डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०६
Friday, 17th of December 2021
38
1
2191
Categories :
उपास व प्रार्थना
अद्भुत कर्ज रद्द करण्यास
काही ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्रातील अभिषिक्त शिकवण ऐकल्यावर सुद्धा त्याच पेच-प्रसंगात राहतात ज्यास सामर्थ्य आहे कीत्यांची जीवने बदलावी. आत्ताच निर्णय घ्या की तुम्ही त्यातील एक नसाल. जे तुम्ही शिकला आहात ते आचरणात आणण्यात चुकणे हे निष्फळ परिणाम निर्माण करतात.
महत्वपूर्ण: पुढील गोष्टीसाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही उपास करीत नाहीत.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
२ राजे ४:१-७
मत्तय १७:२४-२७
पुढील तीन भविष्यात्मक सुचना तुम्हाला कर्जातून बाहेर काढतील आणि सर्वात महत्वाचे, ते तुम्हाला कर्जा पासून दूर ठेवतील.
भविष्यात्मक सुचना #१
तुम्हांसजेकोणाला देणे आहे ते प्रत्येक बिल, ऋण व कर्ज याची यादी करा.
तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असतां तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? (लूक १४:२८)
तुम्ही प्रत्यक्षात किती देणे आहे हे जाणणे महत्वाचे आहे.
परमेश्वर हा दैवी व्यवस्था व सव्विस्तर ब्योरा चा परमेश्वर आहे.
दैवी व्यवस्था ही चमत्कारासाठी पूर्वापेक्षित आवश्यकता आहे. येशूने लोकसमुदायाला भाकर व दोन मास्या द्वारे चमत्कारिकरित्या तृप्त करण्याअगोदर त्यांना पन्नास पन्नास च्या गटात बसावयास लावले. (लूक ९:१४-१७)
भविष्यात्मक सुचना #२
त्या यादीवर हात ठेवा व प्रार्थनेच्या मुद्द्यावर उपासाच्या उरलेल्या दिवसात प्रार्थना करा. तुम्ही प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी १२ वेळा किंवा अधिक वेळा वारंवार बोलला पाहिजे.
१. आर्थिक दुष्काळाचे दुष्ट चक्र, मी तुझे सामर्थ्य माझे जीवन, माझे कुटुंब, व माझ्या वित्तीयतेवर येशू ख्रिस्ताच्या नांवात मोडत आहे.प्रत्येकबिल, ऋण व कर्ज हे चमत्कारिकरित्या येशूच्या नांवात भरले जाईल.
२. येशूच्यारक्ता, माझे वित्तीय व संपत्तीला नष्ट करणारी प्रत्येक सैतानी शक्ति येशू ख्रिस्ताच्या नांवात काढून टाक.
३. पित्या, येशूच्या नांवात,मला व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना आध्यात्मिक जळू पासून वेगळे कर. (नीतिसूत्रे ३०:१५)
४. माझे वित्तीय, संपत्ति व कमाविण्याच्या माझ्या स्त्रोत ला जी दुष्ट शक्ति रोखून आहे येशूच्या नांवात काढून टाकली जावो.
५.हे परमेश्वरा फायद्याविना परिश्रम व संभ्रमातून येशूच्या नांवात मलामुक्त कर.
६. माझ्या जीवनावरील कर्ज व गरिबी चे प्रत्येक वांशिक बंधन हे येशूच्या रक्ता द्वारे येशूच्या नावात रद्द केले जावो.
७. येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे मी धार्मिक ठरविला गेलो आहे, म्हणून दुष्टाच्याधनाने मला आत्ता शोधावे, येशूच्या नांवात. (नीतिसूत्रे १३:२२ वाचा)
८. संपन्नता व आशीर्वादाचे दैवी द्वार आत्ता माझ्यासाठी येशूच्या नांवात उघडले जावो.
९. पित्या, मला दैवी साहाय्यकाबरोबर जोड, येशू ख्रिस्ताच्या नांवात.
१०. मला व माझ्या कुटुंबाला दिले गेलेले प्रत्येक वाईट पैसे किंवा संपत्ति जे माझ्या वित्तीयते मध्ये अडथळा निर्माण करीत आहे, मी तुला पवित्र आत्म्याच्या अग्निसह पूर्णपणे अस्तित्वातून काढून टाकीत आहे, येशूच्या नांवात.
११. परमेश्वरा, ज्या मार्गाने मी गेले पाहिजे त्याचा उपदेश मला दे व मला शिकीव. तुझ्या नेत्रांनी मला मार्गदर्शन कर (स्तोत्र ३२:८). आतापासून माझा प्रत्येक निर्णय हा पूर्णपणे तुझ्या आत्म्याने प्रभावित असेल, येशूच्या नांवात.
भविष्यात्मक सुचना #३
करुणा सदन सेवाकार्यात सहकारी व्हा (किंवा इतर कोणत्याही सेवाकार्यात जे देवाचे कार्य करीत आहे). मीहे यासाठी लिहित नाही की आम्ही तुमच्याकडून काही पैसे प्राप्त करावे.
सहयोग करणे हे अभिषेक मोकळा करतो जे तुमच्या जीवनावरील गरिबीच्या बंधनाला मोडेल. जर तुमची संपन्नता ही केवळ तुमच्या स्वतःसाठीच आहे तर तो स्वार्थीपणा आहे.
दया म्हणजे तुम्हाला परत देण्यात येईल, त्यासहलवाकी जागा निर्माण करावीकी अधिक भरावे. विपुलता तुमच्यावर इतक्याओतप्रोत प्रमाणात ओतली जाईल कीती भरून वाहील! उदारतेचे तुमचे मोजमाप हे तुमच्या पुन्हा प्राप्तीचे मोजमाप होते." (लूक ६:३८ टीपीटी)
विपुलता हे ओतप्रोत वाहण्याचे मोजमापजे मोकळे होते जेव्हा तुम्ही देता. दान देणे हे अंत:करणाचे कार्य आहे व ते लोभ व स्वार्थीपणाच्या आत्म्यापासून मुक्त करते. लोभ, हाव व स्वार्थीपणाच्या आत्म्यावर उपाय करण्यास इतर कोणताही मार्ग नाही.
अंगीकार
कृपा करून जितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता तितक्या वेळा हे म्हणत राहा
२०२१वर्षी व येणाऱ्या २०२२वर्षी जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे,तो निराश होणार नाही! माझ्याकडेपुरेसे असेन की माझ्या गरजा पूर्ण कराव्या व पुष्कळ असेन की जे गरजे मध्ये आहेत त्यांना दयावे, येशूच्या नांवात.
(टिपा: लक्षात घ्या परमेश्वर तुम्हाला स्वप्ने, दृष्टांत व क्रियाशील कल्पने द्वारे गोष्टी दाखवेल जे तुम्हाला साहाय्य करेल की कर्जातून मुक्त व्हावे. कृपा करून त्यानुसार कार्य करा.)
टिपा: पास्टर मायकल व पास्टर अनिता हे आज (१७.१२.२०२१), त्यांच्या वैवाहिक जीवनाचा २२वा वाढदिवस साजरा करीत आहेत, म्हणून कृपा करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला तुमच्या उपास व प्रार्थने मध्ये आठवण करा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● यासाठी तयार राहा!
● असामान्य आत्मे
टिप्पण्या