तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. (कलस्सै ३: १२)
"प्रसंगासाठी पेहराव घालणे" या वाक्याला तुम्ही कधी ऐकले आहे काय? जर कुटुंबामध्ये किंवा ऑफिस मध्ये काही विशेष प्रसंग आहे तर आपण याची खात्री करतो की आपण व्यवस्थितपणे पेहराव हा घातला आहे. त्याचप्रमाणे, प्रेषित पौल आपल्याला याची आठवण देतो की, प्रत्येक दिवशी आपण सुद्धा दयाळूपणाची वस्त्रे परिधान केली पाहिजे.
दयाळूपणा हा शब्दापेक्षा अधिक आहे. हे चांगले वाटण्यापेक्षा अधिक आहे. हे प्रीतीचे व्यवहारिक प्रदर्शन आहे. खरा दयाळूपणा हा आत्म्याद्वारे निर्मित आहे. (गलती ५: २२ पाहा)
एक चांगले कारण की लोक ज्यांच्या संपर्कात तुम्ही येता त्यांच्याबरोबर दयाळू असावे हे उत्पत्ति ८: २२ मध्ये सापडणाऱ्या बी पेरण्याचा हंगाम आणि कापणी करण्याच्या हंगामाच्या कारणामुळे आहे.
"पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी,
थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा,
दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत."
याचा काय अर्थ आहे तो हा की जोपर्यंत पृथ्वी राहील (आणि तो खूप मोठा अवधी आहे), पेरणी आणि कापणी चा सिद्धांत हा तसाच अस्तित्वात राहील- नैसर्गिक आणि आध्यात्मिक या दोन्ही स्तरात.
जेव्हा आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्यालोकांबरोबर दयाळू राहतो, पेरणी व कापणी च्या नियमानुसार, कोणीतरी आपल्या साठी सुद्धा दयाळूपणे वागेल- आवश्यकपणे तो व्यक्ति नाही ज्यास आपण दयाळूपणा दाखविला आहे.
नीतिसूत्रे ११: १७ आपल्याला सांगते की, "दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करितो, पण निर्दय स्वतःवर संकट आणितो." तर तुम्ही पाहता, जेव्हा तुम्ही दयाळू आहात, तुमचा स्वतःचा जीव हा उन्नत होतो. तुम्ही सुद्धा कशा तरी मार्गाने लाभ प्राप्त कराल.
दावीद आणि त्याचे लोक अमालेकी लोकांचा पीछा करीत होते, त्यांना एक मिसरी तरुण पुरुष रानात दिसला, ज्यास त्याच्या एका अमालेकी स्वामी द्वारे तसेच सोडून देण्यात आले होते कारण तो आजारी पडला होता. तो फारच वाईट अवस्थेत होता कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने काही खाल्ले व प्याले नव्हते (१ शमुवेल ३०: ११-१२).
"माझ्या मार्गात आला" ह्या शब्दाने जग हे आसक्त झालेले आहे, दयाळूपणा हा नेहमीच इतरांचे चांगले पाहतो. दावीद आणि त्याच्या लोकांनी ह्या मनुष्याला दया दाखविली आणि त्याची काळजी घेतली. हा तोच मनुष्य होता ज्याने दाविदाला महत्वाची माहिती दिली ज्यामुळे दाविदाने आणि त्याच्या लोकांनी जे सर्व काही त्यांच्याकडून अमालेकी द्वारे चोरले गेले होते ते प्राप्त करण्यास साहाय्य केले. (१ शमुवेल ३०: १३-१५)
दयाळूपणा आणि पुनर्स्थापनाचा सिद्धांत हा गहनपणे एकत्र जुळलेला आहे.सत्याच्या ह्या दृष्टीकोनाला गमावू नका.
शेवटी, आपला दयाळूपणा, आपल्या पित्याचे हृदय प्रगट करतो. "तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा." (इफिस ४: ३२)
Bible Reading: Palms 143-150; Proverbs 1
प्रार्थना
पित्या, मी ज्या सर्वांच्या संपर्कात येतो त्यांच्याबरोबर दयाळू राहण्यासाठी मला कृपा पुरीव म्हणजे मी व्यवहारीकपणे तुझा दैवी स्वभाव प्रगट करावा. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● जीवनाचे पुस्तक
● संबंधामध्ये आदराचा नियम
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● दिवस ०३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या