डेली मन्ना
बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
Friday, 5th of April 2024
29
19
873
Categories :
वचन कबूल करणे
बायबल उत्पत्ति १:१ मध्ये म्हणते, "प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वीही उत्पन्न केली." मग ते पुढे असे म्हणते, "आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता." (वचन २)
उत्पत्ति १:१-२ मध्ये वर्णन केलेली परिस्थिती ही गोंधळपणा चित्रित करते. तुमचे जीवन, तुमचे घर, तुमचे वैवाहिक जीवन हे गोंधळाच्या स्थितीत असू शकते जेव्हा तुम्ही हे वाचतच आहात. तुमच्या आंतरिकतेमधील प्रश्न आक्रोश करतो, "मी ह्या परिस्थिती मधून कसा बाहेर येऊ शकतो?" माझ्या दु:खाचा कधी अंत होईल काय? सुवार्ता ही आहे की आपल्याला उपाय साठी वचनाकडे पाहण्याची गरज आहे.
मग परमेश्वराने म्हटले, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. (उत्पत्ति १:३)
लक्षात घ्या, देवाने म्हटले, आणि ते अस्तित्वात आले. मला येथे तुमचे लक्ष एका सामर्थ्यशाली सिद्धांताकडे न्यायचे आहे.
स्वाभाविक मनुष्य पाहणे, ऐकणे व जाणीव करणे इत्यादी जे तो करू शकतो त्याविषयी बोलतो. स्वाभाविक मनुष्य मग हे सर्व त्याच्या मुखातून बोलतो. मग पेरणी व कापणीच्या नियमानुसार, जितके अधिक तो ज्यावर बोलतो, आणि त्यास कसे वाटते, तितकेच अधिक तो ते प्राप्त करतो.
तथापि, आध्यात्मिक मनुष्य देवाचे वचन त्याच्या आंतरिक मनुष्यत्वात घेतो आणि मग ते त्याच्या मुखातून बाहेर काढतो. ह्या बोललेल्या शब्दाला परिस्थिती बदलण्याचे क्रियाशील सामर्थ्य आहे. ही तीच क्रियाशील शक्ति आहे जिने विश्व निर्माण केले, आजारी लोकांना बरे केले, आणि मृत्युमधून लोकांना उठविले. बोललेल्या शब्दाला आपली परिस्थिती बदलण्याचे आणि आपल्या गोंधळातील जगाला पुन्हा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.
तथापि मला तुम्हाला हा इशारा दिला पाहिजे की सैतान हा ह्या सिद्धांता विषयी पूर्णपणे जाणून आहे आणि तो ते सर्व प्रयत्न करेन की परमेश्वर काय बोलत आहे त्यापेक्षा तुम्ही काय पाहत आहा व तुम्हाला कसे वाटते हे तुम्हाला म्हणावयास लावण्याद्वारे अडथळा करेन. हे मग ह्याक्षणी, देवाच्या आश्वासनावर स्थिर राहण्याऐवजी अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात करू लागतात.
सैतानाच्या ह्या योजनेचा आपण कसा विरोध करू शकतो?
देवाच्या वचनात खोलवर जाण्याद्वारे आपण त्याचा विरोध करू शकतो. मत्तय १२:३४-३५ मध्ये प्रभु येशूने परुश्यांना बोलताना असे म्हटले, "अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंत:करणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो."
देवाचे वचन बोलणे हा काही नवीन विषय नाही आणि त्याचा परिणाम हा आपल्या सातत्यात असतो. आपण एक परिपक्व ख्रिस्ती म्हणून, आपण देवाची आश्वासने केवळ सकाळी नाही म्हटली पाहिजेत आणि मग दिवसा जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा, जे आपल्याला वाटते ते बोलावे. त्याऐवजी आपण आपल्या मुखावर सतत पहारा ठेवावा, की परिस्थिती विषयी सतत परमेश्वर काय बोलत आहे केवळ तेच बोलावे; प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, दिवसेंदिवस.
प्रार्थना
पित्या, ते शब्द जे विनाश आणते त्याऐवजी जीवन-देणारे शब्द सतत निवडण्यासाठी मला साहाय्य कर. मी विश्वास ठेवतो की आशाहीन परिस्थितीत सुद्धा तुझ्या वचनाला सामर्थ्य आहे की गोष्टी बदलाव्या.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● ते खोटेपण उघड करा
● उपासनेच्या चार मुख्य गोष्टी
● दिवस ०३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या