त्याच्या पूर्णतेतून आपणां सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. (योहान १:१६-१८)
जेव्हा ख्रिस्ती ने अमेरिकेत कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी भारत सोडले, तेव्हा तो त्याच्या ख्रिस्ती पालनपोषणाच्या 'बंधनातून' जगाच्या मूल्यांच्या तथाकथित नवीन प्राप्त होणाऱ्या स्वतंत्रतेच्या दिशेने भरकटत गेला. गोवा मधील एका लहान गावी वाढ झालेला, ख्रिस्ती व त्याचे कुटुंबीय चर्च ला नियमितपणे जात होते. चर्च गायकवृंद मध्ये तो कार्यरत होता व चर्च स्तुति-उपासने मध्ये मार्गदर्शन करीत असे. परंतु आता अमेरिके मध्ये फ्लोरिडा येथे कॉलेज ला जात असताना ते सर्व आता धूसर झाले होते. परमेश्वरासाठी प्रत्येक इच्छा ही आता निघून गेलेली दिसत होती.
त्याच्या साक्षी मध्ये त्याने म्हटले, "अशी उत्तेजना मला सतत होत असे, माझ्या हृदयात जवळजवळ एक हळुवार इशारा मिळत असे की परत प्रभूकडे वळावे, चर्च ला परत जावे की पुन्हा नव्याने सुरुवात करावी." ते काय होते? तो एक कृपेचा हात होता जो ख्रिस्ती कडे पोहचत होता.
म्हणून ह्या उत्तेजनाच्या मागे चालण्यासाठी, त्याने त्याचे मन बनविले की लहान सुट्टी नंतर जेव्हा तो कॉलेज मध्ये येईल तेव्हा प्रथम गोष्ट जी तो करेल की एक चर्च शोधावे. त्याने म्हटले, त्यास आठवते की तो काही पदवीधर सहकाऱ्यांसोबत राहत असताना तेथे वादविवाद असा वळला की जे देवा मध्ये विश्वास ठेवतात त्यांची निंदा करावी....आणि माझ्या अंतरंगात मी फारच निराश झालो आहे असे वाटले. जग हे मला पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत होते की मी एकाच वेळी एक विश्वासू माणूस व एका वैज्ञानिक क्षेत्रात एक पदवीधर व्यक्ति असे दोन्हीही असू शकत नाही.'
परंतु मग ख्रिस्ती ला वाटले की अंतरंगातील ह्या संघर्षाला विश्वासाच्या प्रेमळ हातात सोपविण्याद्वारे सोडविले पाहिजे. आज, ख्रिस्ती, अंतराळ संशोधन मध्ये कार्य करणाऱ्या सर्वात अग्रणी संघटनेत एक कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रशिक्षण घेत कार्य करीत आहे. स्थानिक चर्च द्वारे विकसित केलेली साधने सुद्धा तो वापरतो की तरुण वयस्कर लोकांसाठी बायबल अभ्यासात मार्गदर्शन करावे व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दयावे. तो एका संस्थे साठी स्वेच्छेने कार्य करतो की ज्यांचा उद्देश तरुणांना मार्गदर्शन दयावे हा आहे.
ख्रिस्ती चे जीवन हा पुरावा आहे की परमेश्वर नेहमीच मार्ग काढेल ज्याद्वारे आपण त्याच्या कृपे मध्ये सदैव राहू शकतो. मग याची पर्वा नाही की काही क्षणी आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील; तो तारण, सुटका, नवीन वाटचाल व आध्यात्मिक आशीर्वाद साठी कृपेवर कृपा देतो. एकच अट ही तुम्ही त्याची कृपा प्राप्त केलेली पाहिजे?
हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात संघर्ष करीत असाल तेव्हा परमेश्वर वाटेच्या बाजूला थांबून केवळ पाहत राहील असे होणार नाही. त्याऐवजी, तो तुम्हाला त्याची कृपा प्रगट करेल की कदाचित तुम्हांस साहाय्य व कृपा प्राप्त व्हावी की हताश समयी प्रभुत्व मिळवावे व त्या चक्रातून बाहेर पडावे. जेव्हा तुम्ही आज बाहेर जाता, तेव्हा परमेश्वराच्या कृपे साठी तुमची तृषा व धावा करण्यात जाणूनबुजून प्रयत्नात राहा. हे समजून घ्या की ही त्याची कृपा आहे ज्याची सर्व वेळेला व सर्व परिस्थती मध्ये गरज आहे. जर तुम्ही तसे जीवन जगण्याची योजना करीत आहात जे त्याने तुमच्यासाठी निर्देशित केले आहे, तर तुम्हाला कृपेवर कृपेची गरज आहे!
प्रार्थना
परमेश्वरा, तुझ्या कृपेवर पूर्णपणे विसंबून राहण्यास मला साहाय्य कर, हे प्रभो! माझ्या जीवनासाठी तुझी कृपा ही पुरेशी आहे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ते लहान तारणारे आहेत● विश्वास काय आहे?
● त्याचा शोध घ्या आणि तुमच्या युद्धाला तोंड दया
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?
● अन्य भाषेत बोला व प्रगती करा
● अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू
टिप्पण्या