ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल." (स्तोत्र. ९०:१२)
नवीन वर्ष २०२४ सुरु होण्यासाठी आता केवळ अडीच महिने राहिले आहेत. हे वर्ष किती वेगाने संपले आहे. कोणीतरी एकदा म्हटले होते, "वेळ आणि लाट कोणासाठीच थांबत नाही." घड्याळाचा प्रत्येक ठोका लक्ष वेधणारा आहे, या पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वाच्या मर्यादित स्वरुपाची आठवण करून देणारा आहे.
बायबल आपल्याला इशारा देते, "म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत." (इफिस. ५:१५-१६)
स्पष्ट प्राप्ती किंवा वाढीशिवाय दिवस, आठवडे आणि अगदी महिने आपल्या जीवनातून बोटांमधून वाळूच्या कणांसारखे निसटून जाऊ देणे सोपे आहे. जसे प्रेषित पौल इफिस मध्ये सुचवितो, आयुष्यातील आपले चालणे हे हेतू आणि ज्ञानाने भरलेले असले पाहिजे. २०२४च्या आगमनाने आपल्याला खोलवर विचार करायला लावले पाहिजे. आपण आपले आयुष्य आपल्या दैवी उद्देशासह समरूप करून जगत आहोत का?
नेहमी, आम्ही आवाज, कार्ये, आणि विनंत्यांनी वेढलेले असतो जे आमचे लक्ष वेधून घेतात. पण त्यांनी मागणी केलेल्या वेळेला ते पात्र आहेत का? जर आपण सावध राहिलो नाही, तर आपण स्वतःला देवाच्या इच्छेपासून दूर असलेल्या दिशेने खेचले जाण्याच्या शक्यतेमध्ये पाहू शकतो.
"हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत ........ ." (स्तोत्र. ३१:१४-१५)
लक्षात ठेवा, आपला वेळ हे दैवी दान आहे आणि त्यास तसे हाताळणे हे महत्वाचे आहे. हेतुपुरस्सर राहणे हे आपला वेळ स्वीकारणे आहे, वास्तवात अगदी आपली जीवने, ही सर्वशक्तीमानाच्या हातात आहेत. प्रत्येक क्षण जो आपल्याला दिला आहे तो त्याचे राज्य वाढवण्यासाठी संधी आहे.
वर्ष संपत असताना, याचा विचार करा: तुमची उद्दिष्टे देवाने तुमच्यासाठी मांडलेल्या भव्य योजनांशी जुळतात का? जेव्हा आपण आपल्या महत्वाकांक्षा दैवी उद्देशासाठी समरूप करतो तेव्हा आपण सांसारिक साधनेतून अतुलनीय पूर्तता आणि शांतता अनुभवतो.
देवाच्या योजना आपल्यासाठी प्रीती, आशा आणि संपन्नतेमध्ये मुळावलेल्या आहेत. हे मग, तेव्हा महत्वाचे होते की जगाच्या कोलाहल आणि गोंधळात त्याचा आवाज ओळखावा. ही ओळख आपल्या मार्गावर मार्गदर्शन करण्यास मदत करते, याची खात्री करत की आपली उद्दिष्टे आपल्यासाठी त्याच्या इच्छेला प्रतिबिंबित करतात.
शक्यतो, हेतुपुरस्सर जगण्याच्या सर्वात आव्हानात्मक पैलूंपैकी एक म्हणजे "नाही" बोलणे आहे. प्रत्येक संधी ही देवाकडून दिलेली नसते. आणि प्रत्येक व्यक्ति जो आपल्या संपर्कात येतो याचा अर्थ असा नाही की तो आपल्यासोबत आपल्या दैवी नशिबापर्यंत प्रवास करणारा आहे. "पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, "तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो." (१ शमुवेल १६:७)
हे वचन दिशानिर्देशक होऊ दे. जग वरवरच्या आणि मोहक गोष्टींना महत्त्व देऊ शकते, परंतु देव मनुष्याच्या मनात आणि गोष्टींमागील हेतू पाहतो. ऑफर, नातेसंबंध किंवा संधी नाकारण्याचे धैर्य ठेवा जे तुमच्यासाठी देवाच्या योजना आणि उद्देशांशी जुळत नाहीत.
प्रार्थना
पित्या, नवीन वर्ष संपण्यास सुरु होताच, आम्हांला तुझ्या उद्देशाने स्थिर कर. घड्याळ्याच्या प्रत्येक ठोक्याने तुझा दैवी हेतू आमच्या हृदयात प्रतिध्वनित होऊ दे, ज्याने आम्हांला केवळ ते मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे, जे तुझ्या नावाचे गौरव करतात. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे हृद्य तपासा● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
● सापांना रोखणे
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● विसरलेली आज्ञा
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● किंमत मोजणे
टिप्पण्या