आपण आपल्या शृंखलेत राहू: यहूदा च्या जीवनाकडून धडा
पवित्र शास्त्र काहीही लपवीत नाही. बायबल सर्व काही स्पष्ट करते की, "शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले आहे." (रोम १५: ४)
यहूदा च्या जीवनाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे-प्रभु येशूचा एक सर्वात निकटचा प्रेषित ज्याने शेवटी त्यास फसविले.
आणखी एक कारण की यहूदा का चुकला:
२. कबुली न केलेले पाप
कबूल न केलेले पाप नेहमीच आपल्या जीवाच्या शत्रूला द्वारे उघडते-सैतानाला.
जेव्हा स्त्री जिने अलाबास्त्र बुधली मधून येशूच्या मस्तकावर तेल ओतले, यहूदाला राग आला आणि त्याने हे वाक्य बोलले की असे वाया घालविणे टाळता येऊ शकले असते आणि तो पैसा गरिबांना देता आला असता.
आता त्याने (यहूदा) नेअसेयासाठीम्हटले नाही कारण त्यास गरिबांची काळजी होती परंतु याकारणासाठी की तो चोर होता; आणि त्याच्याकडे थैली [पैशाची थैली किंवा बारा शिष्यांच्या पैशाची थैली]होती आणि जे काही त्यात टाकीत असत ते तो स्वतःसाठी काढून घेत असे.(योहान १२: ६)
जसे मी अगोदर उल्लेखिले आहे, पवित्र शास्त्र मनुष्यांचा कमकुवतपणा लपवीत नाही परंतु त्याउलट त्यास उघडे करते म्हणजेमनुष्याने पश्चाताप करावा आणि त्याच्या मार्गावरून मागे वळावे.
स्पष्ट आहे की यहूदाला 'पैशावर प्रेम' होते(१ तीमथ्यी६: १०). त्यामुळेसैतानाने त्याच्या अंत:करणात बालेकिल्ला बनविला होता.
यहूदा ने पाहिले होते की येशू शोमरोनी स्त्री बरोबर बोलला होता जी व्यभिचारी जीवन जगत होती आणि तिचे जीवन आता बदलले होते. त्याने हे सुद्धा पाहिले होते की सर्वात वाईट पापी लोकांबरोबर सुद्धा येशूने कसा व्यवहार केला होता.
येशूला त्याच्या अशक्तपणा बद्दल तो फार सहजपणेबोलू शकला असता आणि खात्रीने प्रभूने त्यास त्यावर मात करण्यास साहाय्य केले असते. परंतु यहूदा ने नेहमीच विषयाला लपविले होते आणि नेहमीच तो स्वतःला ते दाखविण्याचे ढोंग करत होता जे तो नव्हता.
बायबल हे स्पष्ट करते. "जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते." (नीतिसूत्रे २८: १३)
यहूदाच्या कबूल न केलेल्या पापांनी सैतानाला द्वार उघडले होते.
मग सैतान यहूदा इस्कर्योत मध्ये घुसला. (लूक २२: ३-४)
यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून दयावे असे सैतान घालून चुकला होता. (योहान १३: २)
हा तो यहूदा होता ज्याने सैतानाला द्वार उघडे केले होते, आणि प्रभूला फसविण्यात त्याचा शेवट झाला.
पहिले योहान १: ९ म्हणते, "जर आपण आपली पापें पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील." आज, का नाही येशूला तुमचा अशक्तपणा सांगावे. तो नक्कीच कृपा पुरवेल की त्यावर मात करावी.
प्रार्थना
१. पित्या, मीमाझा अशक्तपणा तुझ्याजवळ कबूल करतो.(असे करीत काही अधिक वेळ घालवा.)
२. पित्या, मला तुझे ज्ञान व कृपा पुरीव, की आज तयारी करावी ज्यास मला उद्या तोंड दयावे लागेल. जसे तू योसेफाला साहाय्य केले की विपुलतेच्या वेळी जमा करून ठेवावे कीदुष्काळावेळी राखून ठेवावे. जसे मुंगी हिवाळ्यासाठी तयारी करते आणि जमा करून ठेवते, मला ती दूरदृष्टि दे. भविष्याचे नुकसान करण्याऐवजी आजच्या विलासी जीवनात राहण्यास मी नकार देत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
२. पित्या, मला तुझे ज्ञान व कृपा पुरीव, की आज तयारी करावी ज्यास मला उद्या तोंड दयावे लागेल. जसे तू योसेफाला साहाय्य केले की विपुलतेच्या वेळी जमा करून ठेवावे कीदुष्काळावेळी राखून ठेवावे. जसे मुंगी हिवाळ्यासाठी तयारी करते आणि जमा करून ठेवते, मला ती दूरदृष्टि दे. भविष्याचे नुकसान करण्याऐवजी आजच्या विलासी जीवनात राहण्यास मी नकार देत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वचन प्राप्त करा● प्रीति साठी शोध
● प्रीतीची भाषा
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● बीज चे सामर्थ्य - २
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे
टिप्पण्या