महत्वाचा तपशील वगळला आणि त्यात भर घातली, हे म्हणत, “..देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल” (उत्पत्ती ३:३). देवाचे वचन अचूकपणे प्रतिनिधित करण्यात चुकण्याने, हव्वेने सर्पाच्या फसवणुकीसाठी आणि मानवाच्या पतनासाठी द्वार उघडले.
देवाच्या वचनाकडे नम्रतेने जाणे
जेव्हा आपण बायबलचे अध्ययन करतो, तेव्हा हे महत्वाचे आहे की आपण नम्र आणि शिकवण्यायोग्य आत्म्याने त्याकडे जावे. आपण हे ओळखले पाहिजे की आपली समज ही मर्यादित आहे आणि देवाच्या सत्याची गहनता समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. जसे यशया ६६: २ आपल्याला स्मरण देते, “पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.” जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे आदर आणि आश्चर्याने जातो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला ज्ञान व समज प्राप्त करण्यास योग्य स्थितीत आणतो जे केवळ तोच प्रदान करू शकतो.
देवाचे वचन परिश्रमपूर्वक अध्ययन करण्याचे सामर्थ्य
आपण पवित्र शास्त्र किती वाचले आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आपण आपल्या अध्ययनाच्या गुणवत्तेला देखील प्राधान्य दिले पाहिजे. बायबलचे प्रत्येक वचन गहन सत्य आणि समजेने भरलेले आहे जे आपले जीवन परिवर्तीत करू शकते. देवाच्या वचनावर मनन करण्यासाठी वेळ काढण्याने आणि त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करण्याने, आपण त्यास आपल्या हृदयात रुजू देतो आणि आपल्या जीवनात फळ निर्माण करू देतो.
जसे स्तोत्रकर्त्याने घोषित केले, “तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे” (स्तोत्र. ११९:१०५). जेव्हा आपण वचनात मग्न होतो आणि आपल्या प्रत्येक पावलांना त्यास मार्गदर्शन करू देतो, तेव्हा आपण आनंद आणि शांतीचा अनुभव करू जो देवाच्या इच्छेनुसार चालण्याने येतो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र वचनात आनंद करण्यासाठी आणि ते जतन करून ठेवण्यासाठी मला ज्ञान प्रदान कर. असे होवो की मी नेहमीच तुझे सत्य समजून घेण्यासाठी वचनाकडे आदराने आणि नम्रतेने पाहावे. तुझ्या वचनात बदल करणे किंवा त्यास नष्ट करण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी मला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा● तुमच्या रांगेतच राहा
● दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● मनुष्यांची परंपरा
● विश्वासात स्थिर उभे राहावे
टिप्पण्या