शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. (१ थेस्सलनीका. ५:२३)
मला तुमची ओळख पवित्र शास्रामधील सामर्थ्यशाली रहस्याशी करावयाची आहे जे तुमचे आध्यात्मिक, शारीरिक व भावनात्मक आरोग्यास पूर्णपणे एका नवीन स्तरावर वाढवेल-यास दानीएलाचा उपास म्हणतात.
दानीएलाचा उपास काय आहे?
दानीएल अध्याय १० च्या प्रारंभी, आपण पाहतो की दानीएलाने तीन आठवड्यांचा कालावधी हा उपास व प्रार्थनेचा विशेष वेळ म्हणून वेगळा केला होता. अनेक ख्रिस्ती लोक जो उपास त्याने केला त्यास "दानीएलाचा उपास" असे म्हणतात. त्याने पूर्णपणे भोजन करणे सोडले नव्हते, परंतु त्याने तो आहार घेतला होता ज्यामध्ये केवळ फळ व पालेभाज्या होत्या. त्याने मांस खाल्ले नाही व मद्य प्याले नाही. (दानीएल १०:२-३)
त्याच्या उपासामध्ये, तो इस्राएल लोकांच्या वतीने देवासमोर शोक करीत होता, जे बाबेल साम्राज्यात बंदिवासात होते.
दानीएलाच्या उपासाचा कालावधी
दानीएलाचा उपास २८ ऑगस्ट २०२२ ते ३ सप्टेंबर २०२२ पर्यंत (७ दिवस) सुरु राहतो.
दानीएलाच्या उपासाच्या कालावधीमध्ये मी काय भोजन करू शकतो?
पुढील भोजन असे आहे की ज्यांना मधुमेहाचा आजार आहे ते देखील उपासामध्ये सहज भाग घेऊ शकतात.
पेय
केवळ पाणी- उपासा दरम्यान नियमितपणे अधिक पाणी प्या.
नारळ पाणी व पालेभाज्यांचे सूप देखील घेऊ शकता.
चहा किंवा कॉफी नाही.
सोडा, पेप्सी इत्यादी सारखे ऑक्सिजन मिश्रित पेय नाही.
कोणतेही ऊर्जा देणारे पेय, चॉकलेट किंवा साखरेचे पदार्थ नाही.
अनेक जण चहा व कॉफीचे व्यसनी आहेत आणि प्रत्यक्षात त्यांना वाटते की ते त्याच्यावाचून जगू शकत नाही. देवाचे वचन सांगते, "मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल" (मत्तय ४:४).
सर्व डेअरी पदार्थ टाळले पाहिजेत, ज्यामध्ये, दूध, चीज, दही, आईस्क्रिम आहेत. तथापि, ते ज्यांना औषध घ्यावयाचे आहे त्यांना दुधाचा एक प्याला घेण्याची परवानगी आहे.
पालेभाज्या (आहाराचा आधारभूत प्रकार बनतो)
ताजे किंवा शिजवलेले
त्यास कदाचित फ्रीज मध्ये ठेवलेले किंवा शिजवलेले असेन परंतु डबाबंद केलेले नसेन.
अंडे खाण्याची परवानगी नाही.
फळे
सफरचंद, डाळिंब, अवाकोड, निळ्या रंगाचे बोरासारखे फळ, पपई, जांभूळ, जर्दाळू, नारिंगी रंगाचे गोल फळ, संत्रा, किवी, पिअर, चेरी व स्ट्राबेरी.
खालील फळे तुम्ही खाऊ शकत नाही:
आंबे, अननस, कलिंगड, केळ, द्राक्षे, मनुके, लीची, खजूर.
रस
ताजे फळ आणि पालेभाज्यांच्या रसाची परवानगी आहे
उसाचा रस वापरू नये कारण ते नेहमी आरोग्यविषयक जटीलतेकडे नेते.
डाळी
डाळींना सामान्यपणे "डाळ" असे संबोधले जाते. येथे अनेक भिन्न प्रकारच्या डाळी आहेत ज्या एका भारतीय स्वैंपाकघरास विशेष असे सजविते. ते कडधान्य प्रकारातून येतात आणि ते प्रोटीन व न्युट्रीनसह उर्जावर्धक असे आहेत.
- लाल मसूर (मसूर डाळ)
- बंगाल चणा (चणा डाळ)
- काळा चणा (उडद डाळ)
- पिवळी तूर (तूर डाळ)
- हिरवा चणा (मुंग डाळ)
- चणा (काबुली चणा)
- हरबरा चणा (कुल्थी डाळ)
- काळा चणा
- पांढरी उडद डाळ
- हिरवी तूर (हिरवी तूर डाळ)
- पूर्ण धान्य
पूर्ण धान्य
तांबूस तांदूळ, ओट, क्विनोआ, बाजरी, राजगिरा, उपासाचे पीठ, सातू जे पाण्यात शिजवले जाते.
कोणताही पांढरा तांदूळ किंवा ब्रेड नाही. तथापि, तुम्ही चपाती खाऊ शकता.
दाने किंवा बिया
बदाम, काजू, हेजेलनट्स, पेकन, आक्रोट आणि पिस्ता
चिया बिया व हेम्प बिया तुम्ही खाऊ शकता
तुम्ही शेंगदाणे खाऊ शकत नाही
पोहे (सपाट तांदूळ) तुम्ही खाऊ शकत नाही
कोशिंबीर
हिरव्या पात हे दानीएलाच्या उपासात उत्तम होते. लिंबू किंवा लिंबू रस बरोबर तुम्ही जैतून तेल, आणि हिरव्या पात ह्या आकर्षकतेस पर्याय म्हणून वापरू शकता.
