डेली मन्ना
देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
Saturday, 15th of June 2024
25
21
713
Categories :
पुरवठा
इस्राएली लोकांनी एके दिवशी कुत्सितपणे देवाला हा प्रश्न विचारला, "रानात भोजनाची व्यवस्था करण्यास देव समर्थ आहे काय?" (स्तोत्र ७८:१९). त्या प्रश्नाला उत्तर हे निश्चितपणे "होय" असे होते! वास्तवात स्वर्गातील मान्ना त्यांच्या परिसरात सहा दिवस दररोज सकाळी पडत राहिला. "इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नांव मान्ना ठेविले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती" (निर्गम १६:३१).
पुन्हा जेव्हा इस्राएल लोकांनी मान्ना ऐवजी मांस खाण्याची इच्छा केली, परमेश्वराने उत्तर दिले, "परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तूं आतां पाहशील" (गणना ११:२३).
ह्यावचनानंतर परमेश्वराने पाठविले, "नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणिले; ते छावणीवर व छावणीसभोवती इतके आले की, छावणीच्या मागे व पुढे एक एक दिवसाच्या मजलेपर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे दोन हात उंचीचा थर जमला. लोकांनी उठून तो सगळा दिवस सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले; ज्याने सर्वांत कमी गोळा केले त्याचे दहा होमर भरले; आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चाऱ्ही बाजूंस पसरून ठेविले." (गणना ११:३१-३२)
चमत्कार थांबला नाही. इस्राएल लोकांनी जी वस्त्रे व पायतण घातली ते कधीही जीर्ण झाले नाहीत, ना ही त्यांच्या पायास कधी सूज आली नाही." (नहेम्याह ९:२१). ही कृत्ये ही अद्भुत पुरवठ्याची कृत्ये आहेत.
हे सर्व वाचल्यावर अनेक ख्रिस्ती लोकांना वाटते की, "ओह, निश्चितच! मी विश्वास ठेवतो पण ते फार पूर्वी मागे कधी घडले होते!" त्यांच्यापैकी एक असे होऊ नका. तुमच्या विश्वासाला डळमळू देऊ नका जेव्हा तुमच्या स्वतःच्या पुरवठ्यासाठी व्यक्तिगतरीत्या परमेश्वरावर भरंवसा ठेवावा लागतो. कृपा करून जे मी आता सांगणार आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दया: "परमेश्वराची समर्थता की तुमच्यासाठी पुरवठा करावा हा तुमच्या अंत:करणामध्ये प्रकटीकरणा द्वारे जन्म घेतला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या अभिषेक द्वारे ते आले पाहिजे.
येथे ते आहे जे तुम्हीं करावे असे मला पाहिजे. पुढील सात दिवस, अद्भुत पुरवठ्या संबंधातील पवित्र शास्त्र वचने वाचत राहा. माझे शब्द लक्षात ठेवा, गोष्टी ह्या तुमच्या जीवनात घडू लागतील. जेव्हा हे तुमच्यासाठी कार्य करते, तेव्हा तसे आयुष्यभर करीत राहा, व इतरांना सुद्धा शिकवा.
मी विश्वास ठेवतो की आपण शेवटल्या दिवसांत राहत आहोत. महासंकट येण्यापूर्वी बायबल "प्रसूतिवेदना" विषयी भविष्यवाणी करते (मत्तय २४:८). तरीही पवित्रशास्त्र व इतिहास हे दोन्हीही प्रगट करते की चांगल्या वेळी व कठीण वेळी परमेश्वर समर्थ आहे, की तुमच्यासाठी अद्भुतरित्या पुरवठा करावा!
प्रार्थना
पित्या, अद्भुत पुरवठ्यावर मी तुझे वचन स्वीकारीत आहे. तूं बदलला नाहीस. तूं काल, आज व सदासर्वकाळ सारखाच आहेस. तूं माझा पुरवठा करणारा आहेस. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अग्नि हा पडला पाहिजे● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● भविष्यात्मक मध्यस्थी
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मी प्रयत्न सोडणार नाही
● तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
टिप्पण्या