आता आपण आपला अभ्यास बीज चे सामर्थ्य यामध्ये पुढे चालू ठेवत आहोत, आज, आपण विविध प्रकारचे बीज पाहणार आहोत.
३. शक्तिशाली व योग्य
लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करिते, व त्याला बडया लोकांसमोर नेते. (नीतिसूत्रे १८:१६)
प्रत्येक पुरुष व स्त्री मध्ये, परमेश्वराने शक्ति व विशेष योग्यता ठेवल्या आहेत त्यांना सुद्धा बीज असे म्हटले जाते. परमेश्वराने ही शक्ति जगाच्या लाभाकरिता प्रत्येकामध्ये ठेवली आहे. आता सध्या पृथ्वीवर ७.५ अब्ज लोक आहेत, परंतु प्रत्येक जन हा विशेष, एकमेव व वेगळा आहे. आपली शक्ति व योग्यता ही जगासाठी देवाचे बक्षीस आहे.
आपली शक्ति व योग्यता हे बीज चे महत्त्व आहे जे देवाने आपल्या प्रत्येकामध्ये ठेवले आहे, की येथे पृथ्वीवर त्याचे अंतिम कार्य पूर्ण करावे. नेहमीच हे लक्षात ठेवा की तुमच्या स्वतःचे स्वप्न हे विशेष बीज आहे जे तुम्ही इतरांच्या अंत:करणात पेरत आहात. जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न बीज इतरांना सांगता, कधीकधी, ते उत्साहित होतात व भारावून जातात. काही हे कदाचित ते ऐकण्यास सुद्धा तयार नसतात व कदाचित तुमचा अस्वीकार सुद्धा करतात. अनेक वेळा हेच ते लोक असतील जे तुमच्याजवळ असतील.
जर तुम्ही असा अस्वीकार अनुभव केला, तर तुम्ही स्वतःला अलिप्त नाही केले पाहिजे. तुमच्या स्वप्नाला नष्ट करू नका. एक ज्ञानी शेतकरी जाणतो की बीज पेरण्याअगोदर त्याच्या शेताला अधिक तयार करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे, ते जे तुमच्याभोवती आहेत त्यांची मने व अंत:करणास सुद्धा कदाचित तुम्हाला तयार करावे लागेल. संयमी राहा.
योसेफाने त्याचे स्वप्न त्याच्या भावांना सांगितले आणि त्यांनी त्यासाठी त्याचा द्वेष केला (उत्पत्ति ३७:८). काही लोकांना ही वास्तविकता आवडणार नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक प्रगति करीत आहात व तोच विचार की वाढ होत आहे हे ऐकणे कदाचित त्यांना आवडणार नाही. ज्यावर पूर्णपणे भरंवसा ठेवता येईल अशा कोणाला जरी तुम्ही मिळवू शकला, तर मग पुढे जा व त्यास सांगा परंतु तुमचे स्वप्न प्रत्येकास सांगू नका जे तुमच्या सहवासात येतात.
४. आर्थिक व साधनसंपत्तीचे बीज
आपले आर्थिकता व साधनसंपत्ति प्राप्त करणे ही सुद्धा बीज आहेत. जेव्हा आपण त्यागमयीरित्या देवाला व त्याच्या राज्यासाठी दानधर्म करतो किंवा इतर जे गरजे मध्ये आहेत त्यांना देतो, त्यास बीज असे म्हणतात. बीज हे फळ व झाडे एवढयापर्यंतच सीमित नाही. फळे व झाडे आपल्याला उत्तम समज देतात की बीज कसे कार्य करते.
जोपर्यंत आपण पैसे हे बीज म्हणून बहुगुणीत होण्यासाठी पेरीत आहोत हे पाहण्यास सुरुवात करीत नाही, अद्भुत पुरवठा हा अनेकांसाठी एक रहस्यच राहून जातो. देवाचा माणूस केनेथ ई. हागीन ने म्हटले, की येथे विश्वासाचे असे काही क्षेत्र नाही की आर्थिकते साठी देवावर भरवसा ठेवण्यापेक्षा ते ख्रिस्ती लोकांना अधिक अवघड असे वाटते. त्याने हे सुद्धा म्हटले की जेव्हा ख्रिस्ती व्यक्ति आर्थिक बीज पेरण्यास शिकतो व उपज ची अपेक्षा करतो, आर्थिकतेसाठी देवावर भरंवसा ठेवतो अचानकपणे ते अधिक सोपे होते.
अंगीकार
पित्या, जी शक्ति व योग्यता तूं माझ्यामध्ये ठेवली आहे त्यासाठी मी तुझा धन्यवाद करतो. माझा पैसा हे बीज आहे. जेव्हा मी ते पेरणार आहे तेव्हा मी महान आर्थिक नवीन वाटचाल पाहणार आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चुकीचे विचार● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● यातना-मार्ग बदलणारा
● अद्भुततेस जोपासणे
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● जिवासाठी देवाचे औषध
टिप्पण्या