हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो. (मीखा ६: ८)
म्हणून शमुवेल म्हणाला, "परमेश्वराचा शब्द पाळील्याने जसा त्याला संतोष होतो तास होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे." (१ शमुवेल १५: २२)
हे खरे आहे की देवाला कोणीही विशेष असा नाही परंतु त्याच्या लेकारांमध्ये त्याचे घनिष्ठ लोक आहेत. तेच तर ते आहेत जे स्वतःला समर्पित करतात कीत्यांच्या आवडत्या गोष्टी ह्या त्याच्या आवडत्या गोष्टी कराव्यात. जर तुम्ही केवळ हे जाणले की त्यास काय आवडते, तुम्ही सुद्धा त्याचे घनिष्ठ लोक होऊ शकता. संदेष्टा मीखा देवाच्या आवडत्या गोष्टींविषयी काही सुचना देतो: न्याय, दया आणि नम्रता.
न्याय: मोशेचे नियमशास्त्र हे सर्व लोकांसाठी योग्य न्याय आणि समान वागणुकीची शास्वती देते, विशेषतः जे समाजामध्ये कमकुवत आणि सामर्थ्यहीन असे आहेत. देव हा न्यायी आहे आणि त्याच्या लेकारांमध्ये त्याचे जे घनिष्ठ आहेत हे ते सर्वांसाठी त्याच्याप्रमाणे न्यायी राहण्यात समर्पित आहेत.
दया: दया ही आपल्या समयात अशीव्यवहारिक गोष्ट आहे. इतरांप्रतीदया दाखविण्यापेक्षा त्यांचा न्याय करणे हे खूपच सोपे आहे. न्याय हा अत्यंत दूर पासून सुद्धा देऊ शकता परंतु दया म्हणजे आपल्याला व्यक्तिगत त्यात कार्य करावे लागते.
तुम्हांला ठाऊक आहे का, जर तुम्ही दया कराल, ती तुमच्याकडे परत येते. प्रभु येशूने म्हटले आहे, "जे दयाळू आहेत ते धन्य, कारण त्यांजवर दया करण्यात येईल" (मत्तय ५: ७). राजा हा दयाळू आहे आणि त्याची प्रजा सुद्धा दयाळू आहे.
नम्रता: नम्रता ही त्याच्या उपस्थितीत राहण्याचीमुख्य गोष्ट आहे. प्रभु येशूने म्हटले, "जे आत्म्यामध्ये दिन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे" (मत्तय ५: ३). "आत्म्यामध्ये दिन" साठी नम्रता हा आणखी एक शब्द आहे. जितके अधिक आपल्याला कळेल की आपल्याला किती गरज आहे तितकेच अधिक आपण परमेश्वरावर अवलंबून राहू. तुम्हांला देवाचे एक घनिष्ठ आहात असे पाहिजे काय? तरमग, न्याय, दया आणि नम्रतेच्या प्रीति मध्ये राहा-त्याच्या आवडत्या गोष्टी.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या मला साहाय्य कर की त्या गोष्टी पसंत कराव्यात ज्या तू पसंत करतो. न्यायी, दयाळू आणि नम्र राहण्यास मला शिकीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● विश्वासाचे सामर्थ्य● लोक बहाणे करण्यासाठी कारणे देतात -भाग 2
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● युद्धासाठी प्रशिक्षण - २
● २१ दिवस उपवासः दिवस ०२
टिप्पण्या