नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करितो. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो. नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो. (स्तोत्रसंहिता ३४: १७-१९)
प्रत्येक जण जोह्या पृथ्वीवर जन्मला आहे तो यातनेतून जातो, मग ती शारीरिक, भावनात्मक किंवा मानसिक असो. "स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो." (ईयोब १४:१)
प्रिय जणांना गमाविण्यामुळे, तुटलेल्या नाते-संबंधामुळे, जवळच्या मित्रांद्वारे फसविण्यामुळे, उद्धट लेकारांमुळे वगैरे द्वारे यातना होतात. याची पर्वा केल्याविना कीयातना कशी येते आपल्याला याचा निर्णय केला पाहिजे की आपण त्याशी कसे झुंजणार आहोत. यातनेची हाताळणी करण्यास योग्य निवड करणे हे सर्वांत महत्वाचे आहे कारण यातना ही व्यक्तीला बनविते किंवा नष्ट करून टाकते.
दु:खद आहे की अनेक हे यातने पासून संवेदनाशून्य होण्याच्या पद्धतीचा वापर करून दूर पळून जातात. भोजन, प्राप्ती,नशा,मद्य, किंवा काही अनैतिक संबंधासह यातनेला संवेदनशून्य करतात (जे त्यास सखोलतेने ठाऊक आहे की ते योग्य नाही).
तुमच्या यातनेला संवेदनाशून्य करण्याने ते निघून जात नाही,आपल्या साहाय्यासाठी हताशपणे ओरडण्यास ते केवळ शांत करतात. यातनेला संवेदनाशून्य करणे हे केवळ त्या व्यक्तीला जो त्यातून जात आहे त्यात जखडून ठेवते.
ते आपल्यामध्ये शून्यता निर्माण करते. कोणावर तरी प्रेम करणे, कोणावर तरी विश्वास ठेवण्याच्या प्रबळ तेला ते हळूहळू नष्ट करते. ते कोणाबरोबर तरी जुडण्याच्या समर्थतेला नष्ट करते कारण आपण आपल्या सभोवती एक प्रकारचे संरक्षणाचे जाळे तयार केलेले असते की आपल्या स्वतःला भविष्यातील यातनेपासून वाचवावे.
आपल्या यातनेला संवेदनाशून्य करण्याचा सर्वात वाईट भाग हा की परमेश्वराबरोबरच्या आपल्या संबंधाला सुद्धा ते नष्ट करते.
आपण परमेश्वर आणि त्याच्या उपस्थिती विषयाबाबत सुद्धा कठीण अंत:करणाचे होतो. यातनाहे व्यक्तीला सीमा बनविण्यास कारणीभूत होतातज्यासतो किंवा ती त्यांच्या जीवनात कधीही ओलांडत नाहीत.
उलट अर्थाने, यातना हे महान बदलाचे सर्वात मोठे साधन होऊ शकते. यातना ही खरेच आपल्याला परमेश्वराच्या जवळ आणू शकते. हे तेव्हाच जेव्हा आपण आपले दु:ख परमेश्वराला समर्पित करतो आणि त्यास आपल्यामध्ये आमंत्रित करतो.
(याकोब ४:८) आपल्याला आठवण करू देते की जेव्हा आपण परमेश्वराच्या सन्निध जातो, तो आमच्या सन्निध येतो. जेव्हा आपण त्यास घनिष्ठतेत आमंत्रित करतो, तो नेहमीच आपले आमंत्रण स्वीकारतो. यातना आणि आशाहीनतेचा हा जो काळ होता ज्याने मला परमेश्वराजवळ आणले. मी आत्महत्त्या करण्याच्या विचारात होतो. परमेश्वराने मला माझ्या यातने मध्ये कृपा पुरविली आणि सांत्वन केले.
परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवितो; इस्त्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करितो. भग्नहृदयी जनांना तो बरे करितो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो. (स्तोत्रसंहिता १४७: २-३)
यातना हे नेहमीच आपल्याला दाखवेल की आपण किती अशक्त आणि असहाय्य असे आहोत आणि आपण आपल्या स्वतःहून यातनेस स्वस्थ करू शकत नाही. तथापि, जर आपण यातनेचा विचार सोडतो आणि ते देवावर सोडण्याचानिर्णय घेतो, तेव्हा आपण हे समजू की त्याची कृपा ही आपल्यासाठी पुरेशी आहे आणि त्याचे सामर्थ्य आपल्या अशक्तपणात साहाय्य करते. (२ करिंथ १२:९)
यातना हा खरा शत्रू नाही. वास्तवात, यातना हे मोठे दर्शक आहे की काहीतरी तुटलेले आहे; काहीतरी योग्य नाही. यातनेला आपल्या जीवनात उद्देश आहे. ही माझी प्रार्थना आहे कीतुमच्या यातना ह्या प्रत्येक बंधन, प्रत्येकमर्यादेला तोडण्यास कारणीभूतहोतील आणि त्या गोष्टी कराव्यात कदाचित ज्या पूर्वी कधी केल्या नाहीत.
प्रार्थना
पित्या, जे भग्नहृदयी आहेत त्यांच्याजवळ असण्याचे तूं आश्वासन दिले आहे. तुझ्या प्रेमाने मला घेरून ठेव.
पित्या, मी तुझ्यावर भरंवसा ठेवतो आणि माझ्या यातना तुला समर्पित करतो. माझ्या यातना स्वस्थ कर.
पित्या, तुझी कृपा मला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी प्रबळ आहे. येशूच्या नांवात. आमेन.
पित्या, मी तुझ्यावर भरंवसा ठेवतो आणि माझ्या यातना तुला समर्पित करतो. माझ्या यातना स्वस्थ कर.
पित्या, तुझी कृपा मला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी प्रबळ आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे-२
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
● क्षमाहीनता
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
टिप्पण्या