डेली मन्ना
दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Friday, 15th of December 2023
44
33
1156
Categories :
उपास व प्रार्थना
“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय. ६:१०)
जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो, आपण अप्रत्यक्षपणे त्याला त्याचे राज्य स्थापन करण्यास आणि आपल्या जीवनासाठी त्याच्या परिपूर्ण योजना पूर्ण करण्यास सांगत आहोत.
जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आपला दृष्टीकोन बदलतो. त्याची इच्छा आपोआप आपल्या गरजांची पूर्तता करते, म्हणून आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आपला, ‘स्वार्थ’, अहंकार आणि अभिमान हे वधस्तंभी खिळले जातात जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो.
देवाने कार्य करण्याआधी पृथ्वीवरील क्षेत्रात त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता असते. जर आपल्या प्रार्थना देवाला आमंत्रित करत नाहीत, तर तो मध्यस्थी करणार नाही.
देवाची इच्छा आपल्याला जाणण्याची का आवश्यकता आहे?
१. देवाच्या इच्छेनुरूप प्रार्थना करणे
जर तुम्ही देवाच्या इच्छेविषयी अज्ञात आहात, तर त्यानुसार प्रार्थना करणे हे आव्हानात्मक होऊन जाते. उदाहरणार्थ, २ राजे ४:३३-३५ मध्ये, संदेष्टा अलीशा आणि स्त्रीने ओळखले की मुलाने अकाली मरावे ही देवाची इच्छा नव्हती. परिणामस्वरूप, संदेष्टा अलीशाने मुलाला परत जीवन मिळे पर्यंत कळकळीने प्रार्थना केली. देवाची इच्छा जाणून घेतल्याने जीवनातील संकटांना निष्क्रियपणे स्वीकारण्यास नकार देण्यास आणि उद्देशाने व दिशानिर्देशाने प्रार्थना करण्याचे सामर्थ्य मिळते.
२. देवाच्य इच्छेच्या ज्ञानाद्वारे मोहाचा प्रतिकार करणे:
पापाच्या मोहावर प्रभुत्व करण्यासाठी देवाची इच्छा जाणून घेणे हे महत्वाचे आहे. मत्तय. ४:१-११ मध्ये, येशूने यशस्वीपणे सैतानाच्या मोहाचा प्रतिकार केला कारण त्याला देवाच्या इच्छेची परिपूर्ण समज होती. जेव्हा सैतानाने देवाच्या वचनात विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा येशू त्याचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकला. देवाच्या इच्छेच्या स्पष्ट समजेशिवाय, एखादा सैतानाने चालाकीने हाताळण्याइतका दुर्बळ होतो, संभाव्यतः आध्यात्मिक आणि नैतिक अपयशाकडे नेले जाते.
३. देवाच्या इच्छेमध्ये सुरक्षितता, आशीर्वाद आणि संपत्ती आहे:
आपली सुरक्षितता, आशीर्वाद आणि संपन्नता हे सर्वकाही देवाच्या इच्छेमध्ये सामावलेले आहे. देवाच्या इच्छेचे अज्ञान आपल्याला सैतानाच्या शोषणाला बळी पडू देऊ शकते. जसे ३ योहान २ मध्ये स्पष्ट केले आहे, “प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो.”
काही लोक चुकून असे मानतात की आजार किंवा दारिद्र्य हे कदाचित त्यांच्या जीवनासाठी देवाच्या इच्छेचा भाग असू शकतो. हा गैरसमज त्यांना दु:खाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करतो, जे प्रत्यक्षात, सैतानाचे काम असते. आपल्या जीवनासाठी काहीही जे देवाच्या इच्छेच्या विरोधात असते त्याच्याविरुद्ध ठामपणे उभे राहणे महत्वाचे आहे.
४. देवाच्या इच्छेच्या ज्ञानाद्वारे आज्ञाधारकपणात जगणे
देवाच्या इच्छेनुसार आज्ञाधारकपणात जगण्यासाठी, आपण प्रथम ते समजले पाहिजे. जर आपण अज्ञात आहोत की देवाची इच्छा काय सांगत आहे, तर आपण जाणूनबुजून त्या विरोधात कृती करण्याचा धोका पत्करतो. इब्री. १०:७ मध्ये ही कल्पना प्रतिध्वनित केली आहे, जी म्हणते, “ह्यावर मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”
देवाची इच्छा समजणे हे आपल्याला स्पष्ट मार्गदर्शन आणि उद्देश देते, त्याच्या दैवी योजनेशी आपल्या जीवनाला समरूप करते. हे केवळ चुकीच्या गोष्टी करणे टाळणे नाही परंतु आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृतीशील राहिले पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करण्याचे हे समर्पण हे सतत शिकण्याचा आणि वाढण्याचा प्रवास आहे, जेथे आपण आपल्या इच्छेला त्याच्या इच्छेशी समरूप करतो, जे देवासोबत आज्ञाधारक नातेसंबंध बनवणे आणि ते पूर्ण करण्याकडे नेते.
