जर तुम्हाला पाहिजेकी तुमच्या जीवनाची दखल घेतली जावी आणि ते मूल्यवान असावे, एक आध्यात्मिक नियम जो तुम्हाला तुमच्या जीवनात घेण्याची गरज आहे तो म्हणजे संबंधाचा नियम.तुम्ही कोणीही असू शकता किंवा कोणत्याही पदावर असू शकता, हा नियम प्रत्येकांसाठी कार्य करेल. हे म्हणायची गरज नाही की, हा नियम तुम्हाला एक साधक बनवेल की उत्कृष्टता आणि भरभराटीच्या स्तरात तुम्हाला घेऊन जाईल.
सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्टपावतो. (नीतिसूत्रे १३: २०)
बायबल चे वरील वचन संबंधाचा नियम इतक्या स्पष्टपणे दाखविते. सरळ शब्दात बोला, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये उभे आहात, जेव्हा ते तुमच्यापेक्षा बुद्धिमान असे आहेत, त्यांचे ज्ञान हे तुमच्यावर प्रभाव करेल आणि तुमचे जीवन हे घडेल. दुसऱ्या मार्गाने, जर तुम्ही मुर्खाबरोबर राहण्याची निवड केली, तुमचे जीवन छिन्नविच्छिन्न होईल.
बायबल आपल्याला इशारा देते हे म्हणत, "...विपन्न, कर्जबाजारी, व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याजपाशी जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्यापाशी जमले." (१ शमुवेल २२:२)
१. निराशा
२. कर्जबाजारी
३. असमाधानी
सार्वत्रिक शब्दात बोलायचे म्हटल्यास, जेव्हा व्यक्तीकडेत्याच्या जीवनात वरील तीन गोष्टी आहेत, हे सर्व काही संपलेले आहे. फार कठीण आहे कोणी पुन्हा उठेन जेव्हा हे नष्ट करणाऱ्या ह्या ३गोष्टी त्यांच्या जीवनात आहेत. तथापि, हे सर्व काही बदलले, जेव्हा ते देवाचा अभिषिक्त मनुष्य, दावीद बरोबर संबंध ठेवू लागले. दावीद बरोबर त्यांच्या संबंधाने त्यांना अशा प्रकारचे मनुष्य बनविले जे १ इतिहास १२:८ मध्ये वर्णन केले आहे, "अरण्यातील गढीत राहणारे गादी लोकांतले शूरवीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल, व बर्ची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरीणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले."
हा नियम कोणाबरोबर सुद्धा कार्य करेल आणि वाढ व आशीर्वाद आणेल जर आपण हेतुपूर्वक आपल्या स्वतःला त्या लोकांसोबत जोडतो जे देवाच्या मार्गात आणि जीवनात आपल्यापेक्षा अधिक परिपक्व असे आहेत.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते [यरुशलेम मधील धार्मिक पुढारी] आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. (प्रेषित ४:१२)
पुनरुत्थित प्रभु बरोबर भेट झाल्यानंतर आणि माडीवरील खोलीत पवित्र आत्म्याशी संपर्क आल्यानंतर, येशूच्या शिष्यांनी अक्षरशः त्यांच्या जगाची उलथापालथ केली होती. त्यांच्या वेळचे तथाकथित लोक ज्यांच्याकडे सामर्थ्य होते ते आश्चर्य करीत होते याकडे गांगरून पाहत होते परंतु लवकरच त्यांनी हे जाणले कीहे सर्व काही शक्य झाले कारण ते येशूच्या सहवासात होते. त्यावेळचे परुशी आणि सदुकी लोकांनी सहवासाचा नियम समजला आणि आता खूप वेळ झाली आहे की आपण सुद्धा त्यास आत्मसात करावे.
साधारण शिष्य हे जग बदलणारे झाले कारण येशू बरोबरच्या त्यांच्या कराराच्या संबंधामुळे-तुम्ही आणि मी सुद्धा असे करू शकतो. आपण सुद्धा आपले यश, आपला अभिषिक्त स्तर, आपले प्रार्थनामय जीवन इत्यादी, ज्ञान व विजयाच्या लोकांसोबत सहवास करण्याद्वारे वेगवान करू शकतो.
अंगीकार
मी ज्ञानी लोकांसोबत चालेन आणि ज्ञानी होईन. परमेश्वर मला त्या लोकांशी जोडत आहे जे परिपक्व आणि ईश्वरीय असे आहेत.अभिषेक जो त्याच्याशी मला जोडून ठेवतो तो येशूच्या नांवात मजवर आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● ख्रिस्ता समान होणे
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● उत्तमतेच्या मागे लागणे
● कालेबचा आत्मा
टिप्पण्या