"सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो."(नीतिसूत्रे १३:२०)
लोक जे आपल्या सभोवती आहेत त्यांच्याद्वारे आपण मोठया प्रमाणात प्रभावात येतो. तुम्ही त्यासारखे लोक होता ज्याबरोबर तुम्ही अधिक वेळ घालविता, म्हणून तुमचे मित्र काळजीपूर्वक निवडा.
जर तुम्ही रागीष्ट व संताप करणाऱ्या लोकांची निवड कराल तर तुम्ही स्वतःला रागीष्ट, संताप करणारे होण्याचा धोका घेत आहात. ते ह्याकारणासाठी की आचरण हे संसर्गजन्य आहे.
पवित्र शास्त्र सांगते की जर मुर्खा भोवती तुम्ही स्वतःला घेरून राहता, तर त्यांचा मूर्खपणा हा तुम्हांवर कार्य करेल. जेव्हा शलमोन कोणाला मूर्ख म्हणत आहे, तो हे म्हणत नाही कीव्यक्ति हा अज्ञानी आहे. त्याऐवजी असे आहे की हा व्यक्ति सत्याविषयी विचार करीत नाही आणि केवळ त्यांच्या स्वतःच्या समाधानावर केंद्रित आहे. ते मूर्खपणाने विश्वास ठेवतात की त्यांच्या जीवनासाठी उत्तम ते काय आहे. ते सर्व चुकीच्या गोष्टींमध्ये पूर्णतेचा शोध घेतात.
कोणी सुज्ञा सोबत कसे चालावे?
सुज्ञासोबत चालण्याचा एक मार्ग हा त्यांची पुस्तके व त्यांच्या जीवनावरील कथा वाचने आहे. ज्यामार्गावरून ते गेले आहेत त्या मार्गावर चाला आणि त्यांना त्यांचे उत्तम वसुज्ञ विचार तुम्हाला सांगू दया. तुम्ही त्यांच्या चुका, यश वरून शिकाल.
कोणीतरी म्हटले आहे, "पुढारी हे वाचणारे आहेत."
तुम्ही सुज्ञासोबत त्यांचे ऐकण्याद्वारे सुद्धा चालू शकता. तेथे जा जेथे जाण्यास ते तुम्हाला सांगत आहेत.इंटरनेट, किंवा रेकॉर्ड केलेले माध्यम वगैरे द्वारेत्यांचेऐका. कोल्हापूर वरून एका पाळकाने मला लिहिले. त्याने ते डब्लू ३ परिषद मध्ये त्याची साक्ष दिली होती जी मागे झाली होती. त्याने म्हटले, पास्टर, मी सतत तुमचे संदेश ऐकत असतो व तुमचे साक्षीचे विडीओ युट्युब वर पाहत असतो. माझा विश्वास वाढू लागला आणि माझे चर्च हे ३०० पेक्षा अधिक लोकांनी वाढले आहे.
शेवटी,कधीही होणार नाही असा सर्वात सुज्ञ मनुष्य-प्रभु येशू ख्रिस्ता बरोबर चालण्याचे विसरू नका. त्याच्याबरोबर दररोज प्रार्थना व वचना द्वारे संगती करा. पुढील वचन काळजीपूर्वक वाचा:
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासांत होते हेही त्यांनी ओळखले. (प्रेषित ४:१३)
प्रार्थना
पित्या, मला त्या लोकांद्वारे घेऊन ठेव जे माझ्या जीवनावरील तुझ्या पाचारणास पूरक ठरतील. मला त्या लोकांद्वारे घेरून ठेव जे तुझ्या अंत:करणाचा ठाव घेतात. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● उपासनेच्या चार मुख्य गोष्टी
● वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● तुमचे हृद्य तपासा
टिप्पण्या