तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दया की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. (मत्तय ५:१६)
एकदा की तुम्ही शिकला की दररोजच्या आधारावर परमेश्वराच्या उपस्थिती मध्ये प्रवेश करावा, तुम्ही पुन्हा तसेच राहणार नाही. परिस्थिती व गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीकोनातून पूर्णपणे वेगळ्या दिसतात. ते तुम्ही कसे आचरण ठेवता, तुम्ही कसे बोलता वगैरे मध्ये पूर्ण बदल करेल. दुसऱ्या शब्दात आतापर्यंत तुम्ही कसे जगत आहात त्यामध्ये ते बदल करेल. एस्तेर एक साधारण मुलगी जिने संपूर्ण वर्ष तयारी केली की राजाबरोबर एक रात्र घालवावी.
तिला शास्वती नव्हती की त्या भेटी नंतर ती त्यास पुन्हा पाहू शकेन. परिणामाचा विचार न करता, तिने स्वतःला तयार केले. ज्याक्षणी तिची तयारीची वेळ पूर्ण झाली होती, तिला राजाच्या उपस्थिती मध्ये नेण्यात आले आणि तेव्हापासून ती आता एक वर्चस्व केलेल्या राष्ट्रातील 'शेतकरी मुलगी' राहिली नव्हती तर ती एक राणी होती. त्यादिवसापासून ती राणी झाली आहे असे ती चालत, बोलत व स्वतः तसे आचरण ठेवीत होती. तिची तयारी ही तिची जीवनशैली झाली होती.
लक्षात घ्या, उपासना हे केवळ काहीतरी नाही जे एका प्रार्थना सभे मध्ये किंवा एक किंवा दोन तासाच्या उपासने मध्ये घडते, किंवा तेव्हा जेव्हा आपण एकटेच परमेश्वराच्या उपस्थिती मध्ये वेळ घालवितो. ते आपली जीवनशैली झाले पाहिजे. जेथेकोठे तुम्ही जाल, जे काही तुम्ही कराल, त्यामध्ये उपासनेचा सुवास हा असला पाहिजे-याची पर्वा नाही की परिस्थिती काय आहे. कारण राजा त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये जुळलेला आहे, जेथे कोठे आपण जातो तेथे आपण त्याची उपस्थिती घेऊन जातो. त्यामुळे, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण हे उपासने साठी एक संधी व कारण व्हावे.
उपासना ही आपण काय करतो ते नाही; तर आपण कोण आहो! आपण स्वभावाने उपासक आहोत. राजाचे कृपायुक्त, आपले संपूर्ण जीवन हे उपासनेचे निरंतर कार्य असले पाहिजे! मत्तय ५ मध्ये, प्रभु येशूने उपासकाच्या गुणधर्माचे वर्णन केले आहे. त्याने म्हटले की ते आत्म्याने दिन आहेत. शोक करणारे (जगाच्या पापावर), नम्र (सौम्य), धार्मिकतेचे भुकेले व तहानेले, दयाळू, अंत:करणाचे शुद्ध, व शांति करणारे आहेत. त्याने हे सुद्धा म्हटले की त्यांचा धार्मिकतेसाठी छळ केला गेला आहे. थोडक्यात, ते त्यांचा पिता-राजा चे गुणधर्म प्रदर्शित करतात.
दुसऱ्या शब्दात, जे काही आपण करतो किंवा बोलतो याने त्याचे नांव व चारित्र्याचे तेज प्रगट केले पाहिजे. आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारा: माझे दररोज चे जीवन हे उपासनेचे निरंतर कार्य आहे काय? माझे बोलणे व आचरण हे लोकांना प्रभु येशू कडे आकर्षित करीत आहे काय किंवा त्यांना दूर नेत आहे? असे होवो की तुमचा प्रकाश हा चमको.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
लूक ९-१४
प्रार्थना
पित्या, मी तुला मागत आहे की माझे संपूर्ण अंत:करण, मन व शक्तीने तुझी उपासना करावयास प्रेरित कर. उपासनेच्या जीवनशैलीत चालण्यास मला चालना दे. जे सर्व काही मी करतो किंवा बोलतो त्याने तुजे तेज व चारित्र्य प्रतिबिंबित करावे की लोक प्रभु येशूकडे आकर्षित होतील. असे होवो की माझा प्रकाश चमको. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे # ३● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● धन्य व्यक्ती
● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● पापी रागाचे स्तर उघडणे
टिप्पण्या