डेली मन्ना
धन्यवाद आणि स्तुतिचा दिवस (दिवस १९)
Thursday, 30th of December 2021
53
12
2177
Categories :
उपास व प्रार्थना
धन्यवाद व स्तुतीचे दिवस
१ शमुवेल ७:१२ मध्ये, आपण वाचतो की संदेष्टा शमुवेल ने एक दगड घेतला, व मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभा केला आणि त्यास एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.
आपल्या जीवनात, सुद्धा हे महत्वाचे आहे की, स्मरण देणारे दगड (किंवा वेळ) असावेत, संदेष्टा शमुवेल सारखे, की आपल्याला त्याची आठवण दयावी ज्या महान गोष्टी देवाने आपल्या जीवनात केल्या आहेत.
जेव्हा वर्ष २०२१ हे शेवटास जात आहे, तुम्ही परमेश्वराला धन्यवाद दयाल. जर शक्य असेल (होय तसे आहे), तर संपूर्ण दिवसभर धन्यवाद दया. येथून पुढे कोणत्याही परिस्थिती विषयी कुरकुर किंवा तक्रार करण्यास नकार करा.
परमेश्वराची उपासना करीत काही वेळ (कमीत कमी १० मिनिटे) घालवा.
(उपासनेची गीते गा किंवा सौम्य संगीत वाजवा की उपासनेत तुम्हाला साहाय्य करावे.)
पुढील वर्ष (२०२२) हे भीतीदायक असे दिसत आहे, परंतु येथे आशा आहे कारण बायबल आपल्याला सांगते की, "कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील." (फिलिप्पै ४:६-७)
तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांकरिता त्या प्रत्येकाचे नांव घेऊन परमेश्वराला धन्यवाद दया (त्यांचे सुद्धा ज्यांना तुम्ही समोरासमोर पाहत नाहीत). मला ठाऊक आहे यास अधिक विश्वासाची गरज लागते परंतु मी तुम्हाला सांगतो तसे करणे अत्यंत योग्य आहे.
परमेश्वराला तुमच्या...........साठी धन्यवाद दया
नोकरी किंवा व्यवसाय इत्यादी
भारत देश
इस्राएल देश
अशा प्रकारे करीत राहा
जर तुम्ही करुणा सदन सेवाकार्याचा हिस्सा आहात, तर मग पुढारी, उपासना वगैरे साठी धन्यवाद दया (जर तुम्ही इतर कोणत्याही चर्च/सेवाकार्या चा हिस्सा आहात तर मग पुढारपण साठी परमेश्वराला धन्यवाद दया.) हे तुम्हाला स्वास्थ्य व पुनर्स्थापना आणेल.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
१ थेस्सलनी ५:१८
इफिस ५:२०
स्तोत्र ११८
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा.
मी जिवंत अस्तित्वाबरोबर जुडतो की एक जो राजासनावर बसलेला आहे त्यास गौरव व सन्मान दयावा, एक जो युगानुयुग जिवंत आहे. आमेन. (प्रकटीकरण ४:९)
हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो की तूं नेहमीच माझे ऐकतो जेव्हा मी तुला हाक मारतो. तूं विश्वसनीय आहे. तूं प्रार्थनेचे उत्तर देणारा परमेश्वर आहे.
पित्या, मला घोषणा करणारा बनीव, तक्रार करणारा नाही, येशूच्या नांवात.
भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. (स्तोत्र १३९:१४)
मी परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे. (स्तोत्र १०७:१)
भविष्यात्मक कार्य:
जर परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन देतो की करुणा सदन सेवाकार्याच्या सुपीक जमिनीत धन्यवादाचे दानार्पण पेरावे, तर मग तसे करा. तुमचे दान तुमच्या हातात वर धरा, परमेश्वरासमोर हलवा व तुमच्या दानावर पुढील प्रार्थना संपूर्ण दिवसभर म्हणा आणि मग तेव्हाच ते पाठवा.
"परमेश्वरा, तूं तो परमेश्वर आहे जो स्मरण ठेवतो. असे होवो की माझ्या बी ने तुझ्या कृपेच्या राजासनासमोर बोलावे. तूं मला आश्वासन दिले आहे की माझ्या प्रीतीचे परिश्रम विसरणार नाही. येशू ख्रिस्ताच्या नांवात मी माझे पीक प्राप्त करतो. आमेन."
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे● तुमचे खरे मूल्य शोधा
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● दिवस १६ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● भविष्यात्मक गीत
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● सन्मानाचे जीवन जगा
टिप्पण्या