डेली मन्ना
सुटकेचा दिवस (दिवस १०)
Tuesday, 21st of December 2021
235
13
4721
Categories :
उपास व प्रार्थना
कृपा करून हे लक्षात घ्या की पुढील प्रार्थना ह्या रात्रीच्या वेळी म्हणावयाच्या आहेत (रात्री ०.०० वाजता किंवा पहाटे) जर तुम्हाला अधिकतम परिणाम व जलद परिणाम पाहावयाचे असतील.
स्तुति व उपासने द्वारे सुरुवात करा. काही वेळ (कमीत कमी १० मिनिटे) परमेश्वराची उपासना करीत घालवा. (उपासनेचे काही गीत गा किंवा सौम्य संगीत वाजवा की तुम्हाला उपासना करण्यास साहाय्य करावे.)
तुमच्या स्वतःला, तुमच्या घराला, तुमच्या संपत्तीला, तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
पापकबुली: स्तोत्र ९१ (मोठयाने म्हणा)
पित्या, मी तुझा धन्यवाद करतो की (माझे कुटुंब, माझी सेवा वगैरे) परात्पराच्या गुप्त स्थळी निवास करावे, व मी सर्वसमर्थाच्या सावलीत राहावे.
मी परमेश्वरा विषयी धैर्याने म्हणेन, "तो माझा आश्रय, व माझा दुर्ग आहे; माझा देव, त्याच्यामध्ये मी भरंवसा ठेवीन."
खात्रीने तो मला पारध्याच्या पाशापासून व घातक मरीपासून माझा बचाव करील.
तो मला पाखर घालील, त्याच्या पंखाखाली मला आश्रय मिळेल; त्याचे सत्य मला ढाल व कवच आहे.
रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी,
ह्यांची मला भीति वाटणार नाही.
माझ्या बाजूस सहस्त्रावधि पडले, माझ्या उजव्या हातास लक्षावधि पडले, तरी ती मला भिडणार नाही;
मात्र माझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ माझ्या दृष्टीस पडेल.
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून मी परात्पराला निवासस्थान केले आहे.
म्हणून कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही,
कारण माझ्या सर्व मार्गात माझे रक्षण करण्याची माझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
माझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते मला आपल्या हातावर झेलून धरितील.
मी सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालेन. त्याच्यावर माझे प्रेम आहे, म्हणून तो मला मुक्त करीन; मला त्याच्या नांवाची जाणीव आहे म्हणून तो मला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.
मी त्याचा धावा करील तेव्हा तो मला उत्तर देईन; संकटसमयी तो माझ्याजवळ राहीन; तो मला मुक्त करीन; तो मला गौरव देईल.
मला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; व त्याचे तारण मला दाखवेल.
(टीप: जर तुमच्या घरात/ऑफिस मध्ये काही वाईट वस्तू आहेत व परमेश्वराने ते तुम्हाला विशेषेकरून दाखविले आहे तर मग त्यास फेकून दया. मी पुन्हा बोलतो: जर परमेश्वराने ते तुम्हाला दाखविले आहे.)
४० दिवसांची बायबल वाचन योजना
2 थेस्सलनीकाकरांस ३; 1 तीमथ्याला १-५
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
पवित्र आत्म्याचा अभिषेक जो प्रत्येक ओझे जे माझ्या जीवनावर पडत आहे त्यास मोडतो येशूच्या नांवात.
माझी प्रगती व माझ्या कुटुंबाची प्रगती त्या सर्व सैतानी साखळ्या रोखत आहेत त्या तुटल्या जाव्यात येशूच्या नांवात.
माझ्या विरुद्ध, माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध प्रत्येक शाप, प्रत्येक जादू, प्रत्येक मंत्रतंत्र, प्रत्येक नकारात्मक शब्द जे लागू केले गेले आहे ते येशूच्या रक्ता मध्ये सामर्थ्यात मोडले जावो.
माझ्या विरुद्ध, माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध व माझ्या संपत्तीच्या विरुद्ध जादूटोणा व चेटूक चे प्रत्येक मूळ व फळ हे अग्निद्वारे येशूच्या नांवात जळून जावो.
जिवंतांच्या भूमि मध्ये परमेश्वराच्या चांगुलपणाचा आनंद घेण्यापासून जी प्रत्येक शक्ति मला अडथळा करीत आहे ती पवित्र आत्म्याच्या अग्निद्वारे येशूच्या नांवात जळून जावो.
प्रत्येक सैतानी शक्ति, मला अशुद्ध करीत आहे व माझ्या स्वप्नाला दूषित करीत आहे मी तुम्हाला येशूच्या नांवात बांधीत आहे.
प्रत्येक दुष्ट करार मी, अनिता, अहरोन, अबीगईल यांनी कदाचित कोणत्याही जिवंत किंवा मृत गोष्टीशी केला असेन, येशूच्या नांवात, आत्ता अग्निद्वारे मोडला जावो (तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांची नांवे घ्या)
प्रत्येक करार जर मी, अनिता, अहरोन, अबीगईल यांनी कदाचित येशू शिवाय कोणत्याही इतर गोष्टीशी केला असेन, येशूच्या नांवात, आत्ता अग्निद्वारे मोडला जावो (तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांची नांवे घ्या)
हे परमेश्वरा, मला माझ्या अंतिम मुक्कामाची गुप्तता येशूच्या नांवात दाखव.
येशूच्या नांवात, व येशूच्या रक्ता द्वारे, माझ्या जीवनावरील प्रत्येक नागमोडी समर्पण मी मोडत आहे.
माझी आध्यात्मिक वाढ व प्रगतीच्या विरोधात कार्य करणारी प्रत्येक वाईट शक्ति, अग्निद्वारे नष्ट होवो येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मानवी हृदय● एका उद्देशाने जन्म घेणे
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● परमेश्वरा सोबत चालणे
● यातना-मार्ग बदलणारा
● प्रार्थनेचा सुगंध
● भविष्यवाणीचा आत्मा
टिप्पण्या