डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०३
Tuesday, 14th of December 2021
58
14
3713
Categories :
उपास व प्रार्थना
संपूर्ण बायबल मध्ये, इतर कोणत्याही रक्ताला, येशूच्या रक्ता शिवाय "मूल्यवान" असे मानलेले नाही (१ पेत्र १:१९). प्रभु येशूने आपल्या तारणासाठी मोठी किंमत भरली आहे आणि किंमत ही "त्याचे स्वतःचे मूल्यवान रक्त" होते.
येशूच्या मूल्यवान रक्ताचे अद्भुत लाभ त्यांना आहेत ज्यांनी येशू ख्रिस्ता मध्ये त्यांचा प्रभु व तारणारा असा विश्वास ठेवला आहे.
येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे लाभ- I
१. शुद्ध करणे
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागीता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते. (१ योहान १:७)
प्रकाशात चालणे याचा अर्थ हा नाही की आपण सिद्धपणे चालत आहोत. याचा अर्थ सरळपणे त्याच्यापासून काहीही न लपविता त्याच्यासमोर चालणे होय. येशूचे रक्त मग अशा लोकांच्या शुद्धतेसाठी उपलब्ध आहे.
२. तारण
तारण याचा अर्थ पुन्हा विकत घेणे. आपल्याला सैतानाच्या नियंत्रणाखाली पापाच्या गुलामगिरीत विकले गेले होते. जेव्हा येशूने त्याचे रक्त आपल्या पापांसाठी वाहिले, आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त केले गेले. तुम्ही व मी येशूच्या रक्ता द्वारे विकत घेतलेले आहोत. आता, तुम्ही व मी त्याचे आहोत.
त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुति व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. (इफिस १:७)
३. सुटका व संरक्षण
मृत्यूचा दूत जेव्हा मिसर देशावरून जात होता, कोकऱ्याच्या रक्ताने इस्राएली लोकांना निश्चित मृत्युपासून संरक्षण दिले. (निर्गम १२)
त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीति केलीनाही. (प्रकटीकरण १२:११)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की सैतान व त्याची भुताटकीसेना वर येशूच्या रक्ता द्वारे व आपल्या स्वतःला पूर्णपणे ख्रिस्ताच्या अधीन करण्याद्वारेप्रभुत्व करता येऊ शकते.
अंगीकार
प्रार्थना: प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
१. मी माझ्या स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रक्ता मध्ये बुडवितो: मी माझ्या आत्म्याला आवरण घालतो: येशूच्या रक्ता सह सदसदविवेकबुद्धी, अंतर्ज्ञानव उपासना.
२.मी माझ्या जिवाला आवरण घालतो: सदसदविवेकबुद्धी, अर्धवट शुद्धित व बेशुद्ध: येशूच्या रक्ता सह मन, भावना व बुद्धि.
३.मी माझ्या पाच ज्ञानेंद्रियांना आवरण घालतो: येशूच्या रक्ता सह पाहणे, ऐकणे, वास, चवव स्पर्श.
४. मी माझ्या शारीरिक शरीराला आवरण घालतो:येशूच्या रक्ता सह मेंदू, शारीरिक सवयी, व लैंगिक गुणधर्म.
५. येशूच्या रक्ता मध्ये मी माझे जीवन व शेवटच्या मुक्कामास बुडवितो.
६. येशूचे रक्त, आता माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागात खोलवर प्रवाहित होवो व येशूच्या नांवात खोलवर शुद्धता, सुटका व आरोग्य देवो.
७. येशूच्या नांवात, मी माझ्या स्वतःवर व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर येशूचे रक्त लावतो.
८.मी माझ्या सर्व दरवाजांचा बाह्यभाग व सर्व संपत्तीलायेशूच्या रक्ता सह आवरण घालतो. (निर्गम १२:१३)
९. येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे मी सैतानावर विजय मिळविला आहे (प्रकटीकरण १२:११) [तुमच्या स्वतःला व तुमच्या कुटुंबाला तेलाने अभिषेक करा.]
१०. मी येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडतो व बहुगुणीत कृपा व शांति प्राप्त करतो. (१ पेत्र १:२)
११.सनातन कराराच्या रक्ता द्वारे मी सिद्ध केला गेलो आहे. (इब्री १३:२०-२१)
१२. परमेश्वराच्या सान्निध्यात येण्यास मला येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे धैर्य आहे. (इब्री १०:१९)
१३.माझी सदसदविवेकबुद्धी हीनिर्जीवकृत्यांपासून शुद्ध केली आहे की जिवंत परमेश्वराची सेवा येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे करावी. (इब्री ९:१४)
१४.येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे मला तारण आहे व वाईटाच्या सामर्थ्यापासून मी तारण पावलो आहे. (इफिस १:७)
१५. काही वेळ परमेश्वराची उपासना करा. येशूच्या रक्ता विषयी तुम्ही उपासनेचे एक गीत गाऊ शकता.
Join our WhatsApp Channel
Most Read
● छाटण्याचा समय-३● वरील आणि समानांतर क्षमा
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● परमेश्वरा सोबत चालणे
● परमेश्वराचा धावा करा
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
टिप्पण्या