परंतु पेत्र दुरून मागे मागे चालत होता. (लूक २२: ५४)
येथे काही आहेत जे येशू बरोबर चालतात आणि येथे काही आहेत जे येशूच्या मागे दुरून चालतात. मी भौतिक जवळीक बद्दल बोलत नाही. काही हे भौतिकदृष्ट्या येशूच्या अगदी जवळ होते परंतु त्यांची अंत:करणे ही त्याच्यापासून फार दूर होती. (मत्तय १५: ८)
तुम्ही ही म्हण ऐकली आहे काय, "इतके जवळ तरीही कितीतरी दूर" तुम्ही अगदी चर्च मध्ये बसला असाल आणि तरीही चर्च च्या प्रभु पासून फार दूर असाल.
पेत्रा प्रमाणे येथे अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे येशूच्या मागे दुरून चालत आहेत. त्यांनी येशूचा त्याग केलेला नाही. हे केवळ असे आहे की त्याच्यामागे चालणे हे त्यांना उत्साहपूर्ण किंवा उत्तेजनापूर्ण वाटत नाही.
काय कारण होते ज्याने पेत्राला येशूच्या मागे दुरून चालावयास लावले? मला वाटते हे सुरक्षित असेन असा निष्कर्ष काढावा की पेत्राने त्याच्या प्रिय पुढाऱ्यास काय घडत आहे याबद्दल समजले नाही. तो केवळ एक पुढारी असण्यापेक्षा अधिक होता-तो तारणारा होता.
जेव्हा हे कठीण आहे हे समजणे की परमेश्वर काय करत आहे, तर ते लुभावते की येशू पासून दूर राहावे. ही आपली निवड आहे, की येशू बरोबर घनिष्ठतेत चालावे जरी जेव्हा काहीही समजत नाही किंवा त्याच्या मागे दुरून चालावे. तथापि, पवित्र शास्त्र सतत आपल्याला आवाहन देते की देवाकडे यावे आणि त्यापासून दूर राहू नये. (याकोब ४: ८)
तुम्ही येशूच्या मागे दुरून चालत आहात काय? तुम्ही त्या अंतराला असे करू दिले आहे की त्याच्यावर विश्वास ठेवू नये? तुमच्या दुरून चालण्याने त्याच्यासाठी पूर्णपणे न जगण्याद्वारे येशूचा नकार करण्यास सुरुवात करून दिली आहे काय?
सुवार्ता ही आहे की येशूने तुम्हांवर प्रेम करण्याचे थांबविलेले नाही आणि तो वाट पाहत आहे की त्याच्याबरोबर ती संगती पुन्हा एकदा स्थापित करावी. येशूने पेत्राला पुनर्स्थापित केले, आणि त्यानंतर पेत्राने कधीही मागे वळून पाहिले नाही (योहान२१:१५-१९). जेव्हा येशूने पेत्राला पुनर्स्थापित केले, त्याने म्हटले, "माझ्यामागे ये" (योहान २१: १९).
प्रार्थना
प्रभु येशू, मला कृपा पुरीव की सर्व परिस्थितीमध्ये तुझे वचन पाळावे म्हणजे मी दररोज घनिष्ठतेत तुझ्यामागे चालावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपे मध्ये वाढणे● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
● देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा
● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● विश्वासाची शाळा
● प्रभू येशू द्वारे कृपा
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
टिप्पण्या