माझा सल्ला हा असेल की फार कमी मीठ वापरा जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंना स्वादिष्ट करीत असता. तसेच फारच कमी तेल वापरा. जवळजवळ साखर वापरूच नका.
ही एक सर्वात मोठी, आरोग्यमय गोष्ट, जी तुम्ही कधी कराल. तुमची संपूर्ण प्रणाली आरोग्यमय होईल. अद्भुत आरोग्यविषयक लाभ तुम्ही प्राप्त कराल.
उपासानंतर, दानीएलाने हे म्हटले:
तो पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. तो मला म्हणाला, हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आतां तुजकडे पाठविले आहे; तो मजबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कांपत उभा राहिलो....... आतां या अंतीच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळविण्यास मी आलो आहे; कारण दृष्टांताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे. (दानीएल १०:१०-११, १४)
ज्याप्रमाणे दानीएलासाठी देवाकडे दृष्टांत होता, देवाकडे तुमच्या जीवनासाठी दृष्टांत आहे, तुमच्यासाठी एक स्वप्न. त्याने तुमच्या जीवनासाठी प्रारंभापासून ते अंतापर्यंत आदेश दिला आहे- कोणाबरोबर तुम्ही विवाह करावा, तुम्ही काय केले पाहिजे आणि तुम्ही कोठे गेले पाहिजे. त्यास तुमचे प्रत्येक पाऊल ठाऊक आहे-सर्व काही. देवाकडे दृष्टांत आहे. परंतु हे लक्षात घ्या की दानीएलाच्या उपासाने दृष्टांत समजण्यास त्यास साहाय्य केले.
लक्ष्य केंद्रित करणे व स्पष्ट असणे हे दोन पर्यायी शब्द आहेत ज्याचा कदाचित समजच्या ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो. त्याचा परिणाम ज्ञानाचा विकास करण्यात झाला जो दृष्टांतास सत्य करण्यास आवश्यक झाला.
दानीएलाच्या उपासाचे संभाव्य लाभ
दानीएलाच्या उपासाच्या काही संभाव्य लाभास तीन वर्गवारीमध्ये विभागले जाऊ शकते:
१. आध्यात्मिक
२. मानसिक व भावनात्मक
३. शारीरिक
अ] आध्यात्मिक लाभ
१. उपास तुम्हांला देवाजवळ आणतो.
२. उपास तुम्हांला देवाच्या वाणीसाठी अधिक संवेदनशील करतो.
३. उपास वाईट सवयी किंवा व्यसने देखील दूर करतो.
४. उपास आपला अशक्तपणा दाखवितो व आपल्याला देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहू देतो.
ब] मानसिक व भावनात्मक लाभ
उपासाचे लाभ प्रत्येक व्यक्तींचे भिन्न आहेत, परंतु पुढील प्रकार घडतात असे ठाऊक आहे.
१. उपास चिंता व निराशा दूर करतो.
२. उपास हा शांति व सर्वांगीण शांति वाढवू शकतो.
३. उपास तुमच्या मनाला नकारात्मक विचार व भावनांपासून मुक्त करतो.
४. उपास तुमच्या जीवनातील तणावपूर्ण संबंधास दुरुस्त करण्यास साहाय्य करू शकते.
५. उपास मेंदूतील गोंधळ कमी करते.
६. उपास देवावरील विश्वास ठेवण्याची तुमची योग्यता वाढविण्यास साहाय्य करते.
७. उपास विषारी पदार्थ काढून टाकते जे तुम्हांला सुस्त किंवा निराशामय असे करू शकते.
क] शारीरिक लाभ
शारीरिक शरीरासाठी काही लाभ आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टी आहेत:
१. उपास साखरेसाठी असणारे व्यसन मोडण्यास साहाय्य करते.
२. उपास शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास सहकार्य करते.
३. उपास शारीरिक वजन घटविण्यास साहाय्यकारी ठरते.
४. उपास आरोग्यकारक ऊर्जा स्तर सांभाळण्यास साहाय्यकारी ठरते.
५. उपास त्वचेचे आरोग्य वाढविते.
६. उपास आरोग्यकारक पचन व निष्कासन करण्यास साहाय्यकारी ठरते.
७. उपास आरोग्यकारक प्रज्वलन उत्तरास साहाय्य करते व बांधेजोडमधील आरामदायकतेस वाढविते.
८. उपास आरोग्यकारक संप्रेरक संतुलन वाढविते.
तुम्ही माझ्याबरोबर व इतर हजारो लोकांबरोबर येऊन मिळण्यास तयार आहात काय जे प्रभूबरोबर अधिक गहन, अधिक प्रभावी अनुभव करण्याची इच्छा बाळगतात?
[email protected] द्वारे मला ईमेल करण्याचे स्वातंत्र्य घ्या, किंवा नोहा संपर्क मध्ये सरळपणे एक संदेश पाठवा, जर तुम्हाला काही प्रश्ने किंवा सुचना द्यावयाच्या आहेत?
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावात, दानीएलाच्या उपासात भाग घ्यावा व तो पूर्ण करावा म्हणून मला कृपा पुरीव. उपास करीत असताना, तुझ्या सान्निध्याच्या उच्चतम अनुभवासाठी आणि ताज्या, व नवीन आध्यात्मिक समजसाठी मी मागणी करितो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पहाडीव दरी यांचा परमेश्वर● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● भविष्यात्मक मध्यस्थी
● स्वामीची इच्छा
● वचनामध्ये ज्ञान
● परिवर्तनाची किंमत
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
टिप्पण्या