जर तुम्ही स्वतःला अधार्मिक सवयी मध्ये घसरत चालला आहात असे पाहाल, तर तुम्ही एकटे नाहीत. सवयी जसे सामाजिक माध्यम सतत पाहणे किंवा अधिक वेळ फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे वर घालविणे. काही खेळ खेळण्याच्या सवयीचे गुलाम झालेले असतात व दिशाहीन असे तासंतास खेळत राहतात.संशोधन असे दाखविते की अशा प्रकारचे आचरण संबंधावर व आरोग्यावर सुद्धा परिणाम करतात.
मला ठाऊक नाही की तुमची अधार्मिक सवय कोणती आहे परंतु आपण सर्व जण सैतानाद्वारे परीक्षेत पाडले जातोकी लहान मार्गात देवापासून दूर राहावे. परंतु १ करिंथ १०:१३ म्हणते, "मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यांतून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठीकी, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे."
आपल्यावर परीक्षेला वर्चस्व करू नाही दिले पाहिजे; अधार्मिक सवयी मोडल्या जाऊ शकतात; आणि त्याजागी धार्मिक सवयी विकसित करता येऊ शकतात.
सवयीमोडणे
सवयी मोडणे हा तुमच्या मनाचा विषय आहे. तुम्हाला हे जाणले पाहिजे की तेथे महान पुरस्कार आहे तो जे तुम्ही करीत आहात ते न करण्यापासून येतो. तुम्हांला तुमचे मन देवाच्या वचनाने नवीन करण्याची गरज आहे.
रोम १२:२ म्हणते, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया."
तसेच, तुम्ही हे जाणले पाहिजे की ह्या परीक्षेला तुम्ही एकटे तोंड देऊ शकत नाही; तुम्हाला तुमचा विश्वास परमेश्वरा मध्ये ठेवला पाहिजे, आणि तो तुम्हाला साहाय्य करील की ह्या अधार्मिक सवयी वर विजय मिळवावा आणि उत्तमतेसाठी बदलावे. ह्या ठिकाणीच प्रार्थना येते. परमेश्वराकडे प्रार्थना करा व त्याची कृपा मागा की ह्यावर विजय मिळवावा.
वाईट सवयी ह्या नेहमीच वायफळ असतात आणि त्या धोकादायक सुद्धा होऊ शकतात. ते साधन होऊ शकतात जे सैतान वापरतो की तुम्हाला धार्मिकतेच्या मार्गावरून मागे ओढावे. आणि म्हणून ही तुमची जबाबदारी आहे, ख्रिस्ताच्या मागे चालणारा म्हणून, की प्रत्येक पापमय पद्धती मोडाव्या जेव्हा त्या सुरु होतात.
शेवटी, जर तुम्ही नवीन सवयी बनविल्या नाही, तर तुम्ही जुन्या सवयी मध्ये पुन्हा पडाल, आणि सर्व प्रगती जी तुम्ही आताच केली आहे, तेव्यर्थ होईल. ही एक साधी गोष्ट असेन की ऑफिसला वेळेवर पोहोचावे, एका निश्चित वेळेला उठणे, प्रार्थने साठी किंवा झोपण्याचीएक निश्चित वेळ.
"तो स्वतः नेहमी एकटारानात प्रार्थना करण्यासाठी जात असे" (लूक ५:१६). जमावाद्वारे सतत घेरलेले असताना सुद्धा, येशूनेस्वतःसाठी ही सवय केली होती की तो एकटा प्रार्थने साठी जात असे म्हणजे देवाचे सामर्थ्य सतत त्याच्यातून प्रवाहित होत राहो.
धार्मिक सवयी तुमचे जीवन बदलेल आणि जे तुमच्याभोवती आहेत त्यांच्या जीवनावर कायमचे प्रभाव करेल.
प्रार्थना
सुटका
तुमच्या वाईट सवयी परमेश्वराकडे कबूल करा
१. पित्या, येशूच्या नांवात व तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, मला ह्या वाईट सवयीच्या विळख्यातून मुक्त कर जे माझ्या जीवनात आहे.
२. जो मजमध्ये आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे जो ह्या जगात आहे. येशूच्या नांवात, मी माझ्या जीवनावरील प्रत्येक सैतानी प्रभावाला आदेश देतो, तुझी पकड मोकळी कर.
३. पित्या, येशूच्या नांवात, मला तुझे सामर्थ्य व शक्ती दे की ह्या अधार्मिक सवयी पासून मुक्त राहावे.
४. पित्या, मला कृपा व सामर्थ्य दे की धार्मिक सवयी निर्माण कराव्या. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● बुद्धिमान व्हा
● दिवस ०९ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● आमचे नको
● सुवार्ता घेऊन जाणारे
टिप्पण्या