परमेश्वर इस्राएलराष्ट्रास म्हणाला हे बोलत, "मी तुला नांवाने हाक मारिली आहे, तूं माझा आहे" (यशया४३:१-२).
जनावरे सोडली तर एक नाव व्यक्तीला किंवा एका राष्ट्राला ओळख देते व स्थिर करते.
जेव्हा परमेश्वराला इस्राएल मध्ये अहरोनाच्या पुढारीपणाला स्थिर करावयाचे होते, तेव्हात्याने इस्राएल लोकांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घेतल्या आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नाव लिहा असे म्हटले (गणना १७:१-२). एक नांव हे व्यक्ति, कुटुंब किंवा वंशाची ओळख आहे.
जेव्हा आपण कोणाला त्याच्या नांवाने हाक मारतो, आपण केवळ नाव बोलत नाही. आपण त्याच्याविषयी काहीतरी घोषित करीत आहोत. ह्यामुळेच परमेश्वराने नेहमी एखादया व्यक्तीला आशीर्वाद देण्याअगोदर त्याचे नाव बदलण्याचा निर्णय केला आहे. उदाहरणार्थ, परमेश्वराने अब्राम चे नाव अब्राहाम केले (अनेक राष्ट्रांचा पिता). परमेश्वराने याकोबाचे नाव इस्राएल (देवा बरोबर राजकुमार) असे बदलले.
त्याच प्रमाणे, जेव्हा आपण येशूचे नाव बोलतो, आपण केवळ नाव बोलत नाही. आपण ते नाव घोषित करीत आहोत ज्यात सामर्थ्य आहे-मानवी सामर्थ्य नाही, परंतु देवाचे सर्व सामर्थ्य व अधिकार. (कलस्सै २:९-१०)
जेव्हा आपण नाव बोलतो, आपण त्या व्यक्तीचे वर्णन करीत आहोत. येशूनावाचा अर्थ तारणारा आणि आपण त्यास त्यानुसार बोलत आहो जे तो आपल्यासाठी करतो-तोआपल्याला पाप, आमचे अपयश, आमच्या चुका आणि आमच्या परिस्थितीपासून सोडवितो ज्या त्याच्या इच्छेमध्ये नाहीत. (मत्तय १:२१ पाहा.)
बायबल आपल्याला शिकविते की येथे दुसरे कोणतेही नाव नाही जे येशूच्या नांवापेक्षा श्रेष्ठ आहे. ते आपल्याला शिकविते की येशूच्या नांवाचा उल्लेख केल्यावर प्रत्येक निर्मितसृष्टीने झुकावे, कारण येशूच्या नावाला स्वर्ग, पृथ्वी व पृथ्वीच्या खाली सामर्थ्य व अधिकार आहे. (फिलिप्पै २:९-१०)
अनेक वर्षांपूर्वी, मला आमंत्रण दिले होते की भारतातील एका दुर्गम भागातील एका लहान गावात शुभवर्तमान प्रसार सभा घ्यावी. एक मोठा लोकसमुदाय हा एकत्र झाला होता.
शुभवर्तमानाचे काही शत्रू सुद्धा एकत्र आले होते व सभेमध्ये अडथळा करण्याची योजना आखत होते. आयोजक हे खूपच निराश झाले होते कारण हे वैयक्तिक लोक काही वाईट शब्द ओरडून बोलत होते आणि वाईट हावभाव करीत होते. त्याक्षणी परमेश्वराने मला म्हटले की संदेश हा थांबवावा आणि येशूच्या नांवात अंधाराच्या शक्तीला झिडकारावे. काय अपेक्षा करावी हे न जाणता, मी ती आज्ञा पाळली. मी तसे करतो न करतोच, ताबडतोब एक स्त्री समोर पळत आली व बोलली, "माझ्यामानेला काही गाठ आली होती आणि ती आता तेथे नाही." अनेक या स्त्रीला ओळखत होते आणि निश्चित केले की वास्तवात तिला गाठ होती आणि आता ती तेथे नाही. संपूर्ण सभेचे वातावरण बदलले. लोक जे त्या सभेला अडथळा करण्यास आले होते ते सुद्धा सभे मध्ये सामील झाले आणि नंतर प्रार्थने साठी विनंती केली.
आपण जेव्हा आदराने येशूचे नांव वापरतो, इतरांना आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य,सामर्थ्य जे आपल्या स्वतःसाठी साहाय्य आणते ते उपलब्ध होते. मी तुम्हाला विनंती करतो की येशूचे अनमोल नाव वापरा. तुमचीपरिस्थिती त्या नावाला त्यांचे गुडघे टेकवेल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला जी तुझ्या वचनाच्या विरोधात आहे मी तिला आदेश देत आहे की ती येशूच्या नावाखाली ती गुडघ्यावर यावी. मी येशूच्या नांवाला गौरव व स्तुति देतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● दिवस १६ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
● महान पुरस्कार देणारा
● धन्य व्यक्ती
● तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
टिप्पण्या