५. जेव्हाजेव्हा आपण देवाच्या इच्छेच्या आज्ञाधारकपणात चालत नाही, तेव्हातेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करण्यात कार्यरत होतो
सैतानाला वाव देऊ नका (इफिस. ४:२७)
६. सैतान आपल्यावर दोष लावतो जेव्हा आपण देवाच्या इच्छेबाहेर जगत असतो
तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले.” (जखऱ्या ३:१)
७. देव त्याच्या इच्छेच्या बाहेर काहीही करू शकत नाही
“तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता” (याकोब ४:३). जेव्हा आपल्या प्रार्थना ह्या देवाच्या इच्छेच्या बाहेर असतात तेव्हा आपण प्रार्थनांची उत्तरे प्राप्त करू शकत नाही
८. देवाच्या इच्छेच्या बाहेर आपण आपल्या नशिबाला पूर्ण करू शकत नाही
“४तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. ५ मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. ६ कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. ७ तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. (योहान. १५:४-७)
तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी २ महत्वपूर्ण किल्या
१. देवासोबत चाला
तुम्ही देवासोबत नातेसंबंध जोपासले पाहिजे. तुम्ही त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि केवळ त्याच्याविषयी जाणण्याचा नाही.
वचनात वेळ घालवून, प्रार्थनेसाठी वेळ काढून आणि चर्चमध्ये जेवढी संधी तुम्ही घेऊ शकता तेवढी घेऊन आणि जे-१२ नेत्याच्या अधीन राहण्याने तुम्ही ते नातेसंबंध उत्तमरीत्या जोपासाल. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात अशा शिस्तीचे पालन करता, तेव्हा देव स्वतः तुमच्या जीवनात त्याची योजना प्रकट करण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यास सुरुवात करेल.
“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतीसूत्रे ३:५-६)
२. तुम्हांला आधीच देवाची इच्छा जी माहित आहे त्याचे पालन करा
पुष्कळ लोकांना त्यांच्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे असे दिसत आहे असे वाटत असते परंतु ते या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करतात की त्याच्या वचनाद्वारे त्याची इच्छा आधीच काळजीपूर्वक ९८ percent प्रकट केली गेली आहे. देव आधीच त्याच्या इच्छेच्या पुष्कळ, पुष्कळ पैलुंबद्दल स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, ही स्पष्टपणे त्याची योजना आहे की आपण लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहावे.
“कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.” (१ थेस्सलनीका. ४:३)
देवाने जी त्याची इच्छा आहे म्हणून आपल्याला स्पष्टपणे दाखवले आहे त्याचे जर आपण पालन करत नाही, तर आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेसंबंधी पुढील काहीही माहिती तो आपल्याला प्रकट करेल याचा आपण विचार कसा करावा?
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, येशूच्या नावाने तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. (मत्तय. ६:१०)
२. जे काहीही जे माझ्या स्वर्गीय पित्याने माझ्या जीवनात लावलेले नाही, ते येशूच्या नावाने अग्नीद्वारे नष्ट केले जावे. (मत्तय. ५:१३)
३. मी संपन्न व्हावे अशी देवाची माझ्यासाठी इच्छा आहे, म्हणूनच, येशूच्या नावाने मी माझ्या जीवनात अपयश, नुकसान आणि उशीर होण्याच्या कृत्यांना प्रतिबंधित करतो. (३ योहान १:२)
४. मी चांगल्या आरोग्यात राहावे अशी देवाची माझ्यासाठी इच्छा आहे, म्हणूनच, येशूच्या नावाने मी माझ्या शरीरातील कोणत्याही आजाराची व रोगाची लक्षणे नष्ट करतो. (यिर्मया ३०:१७)
५. मी उधार देणारा असावे, उधार घेणारा नव्हे अशी देवाची माझ्यासाठी इच्छा आहे, म्हणूनच, मला कर्जात बुडवणाऱ्या सैतानाच्या प्रत्येक कपटकारस्थानांना मी येशूच्या नावाने नष्ट करतो. (अनुवाद २८:१२)
६. येशूच्या रक्ताने, कोणतेही कायदे जे माझ्या विरोधात आहेत ते येशूच्या नावाने वधस्तंभावर खिळले जावेत. (कलस्सै. २:१४)
७. मला आणि माझ्या कुटुंबाला उद्देशून प्रत्येक मंत्र, जादूटोणा, शाप आणि वाईट गोष्टी येशूच्या नावाने मी विखरून टाकतो. (गणना २३:२३)
८. मी आदेश देतो आणि घोषणा करतो, माझ्या जीवनातून प्रत्येक वाईट, मृत्यू, लज्जा, नुकसान, यातना, नाकार आणि उशीर होणे यांस येशूच्या नावाने निघून जावोत. (स्तोत्र. ३४:१९)
९. माझ्या विरोधात तयार केलेले कोणतेही शस्त्र संपन्न होणार नाही, आणि येशूच्या नावाने मी कोणत्याही बोलण्याचा निषेध करतो जे माझ्या विरोधात उभे राहते. (यशया ५४:१७)
१०. परमेश्वरा, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पृथ्वीवर तुझे राज्य वाढवण्यासाठी येशूच्या नावाने मला समर्थ कर. (फिलिप्पै. २:१३)
११. परमेश्वरा, युद्धासाठी मला शक्तीने सुसज्ज कर; माझ्या जीवनातील शत्रूचे कोणतेही बालेकिल्ले, मी त्यांना येशूच्या नावाने उपटून टाकतो. (२ करिंथ. २:४)
१२. मी आदेश देतो आणि घोषणा करतो की कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही आणि माझ्या निवासाच्या ठिकाणी कोणतीही मरी उद्भवणार नाही, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनावर येशूच्या नावाने मी परमेश्वराच्या संरक्षणाचा मी हक्क दाखवतो. (स्तोत्र. ९१:१०)
Join our WhatsApp Channel
Most Read
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
टिप्पण्या