डेली मन्ना
19
16
212
आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
Thursday, 25th of September 2025
Categories :
पवित्रीकरण
इस्राएली लोक त्यांच्यामहान विजयाच्या अगदी जवळ होते. हा तो क्षण होता ज्यावेळेस यहोशवा ने इस्राएल लोकांस म्हटले, "आपल्या स्वतःला पवित्र करा, कारण उद्या प्रभू तुमच्यासाठी अद्भुत कृत्य करणार आहे." (यहोशवा 3:5)
यहोशवा साठी हा काही नवीन सिद्धांत नव्हता. त्याने पाहिले होते मोशे जो देवाचा सेवक जो त्याचा प्रशिक्षक होता त्याद्वारे हे सिद्धांत पाळण्यात आले होते.
प्रत्येक वेळी देव जेव्हा त्याच्या लोकांच्या मध्ये काही मोठे असे सुरु करत असे, प्रभू त्यांना सांगत असे स्वतःला पवित्र करा. पुढील वचनात, प्रभूला त्याच्या इस्राएली लोकांना स्वतः प्रत्यक्ष असे भेट दयायची होतीआणि म्हणून त्याने त्यांना सांगितले की स्वतःला पवित्र करा.
मग प्रभूने मोशे ला सांगितले, "तूं लोकांकडे जा आणि त्यांना आज व उदया पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल." (निर्गम 19:10-11).
हे आपल्याला सांगते की जर आपणांस प्रभू बरोबर एक नवीन भेट हवी असेन तरमग आपल्या स्वतःला ते हे अशुद्ध आणि अभक्तीपूर्ण असे आहे त्यासर्वांपासूनपवित्रकेले पाहिजे.
यहोशवाला सुद्धा हे ठाऊक होते की त्यांच्यामध्ये देवाचे अद्भुत कृत्य जर त्यांना पाहावयाचे आहे तर, त्यांना आध्यात्मिकदृष्टया तयार असले पाहिजे की ते स्वीकारावे, आणि हे समजावेकी देव त्यांच्यामध्ये कार्यरत आहे.
आई-वडिलांनो- आता ही वेळ आहे की स्वतःला पवित्र करावे-देवाला पाहिजे की तुमचे घर आणि तुमच्या लेकरांना भेट दयावी. तो त्यांना स्पर्श करणार आहे. तुमची पिढी ही आशीर्वादित होईल.
पास्टर आणि पुढारी लोकांनो-आता ही वेळ आहे की स्वतःला पवित्र करावे-तुमच्या अधीन असलेले लोक हेमेंढरांप्रमाणे बहुगुणीत होतील. तुमच्या अधीन असलेले लोक हे देवासाठी पेटून उठतील.
तरुण मुलांनो-आता ही वेळ आहे की स्वतःला पवित्र करावे-देव तुमचा उपयोग करील की ह्या पिढीला स्पर्श करावे जे देवाकडे शांतपणेअंतस्थः आक्रोश करीत आहेत. तुम्ही योसेफ प्रमाणे व्हाल. तुमच्या मुळे, पुष्कळ हे शारीरिक आणि सार्वकालिक मरणापासून वाचविले जातील.
लोकांना आदेश दया कीउदयाच्या तयारीसाठी स्वतःला शुद्ध(पवित्र) करावे. (यहोशवा 7:13)
तरीसुद्धा आणखी एका प्रसंगात, देवाने लोकांना सांगितले, "लोकांना आदेश दया की स्वतःला शुद्ध (पवित्र) करावे, याचा अर्थ पावित्रीकरण हे केवळ सुचना किंवा सल्ला नाही, स्वतः प्रभूकडून तो आदेश आहे.
नवीन करार तेच सत्य स्पष्ट करते.
तुमचे पावित्रीकरण, हीच देवाची इच्छा आहे. (1 थेस्सलनी 4:3)
पुढे, पवित्र शास्त्र सांगते, "उदयाच्या तयारीसाठी स्वतःला शुद्ध(पवित्र) करावे. (यहोशवा 7:13)
तर मग, पावित्रीकरण हे उदयासाठी तयारी असे आहे.
मी विश्वास ठेवतो की प्रभूला पाहिजे की आपण आजआध्यात्मिकदृष्टयातयार असे राहावे यासाठीकी जे उदया आपल्या मार्गात येणार आहे. युद्ध हे परमेश्वराचे आहे परंतु विजयासाठी आपल्या स्वतःला योग्य स्थितीत आणण्याची गरज आहे जे आपल्यासाठी अगोदरच ख्रिस्तामध्ये आश्वासित केले गेले आहे.
Bible Reading: Daniel 12; Hosea 1-4
अंगीकार
पित्या, मला समर्थ कर की आजपासून विचारपूर्वक पवित्रतेत चालावे आणि चिन्हे आणि चमत्काराच्या नसंपणाऱ्या उत्सवातयेशूच्या नांवात एक नवीन सुरुवात करावी. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● पापी रागाचे स्तर उघडणे
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२
● येशूचे नांव
● नवीनजीव
टिप्पण्या