english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. ठेस (दुखावलेपणा) आत्मिक दृष्टीला विकृत करते
डेली मन्ना

ठेस (दुखावलेपणा) आत्मिक दृष्टीला विकृत करते

Tuesday, 6th of January 2026
21 16 165
Categories : अपमान
ठेसचे (दुखावलेपणा) सर्वात धोकादायक परिणाम हे आपल्या भावनांवर ती काय करते यामध्ये नसून, आपल्या दृष्टीवर ती काय करते यामध्ये आहेत.ठेस खाल्लेले हृदय क्वचितच स्पष्टपणे पाहू शकते. ते सत्याऐवजी वेदनेच्या चष्म्यातून शब्द, कृती, आणि देवाच्या कार्यालाही समजू लागते. प्रभु येशू यांनी या तत्त्वाविषयी इशारा दिला, तेव्हा त्यांनी म्हटले:

“देहाचा दिवा म्हणजे डोळा आहे. म्हणून जर तुझा डोळा चांगला असेल, तर तुझा संपूर्ण देह प्रकाशाने भरलेला असेल. पण जर तुझा डोळा वाईट असेल, तर तुझा संपूर्ण देह अंधाराने भरलेला असेल.” (मत्तय 6:22–23).

जेव्हा ठेस हृदयात प्रवेश करतो, तेव्हा ती अंतःकरणातील डोळा धूसर करते. तेव्हा समस्या परिस्थिती राहत नाही—तर दृष्टीकोनाची होते.

ओळखशक्तीपासून संशयाकडे 

ओळखशक्ती (Discernment) हे पवित्र आत्म्याचे दान आहे; संशय हा ठेसचा (दुखावलेपणाचा) परिणाम आहे. जेव्हा मनातील वेदना सुटत नाहीत, तेव्हा हृदय तिथेही चुकीचे हेतू लावू लागते जिथे प्रत्यक्षात ते नसतात.सामान्य कृती वैयक्तिक वाटू लागतात. मौन शत्रुत्वासारखे भासते. दुरुस्ती नाकारल्यासारखी वाटते. 

प्रेरित पौल विश्वासूंना सावध करतात:

“कारण आम्ही त्याच्या युक्त्यांबाबत अनभिज्ञ नाही” (2 करिंथकर 2:11).

शत्रूची एक अत्यंत प्रभावी युक्ती म्हणजे— ठेसचा (दुखावलेपणाचा) उपयोग करून भेददृष्टीऐवजी संशय निर्माण करणे हळूहळू सहवासाला अंतरात बदलणे आणि ऐक्याला एकाकीपणात रूपांतरित करणे. 

ठेस खाल्लेला (दुखावलेला) भविष्यवक्ता

योहान बाप्तिस्मा देणारा हे याचे एक गंभीर उदाहरण आहे. त्याने धैर्याने येशूला देवाचा मेमणा म्हणून घोषित केले (योहान 1:29), परंतु नंतर, जेव्हा तो कैदेत होता, तेव्हा त्याने संदेश पाठवून विचारले:

“जो येणार आहे तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” (मत्तय 11:3).

काय बदलले? योहानच्या परिस्थिती. त्याच्या अपूर्ण अपेक्षांनी ठेससाठी (दुखावलेपणाला) जागा निर्माण केली, आणि ठेसने (दुखावलेपणाला) त्याचे प्रकाशन धूसर केले.
जो मनुष्य एकेकाळी स्पष्ट पाहत होता, तोच आता खोलवर प्रश्न विचारू लागला.

प्रभु येशूंनी योहानला कठोरपणे झिडकारले नाही—परंतु देव काय करत होता याकडे त्याचे लक्ष परत वळवून त्याची दृष्टी सुधारली, योहान काय अनुभवत होता याकडे नव्हे (मत्तय 11:4–6).

ठेस (दुखावलेपणा) देवाला अविश्वासू वाटू देऊ शकतो

ठेसची (दुखावलेपणाची) एक सूक्ष्म खोटी कुजबुज अशी असते: “जर देव खरोखर काळजी घेत असता, तर हे घडलेच नसते.” कालांतराने ठेस ( दुखावलेपणा) आपली देवविषयक समज (धर्मशास्त्रीय) बदलू शकते, विश्वासाला निराशेत आणि श्रद्धेला मूक कटुतेत रूपांतरित करते.

स्तोत्रकर्त्याने या तणावाशी प्रामाणिकपणे झुंज दिली:

“माझे पाय तर जवळजवळ घसरले होते… कारण मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो” (स्तोत्र 73:2–3).

तरीही स्पष्टता तेव्हाच परत आली, जेव्हा तो देवाच्या उपस्थितीत गेला. दृष्टी वेदना पुन्हा पुन्हा आठवल्याने मिळत नाही, तर सत्याशी पुन्हा एकरूप झाल्याने मिळते.

क्रूसावर ठेस (दुखावलेपणा) आपली शक्ती गमावते. जेव्हा प्रभु येशू स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये लटकवले गेले, तेव्हा त्यांनी प्रार्थना करत म्हटले:

“पिता, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही” (लूक 23:34).

क्षमा म्हणजे वेदनांचा इन्कार नाही—तर वेदनांना आपली दृष्टी ठरवू न देण्याचा निश्चय आहे. क्रूस आपल्याला आठवण करून देतो की गोष्टी अन्यायकारक, विलंबित (उशिरा झालेल्या) किंवा गैरसमज झाल्यासारख्या वाटत असतानाही देव कार्यरत असू शकतो.

प्रेरित पौल जाहीर करतात:

“कारण आमचा क्षणिक व हलका क्लेश आमच्यासाठी फारच मोठी आणि अनंत महिमा निर्माण करीत आहे” (2 करिंथकर 4:17).

ठेस (दुखावलेपणा) क्षणाला मोठे करून दाखवते; विश्वास परिणाम पाहतो.

तुमच्यासाठी एक प्रश्न

या प्रवासात पुढे जाताना, चला आपण स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारूया:
ठेसमुळे (दुखावलेपणामुळे ) मी देवाला, लोकांना किंवा स्वतःकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली आहे का?

Bible Reading Genesis 19-21
प्रार्थना
हे प्रभु, माझी आत्मिक दृष्टी शुद्ध कर. ठेसचा (दुखावलेपणाचा) प्रत्येक चष्मा दूर कर आणि माझ्या हृदयात स्पष्टता, सत्य आणि शांती पुन्हा स्थापित कर. येशूच्या नावाने. आमेन!


Join our WhatsApp Channel


Most Read
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
● वातावरणावर महत्वाची समज - २
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● एक घुंगरू व एक डाळिंब
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन