डेली मन्ना
या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद कसा अनुभवायचा
Wednesday, 1st of January 2025
24
18
144
Categories :
आनंद
माझा आनंद तुम्हांमध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला हया गोष्टी सांगितल्या आहेत." (योहान १५:११)
या वर्षाचा प्रत्येक दिवस आपण त्याच्या आनंदाची परिपूर्णता अनुभवून उपभोगता यावा ही परमेश्वराची मनसा आणि इच्छा आहे. कारण त्याची किंमत त्याने आधीच चुकविली आहे.
प्रश्न आता हा आहे की, आपण परमेश्वराचा आनंद आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग कसा बनवू शकतो? येथे दोन सरळ दृष्टीकोन आहेत:
#१. परमेश्वरासोबत वेळ घालवा
परमेश्वर सर्व आनंदाचा झरा आहे. सर्व आनंद त्याच्यापासून उत्पन्न होतो. म्हणून, जर तुम्हाला दररोज आनंदाचा अनुभव करावयाचा आहे, तर तुम्ही नियमितपणे परमेश्वर, जो जीवनाचा झरा त्याच्यासोबत वेळ घालविला पाहिजे. आपल्यापैंकी काही जणांनी अनुभवाने आधीच हे शिकले असेन की ज्या दिवशी तुम्ही परमेश्वरासोबत वेळ घालविला नाही, तेव्हा तो दिवस निराशा व अत्याचाराने भरलेला असतो.
स्तोत्रसंहिता ४३:४ मध्ये, दावीद म्हणतो, "म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन."
आपण दाविदाच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आणि देवाबरोबर त्याचे वचन आणि प्रार्थनेद्वारे सहभागीता केली पाहिजे. कितीही मालमत्ता, पार्टी, किंवा लोक आपल्या जीवनात असा आनंद निर्माण करू शकत नाहीत. जेव्हा मी देवाबरोबर वेळ घालवितो, मी नेहमी काही हळुवार आणि तल्लीन करणारे संगीत चालवितो. तुम्हीही तसे करू शकता.
#२: परमेश्वराला तुमचे ओझे सांगा.
बऱ्याचवेळा, आपण आपले ओझे लोकांना सांगतो. कधीकधी हेच लोक तुमचे ओझे काही अप्रिय लोकांना सांगतात आणि नंतर संपूर्ण गोष्ट ही एक ओझे होऊन जाते. तथापि, अनुभवाने मी एक गोष्ट शिकलो आहे की आपण जेव्हा आपले ओझे देवाला सांगतो आणि ते त्याच्या चरणाजवळ ठेवतो, तो ते आपल्यावतीने उचलतो. असे केल्यानंतर, मी असा वेगळाच आनंद अनुभविला आहे, ज्याचे वर्णन करणे कठीण आहे. माझी खात्री आहे की आपल्यापैंकी अनेक जणांनी असा अनुभव केला असेन.
"त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता [तुमच्या सर्व निराशा, तुमच्या सर्व चिंता आणि तुमचे सर्व विचार सर्व काही एकदाच त्यावर] टाका कारण तो तुमची काळजी घेतो [अत्यंत जिव्हाळ्याने, आणि तुमच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवतो]. (१ पेत्र ५:७)

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने मला आनंद व शांतीने भर की मी आशेने भरून जाऊ शकावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्या गोष्टी कार्यरत करा● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● अंतिम रहस्य
● अन्य भाषेत बोला व प्रगती करा
● सुवार्ता घेऊन जाणारे
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
टिप्पण्या