डेली मन्ना
कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
Wednesday, 17th of April 2024
29
19
724
Categories :
कामाची जागा
आजच्या स्पर्धात्मक वातावरणात, पुष्कळ लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. ते ओळख, उन्नती आणि यशाचा धावा करतात. तथापि, देवाच्या दृष्टीसमोर खरोखर प्रसिद्ध होण्याचा मार्ग हा नेहमीच जगाच्या यशाच्या परिभाषेनुसार नसतो. आपल्या कामात उत्कृष्ट करणे आणि प्रभूपासून कृपा मिळवून घेण्याविषयी बायबल काय शिकवते त्याचे स्पष्टीकरण पाहू या.
चारित्र्याचे महत्व
“पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, ‘तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७)
आपले बाह्य स्वरूप किंवा प्राप्तीपेक्षा देव आपल्या चारित्र्यास अधिक मूल्यवान समजतो. जेव्हा कामाच्या ठिकाणी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे महत्वाचे आहे की तसे हृदय विकसित करावे जे देवाला प्रसन्न करते. म्हणजे प्रामाणिकता, नम्रता आणि कामात दृढ नैतिकता जोपासणे आहे.
लोकांना-प्रसन्न करण्यामधील धोके
“दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषवणाऱ्या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.” (कलस्सै. ३:२२)
जेव्हा मांजरी दूर निघून जातात, तेव्हा उंदीर खेळू लागतात हे कामाच्या ठिकाणी देखील खरे आहे. जेव्हा अधिकारी दूर निघून गेला आहे, तेव्हा कर्मचारी भरकटलेले राहतात. तथापि अशी वृत्ती अप्रामाणिक आणि ढोंगीपणाची आहे. देव आपल्याला मनापासून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी बोलावतो, केवळ इतरांवर छाप पाडण्यासाठी नाही. जेव्हा आपण मनुष्यापेक्षा देवाला प्रसन्न करण्यासाठी काम करतो, तेव्हा आपण खरे चारित्र्य आणि प्रामाणिकपणा दर्शवत असतो.
याकोबाचे उदाहरण
“परमेश्वराने याकोबाला सांगितले की, ‘तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.” (उत्पत्ती ३१:३)
याकोबाची गोष्ट कठीण परिस्थितीत देखील परिश्रमपूर्वक काम करण्याच्या महत्वाला स्पष्ट करते. त्याचा मालक लाबान कडून वाईट वागणूक दिली जात असतानाही, याकोब त्याच्या कामात विश्वासू राहिला. त्याने भरवसा ठेवला की त्याची उन्नती आणि यश हे मनुष्याकडून नाही, तर परमेश्वराकडून येईल. परिणामस्वरूप, देवाने याकोबाला आशीर्वादित केले, आणि त्याला त्याच्या देशात जाण्यास सांगितले, जेथे तो एक महान राष्ट्र होणार होता.
परमेश्वरासाठी काम करत आहोत म्हणून करा
“आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.” (कलस्सै. ३:२३-२४)
कामाच्या ठिकाणी प्रसिद्ध होण्याची किल्ली ही प्रभूसाठी म्हणून काम करत राहा. याचा अर्थ प्रत्येक दिलेल्या कामात पूर्ण प्रयत्न करत राहा, मग ते किती लहान किंवा मोठे दिसत असेन याची पर्वा नाही. जेव्हा आपण उत्कृष्टतेने आणि परिश्रमपूर्वक काम करतो, तेव्हा आपण देवाचा आदर करतो आणि त्याच्यासाठी आपली प्रीती दर्शवतो. आपली प्रेरणा ही देवाला प्रसन्न करण्यासाठी असावी, इतरांकडून ओळख आणि पुरस्कार मिळवण्यासाठीच नसावी.
उन्नत्तीसाठी देवावर भरवसा ठेवावा
“कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे; तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो.” (स्तोत्र. ७५:६-७)
शेवटी, आपले यश आणि उन्नती ही देवाकडूनच येतात. जेव्हा आपण त्याच्यावर भरवसा ठेवतो आणि आपल्या कामात त्याला प्रसन्न करण्यास पाहतो, तेव्हा तो द्वार उघडेल आणि आपल्यावर कृपा करेल. पृथ्वीवरील आपले मालक आपले प्रयत्न ओळखण्यास चुकले तरी, आपण आत्मविश्वास ठेवू शकतो देव आपला विश्वासूपणा पाहतो आणि योग्यवेळी आपल्याला पुरस्कृत करेल.
तर मग, कामाच्या ठिकाणी प्रसिद्ध होणे हे लोकांकडून प्रशंसा प्राप्त करून घेण्याबद्दल नाही तर त्याऐवजी परिश्रमपूर्वक प्रभूसाठी काम करण्यात आहे. जेव्हा आपण चारित्र्याला प्राधान्य देतो, लोकांना प्रसन्न करण्याच्या मोहाचा प्रतिकार करतो, आणि आपल्या उन्नतीसाठी देवावर भरवसा ठेवतो तेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी खरे यश आणि परिपूर्णता प्राप्त करू शकतो.
अंगीकार
मी आपली दृष्टि पर्वतांकडे लावितो; मला साहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते, जो माझ्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे. (स्तोत्र १२१:१-२; इब्री १२:२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे● आपण वर घेतले जातील (रैप्चर) तयार आहात का?
● विश्वास काय आहे?
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
● धन्यवादाचे अर्पण
● विश्वासाची शाळा
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
टिप्पण्या