डेली मन्ना
भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?
Saturday, 13th of July 2024
22
18
439
Categories :
भविष्यात्मक
मध्यस्थी
"तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिजवर त्याची प्रीति असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोडया दिवसांसारखी भासली." (उत्पत्ति २९:२०)
प्रीति जी याकोबाची राहेली वर होती त्यामुळे वर्षे त्यास काही दिवसांसारखी दिसली. जेव्हा आपल्या प्रार्थना, आपली मध्यस्थी करणे हे केवळ कर्तव्य-कार्याच्या स्तर पासून बाहेर येते, तेव्हा ते भविष्यात्मक सुगंध घेऊन राहते.
जर तुम्हाला पवित्र शास्त्रातील पुरुष व स्त्रियांच्या जीवनाचा अभ्यास करावयाचा असेल, ज्यांचा परमेश्वराने महानरित्या उपयोग केला आहे, तेव्हा तुम्ही पाहाल की ते सर्व त्याच्यापासून ऐकणे, पाहणे व प्राप्त करण्याची क्षमता घेऊन चालत होते. चला आपण दावीद चे उदाहरण घेऊ. त्याने जवळजवळ ज्या सर्व युद्धांचा सामना केला त्यामध्ये तो यशस्वी झाला होता. रहस्य हे होते की, युद्ध सुरु होण्याअगोदर तो प्रार्थना करीत असे, तेव्हा युद्धा विषयी अत्यंत महत्वाची समज तो अगोदरच प्राप्त करीत असे.
माझ्याबरोबर १ शमुवेल ३०:८ कडे वळा,
"दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांस गाठीन काय? त्याने [परमेश्वराने] उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर, तूं खात्रीने त्यांस गाठिशील व सर्वांना सोडवून आणिशील."
ह्या वचनात आपण पाहतो की, देवाचा माणूस दावीद प्रार्थने मध्ये देवाचा कळकळीने धावा करीत आहे आणि मग युद्धा संबंधी देवाकडे चौकशी करीत आहे. मग परमेश्वराने प्रत्युत्तर दिले की दाविदाने काय केले पाहिजे. मग दावीद जे त्यास सांगण्यात आले आहे तसेच प्रत्यक्षपणे करीत असे.
भविष्यात्मक मध्यस्थी ही दैवी प्रकटीकरणावर आधारित आहे ती प्रार्थना व उपासने मध्ये परमेश्वराचा कळकळीने धावा करण्याने येते. जेव्हा मध्यस्थी करीत आहोत तेव्हा परमेश्वराकडून दक्षपणे ऐकणे सुद्धा त्यात सामाविलेले आहे.
मागील काही जुन्या आठवणी माझ्या स्मरणात येतात, डायल पुढे मागे करीत राहत रेडीओ स्टेशन मिळविण्याचा प्रयत्न करणे किंवा विडीओ रेकॉर्डवर मार्ग बदलत स्पष्ट चित्र प्राप्त करावे. त्याप्रमाणेच, आपल्याला आपले आध्यात्मिक डोळे व कान परमेश्वरामध्ये लयबद्ध करण्याची गरज आहे म्हणजे आपण स्पष्टपणे ते ऐकावे व पाहावे जे तो आपल्याला सांगणार आहे.
ज्या विषयावर आपण रुची ठेवत आहोत त्यावर दैवी प्रकटीकरण साठी धावा करणे ही भविष्यात्मक मध्यस्थी आहे.
स्तोत्र ५३:२ म्हणते, "कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले." जी समज तो आपल्याला देतो त्यासह जेव्हा आपण देवाचा धावा करतो, तेव्हा मध्यस्थी ही केवळ एक धार्मिक कार्य राहत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला हे स्पष्टपणे सांगते की हीच काय ती परमेश्वराची इच्छा आहे. मंडळी, राष्ट्र किंवा कुटुंबा साठी मग ती मध्यस्थी करणे असो, आपल्याला त्याच्या शांत वाणी कडे संवेदनशील असले पाहिजे.
विषय ज्यासाठी आपण मध्यस्थी करीत आहोत त्याच्यासंबंधी माहिती ही आत्म्याकडून स्वप्ने, दृष्टांत व सूक्ष्म चाहूल द्वारे येऊ शकते किंवा पवित्र आत्म्याद्वारे स्पष्ट केलेल्या पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे सुद्धा येऊ शकते. गटाच्या रचने मध्ये, जेव्हा आपण प्रभु कडून माहिती प्राप्त करतो, तेव्हा आपण ती केवळ बोलून नाही दाखविली पाहिजे. आपण जे पाहिले आहे किंवा प्राप्त केले आहे ते शांतपणे पुढारी ला कळविले पाहिजे. ह्याच ठिकाणी नम्रता ही दिसून येते. अनेकांना वाटते की त्यांच्याकडे पाहावे किंवा त्यांचे ऐकण्यात यावे. ह्याच ठिकाणी जेथे गर्व शिरकाव करतो.
भविष्यात्मक मध्यस्थीचा उद्देश हा त्याची इच्छा त्या विषयात स्थापित करावी हा आहे ज्यासाठी आपण मध्यस्थी करीत आहोत.
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की कळकळीने तुझा धावा करावा. माझे डोळे व कान उघड की पाहावे व ऐकावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
टिप्पण्या