डेली मन्ना
चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
Wednesday, 19th of June 2024
24
23
501
Categories :
अधिकार.
चमत्कारीकते मध्ये कार्य करणे
प्रत्येक उद्देश जे जीवनामध्ये प्राप्त करणे महत्वाचे आहे ते त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयारी व योजना करण्याने सुरु होते की ते स्वप्न पूर्ण करावे. त्याप्रमाणे, जर तुम्हाला देवाचे सामर्थ्य पाहिजे आहे की ते तुमच्यामधून प्रवाहित व्हावे किंवा तुमच्या वतीने कार्य करावे, तर मग ह्या बाबतीत त्याच्या वचनास काय सांगावयाचे आहे ते तुम्ही शिकले पाहिजे.
मागील काही वर्षांमध्ये मी प्रश्न केला आहे की, येथे काही निश्चित पाऊले आहेत जी एका चमत्कारासाठी तयारी करण्यास आवश्यक आहेत आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी सुद्धा येथे काही पाऊले उचलण्याची गरज आहे.
भूतलावर येथे काहीही नवीन नाही. (उपदेशक १:९)
ही तीच पाऊले आहेत जी प्रभु येशू, जो आपला सिद्ध आदर्श, ज्यास घ्यावी लागली जेणेकरून ते अद्भुत चमत्कार करावे. ही तीच पाऊले आहेत जी प्रेषितांना घ्यावी लागली आणि ही तीच पाऊले असणार आहेत जी तुम्हाला व मला घ्यावी लागणार आहेत जेणेकरून आपल्या स्वतःला चमत्कारामध्ये कार्यरत होण्यासाठी तयार करावे व चमत्कार प्राप्त करावे त्या चमत्कार करणाऱ्याकडून-प्रभु येशू ख्रिस्ता कडून.
आपला देवाने दिलेला अधिकार समजणे व वापरणे ही किल्ली आहे की आपल्या जीवनात चमत्कार होताना पाहावे.
प्रेषित, पेत्र व योहान एकदा दुपारी मंदिरात गेले की ३ वाजताच्या प्रार्थना सभेत भाग घ्यावा. जेव्हा ते मंदिराकडे येत होते, तेथे एक मनुष्य जो जन्मापासून पांगळा होता त्यास तेथे आणले होते. प्रत्येक दिवशी त्यास मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवत असत, ज्यास सुंदर दरवाजा म्हणत होते, म्हणजे त्याने मंदिरात जाणाऱ्यांकडून भिक्षा मागावी. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे त्याने जेव्हा पाहिले, तेव्हा त्याने काही पैशा साठी मागणी केली.
तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, आम्हांकडे पाहा! तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. परंतु पेत्राने म्हटले, मला तुझ्यासाठी काही सोने व रूपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नांवाने चालू लाग!
तेव्हा पेत्राने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. आणि जेव्हा त्याने असे केले, तेव्हा त्या मनुष्याची पावले व घोटे ही तात्काळ बरी व प्रबळ झाली. त्याने उडी मारली, त्याच्या पायावर उभा राहिला, आणि चालू लागला! मग, चालत, उड्या मारीत व देवाची स्तुति करीत, तो त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. (प्रेषित ३:१-८)
लक्षात घ्या, पेत्राने ह्या मनुष्यासाठी प्रार्थना केली नाही. पेत्र हा वधस्तंभावरील पूर्ण केलेल्या कार्याच्या प्रकटीकरणात कार्य करीत होता. त्याने ठोसपणे विश्वास ठेवला की प्रभूने अगोदरच त्याचा भाग वधस्तंभावर पूर्ण केला आहे व ते सामर्थ्य त्याच्यामध्ये ठेवले आहे. आता ती पेत्राची जबाबदारी होती की ते सामर्थ्य मोकळे करावे, आणि हेच ते काय केवळ त्याने केले.
एक सडपातळ पोलीस अधिकारी एका मोठया ट्रक समोर हात उंचावून उभा राहू शकतो हे म्हणत-थांब! आणि तुम्हाला माहीत आहे काय; त्या मोठया ट्रक ला थांबावे लागते. त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या स्वतःच्या शारीरिक शक्तीने त्या ट्रक ला थांबविले काय? नाही! त्याने त्याच्याजवळ जो अधिकार होता त्यामुळे हे केले-तेथे लागू असलेला कायदा.
अशा प्रकारचा अधिकार जो आपण आपल्या सहकारी व्यक्तींना देत असतो ज्यास स्वाभाविक अधिकार म्हणतात. अधिकार जो प्रभूने त्याच्या शिष्यांना दिला (तुम्हाला व मला) त्यास आध्यात्मिक अधिकार म्हणतात. स्वाभाविक व आध्यात्मिक अधिकार या दोघांचा सिद्धांत हा सारखाच आहे- कोणाला तरी सामर्थ्य दयायचे आहे.
मग त्याने (येशूने) बारा प्रेषितांस एकत्र बोलावून त्यांस सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यांस बरे करावयास पाठविले.
(लूक ९:१-२)
लक्षात घ्या, प्रभु येशूने त्याचा अधिकार व सामर्थ्य शिष्यांना दिले. शिष्य कोण आहे? एक शिष्य हा सरळपणे एक व्यक्ति आहे जो त्याच्या धन्याची सर्व शिकवण पाळतो. तर मग, हा अधिकार प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला प्रभु येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हायला पाहिजे.
हेच तर कारण आहे की बायबल म्हणते, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल. हे याकारणासाठी नाही की तुम्ही सैतानापेक्षा शक्तीने प्रबळ आहात, परंतु आता त्याचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहते. (कलस्सै ३:१६)
योहान ८:३१ नुसार, जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना येशू म्हणाला, ;तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहां हे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की हा अधिकार व सामर्थ्य हे केवळ मूळ बारा शिष्यांसाठीच नव्हते, हे त्या सर्वांसाठी होते ज्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला व त्यानुसार चालले.
आज, हेतुपूर्वक निवड करा, मी देवाचे वचन वाचेन व त्यावर मनन करेन. व मी त्यानुसार सुद्धा चालेन मग काहीही होवो. जेव्हा तुम्ही असे करता, तुम्ही तुमच्या स्वतःला देवाच्या अधिकारामध्ये वाढत आहात असे पाहाल.
प्रार्थना
येशूच्या नांवात, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या विरोधातील अंधाराच्या सामर्थ्या मी तुला आदेश देत आहे की निघून जावे. (हे बोलत राहा, जोपर्यंत तुम्हाला मोकळे असे वाटत नाही.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२● तुमच्यासाठी हे बदलत आहे.
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
टिप्पण्या