त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला; आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता; परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. (प्रेषित १२: १-५)
वरील वचनांमध्ये, आपण पाहतो की प्रेषित याकोब ला जिवंत मारले गेले आहे. तरीसुद्धा प्रेषित पेत्राला परमेश्वराद्वारे चमत्कारिक मध्यस्थी द्वारे वाचविले गेले आहे. देवदूत त्या तुरुंगात गेला आहे आणि वैयक्तिकरित्या त्याने पेत्राला त्या तुरुंगातून बाहेर काढले आहे.
कशाने फरक केला आहे?
याकोब का मारला गेला परंतु पेत्राला वाचविले गेले आहे?
मी विश्वास ठेवतो एक प्रमुख गोष्ट ही की जेव्हा पेत्र तुरुंगात होता, चर्च ने त्याच्यासाठी आग्रहाने प्रार्थना केली.
हे इतके महत्वाचे आहे की प्रार्थनेचे सामर्थ्य ओळखावे हे केवळ आपल्या स्वतःच्या जीवनाकरिता नाही परंतु त्यांच्यासाठी जे आपल्या सभोवती आहेत. आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रात आदेश दिला गेला आहे की आपल्या राष्ट्राच्या आणि चर्च च्या पुढारी साठी प्रार्थना करावी. आपल्याला आदेश दिला गेला आहे की एकमेकांसाठी प्रार्थना करावी.
येथे अनेक आवाहने जे आपण आणि ख्रिस्ताचे शरीर सामना करीत आहे आणि त्यातील बरीच आवाहने ही कळकळीच्या प्रार्थनेच्या अभावामुळे आहे.
मागील अनेक वर्षांपासून मी हे पाहिले आहे, जर येथे भविष्यात्मक, आरोग्य किंवा सुटकेसाठी प्रार्थना सभा आहे,लोक मोठया संख्येने तेथे जातील. तथापि, जर तेथे मध्यस्थी करण्याची प्रार्थना सभा आहे, तर तेथे क्वचितच काही लोक जातील. आपल्या सर्वांना कोणीतरी किंवा प्रत्येक जणांनी आपल्यासाठीप्रार्थना करावी असे वाटते जेव्हा आपण अत्यंत संकटात आहोत परंतु दु:खद आहे जेव्हा इतर हे मागणी करीत आहे तेव्हा आपल्याला उत्तर दयावयास नको आहे.
तर मग आपले पास्टर, चर्च पुढारी, ख्रिस्तातील बंधुजनहो, किंवा इतर कोणीही ज्याचे प्रभू आपल्याला ओझे देतो त्यासाठी आपण कळकळीने प्रार्थना करावी; जसेकाही आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करत आहोत.
बोलणे हे सोपे आहे परंतु येथे आपले प्रार्थनामय जीवन वाढविण्याची गरज आहे केवळ आपल्या स्वतःसाठी नाही, परंतु इतरांसाठी. त्याच्या आत्म्याच्या ह्या वाणीला तुम्ही उत्तर दयाल काय?
Bible Reading : Genesis 8 -11
प्रार्थना
1.लज्जे ऐवजी, मला दुप्पट सन्मान मिळेल, आणि गोंधळाऐवजी, मी माझ्या मोबदल्याबद्दल आनंद करीन. (यशया ६१:७)
2.वांशिक शाप जे मला वंशपरंपरागत मिळाले आहेत ते येशूच्या नावाने येशूच्या रक्तात कायमचे मोडले जातील.
3.माझी समृद्धी, नोकरी, व्यवसाय संपर्क, पदोन्नती किंवा मला मिळणारी प्रगती यांबद्दल माझ्या जीवनात शत्रूच्या अंधाराची प्रत्येक सावली जी मला अडथळा करीत आहे, तिला येशूच्या नावात, अग्नी द्वारे मी काढून टाकत आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● समृद्धीची विसरलेली किल्ली● विश्वासाचे सामर्थ्य
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● सर्वसामान्य भीती
टिप्पण्या