डेली मन्ना
भेट देणे व प्रकटीकरण देण्यामध्ये
Sunday, 14th of April 2024
21
14
818
Categories :
दैवी भेट
यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. (उत्पत्ति २१:१)
मला पाहिजे की तुम्ही "परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे" व "वचन पुरे केले" ह्या काळजीपूर्वक पाहा.
देवाच्या गुणधर्माचा संदर्भ देत पवित्र शास्त्र हे बोलत आहे, "देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? (गणना २३:१९) परमेश्वर जेव्हा काही करण्याविषयी बोलतो तेव्हा तुम्ही याविषयी पूर्ण खात्रीशीर असावे की तो ते पूर्ण करणारच.
तथापि, येथे एक गोष्ट आहे जी मला पाहिजे की तुम्ही समजावी. हा तो शेवटचा आराखडा आहे ज्याविषयी तुम्ही अवगत असावे हे मला पाहिजे. भेट देणे व प्रकटीकरण च्या मध्ये, येथे नेहमीच एक काळ समय आहे. काहींसाठी हा समय लहान असू शकतो किंवा काहींसाठी तो थोडा मोठा असू शकतो. मला ते तुम्हाला स्पष्ट करू दया.
जेव्हा सारा तिच्या गर्भकाळाच्या अवस्थेमधून जात होती तेव्हा सर्व प्रकारच्या विचारांनी कदाचित तिच्या मनात चलबिचल पणाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेन. "मला हे बाळ इतक्या मोठया कालावधी नंतर मिळाले आहे, तेव्हा काय होईल जर मी ह्या बाळाला गमाविले तर काय होईल? तीचा चमत्कार अजूनही प्रगट झाला नव्हता आणि ती त्या प्रक्रीयेमध्ये होती. यालाच वाट पाहण्याचा समय म्हटले आहे. कोणालाही वाट पाहायला आवडत नाही.
ह्या वाट पाहण्याच्या समयावेळी आपण काय करतो?
"परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर." (स्तोत्र २७:१४). मी विश्वास ठेवतो की हेच ते काय सारा ने केले असेन, म्हणून आपण सुद्धा तसेच केले पाहिजे.
आपण सर्व जण वाट पाहण्याच्या समयाचा अनुभव घेतो. त्यासमया दरम्यान आपल्याकडे निवड आहे: आपण आपल्या स्वतःची किंव करू शकतो व भीति व निराशेला आपणांस नियंत्रित करू देऊ शकतो किंवा आपण देवावर भरंवसा ठेवू शकतो आणि वाट पाहत असताना तो जे आपल्या जीवनात करीत आहे त्याकडे लक्ष देऊ शकतो.
वाट पाहण्याच्या त्या समया दरम्यान सारा प्रमाणे आपण देवाच्या वचनावर स्थिर राहिले पाहिजे. इब्री ११:११ म्हणते, "वयोमर्यादेपलीकडे असतांही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ति मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले."
जेव्हाकेव्हा पवित्र शास्त्र विश्वासा बद्दल बोलते, ते नेहमीच देवाच्या वचनाच्या संबंधात आहे. परमेश्वराने जे वचन बोलले होते त्यावर सारेने विश्वास ठेवला. परमेश्वराने काय म्हटले आहे याबद्दल तिने स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण दिली असेन. हेच ते काय आपल्याला सुद्धा करण्याची गरज आहे.
प्रार्थना
पित्या, तूं विश्वसनीय आहेस. मला कृपा पुरीव की मी तुझ्या निर्माण करण्याच्या क्रियेमध्ये व स्त्रोत मध्ये माझ्या गरजांची पूर्तता करण्यात कधीही शंका घेऊ नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● इतरांना आशीर्वाद देणे सोडू नका● सन्मानाचे जीवन जगा
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● रागाची समस्या
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● देवाचे 7 आत्मे
● वचन प्राप्त करा
टिप्पण्या