डेली मन्ना
देवाचा आरसा
Tuesday, 10th of September 2024
20
18
243
Categories :
ख्रिस्तामध्ये आमची ओळख
सध्याच्या संशोधनानुसार, स्त्रिया आरश्यात 38 वेळा पाहतात आणि प्रतिदिवशी अधिक. पुरुष सुद्धा फार मागे नाही आणि जवळजवळ 18 वेळा किंवा दिवसातून अधिक वेळा असे करतात.
तथापि, अभ्यास हे दाखवितो स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा त्यांच्या दिसण्यामध्ये अधिक विवेचनात्मक अशा आहेत. जरी हे संशोधन काही गोष्टीमध्ये चांगले नसेन परंतु सामान्यपणे म्हटले तर, आपल्यापैकी अनेक हे दिवसातून अनेक वेळेला आरश्यात पाहतात. हे याची खात्री करण्यासाठी की आपण प्रसंगासाठी योग्य असे दिसत आहोत. अनेक वर्षांमध्ये, आपण हे शिकलो आहे की आरसा आपल्याला काय सांगतो. जर काहीतरी जे योग्य नाही, आपण ताबडतोब ते दुरुस्त करतो.
आजच्या सेल्फी आणि फिल्टर च्या जगात,खरी सुंदरता काय आहे याबद्दल दु:खदपणेआपणया विकृतव्याख्ये पर्यंत आलो आहे. खरी सुंदरता ही सध्याचे मासिके काय सांगते ते नाही.
अशी सुंदरता केवळ त्वचे पुरतीच आहे आणि ती कोणाला काही लाभ देत नाही. आपल्याला आपले मन नवीन करावयाचे आहे आणि बायबल कशाला खरी सुंदरता म्हणते त्याकडे पाहावयाचे आहे.
"तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोषाक करणे ह्यांत बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमुल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी" (1 पेत्र 3:3-4).
मी विश्वास ठेवतो वरील वचन हे केवळ स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांना सुद्धा लागू आहे. लोकांची केवळ त्यांच्या दिसण्यावरून वर्गवारी करू नका. तसेचअस्वीकृत असे वाटू देऊ नका कारण तुम्हाला तसा चेहरा नाही जसे मासिके म्हणते ते तुम्हाला असावयास होते. तुमचे बोलणे, सौम्यपणा, दयाळूपणा आणि विश्वासूपणा कडे लक्ष दया. केवळ त्वचेच्या सुंदरते पेक्षा हे गुण अधिक मौल्यवान आहेत.
याकोब 1:23 म्हणते, देवाचे वचन हा आरसा आहे. प्रतिदिवशी देवाच्या आरश्यात पाहा आणि पाहा त्याच्या वचनाला तुमच्या विषयी काय बोलावयाचे आहे.
इफिस 2:10 म्हणते, "आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो; ती सत्कृत्ये आचरीत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली."
स्तोत्रसंहिता 139:13-14, "तूच माझे अंतर्यामनिर्माण केले; तूचमाझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे."
तुम्हाल असे वचन विश्वासाद्वारे स्वीकारावयाचे आहे आणि त्यानुसार कार्य करावे. प्रतिमा जी तुमची तुमच्या आतमध्ये आहे ती हे नवीन करेल.
आपल्यातील प्रत्येकाला वरदान आणि योग्यता ह्या दिल्या गेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत, का नाही त्यानुसार कार्य करावे, तुम्ही ह्या अंधाऱ्या जगात चमकण्यास सुरुवात कराल. एखादया कवचा मध्ये जाऊ नका. बाहेर जा आणि येशू साठीचमका.
आता मी समजतो की आपली शरीरे ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणियोग्य भोजन आणि व्यायाम द्वारे आपण आपल्या शरीराची निश्चितच काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्याला व्यवस्थित पोशाख हा घातला पाहिजे वगैरे. परंतु आपली योग्यता आणि सुंदरता तेच काय ते व्याख्यीत करीत नाही. तुम्ही ते आहात जे देव बोलतो तुम्ही आहात. देवाचा आरसा खोटे बोलत नाही.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,जसे तू मला पाहतो तसे स्वतःला पाहण्यात मला साहाय्य कर.
देवाच्या पवित्र आत्म्या, तुझ्या वचनाद्वारे तुझ्यामध्ये माझी ओळख आणि पात्रता पाहण्यास माझे नेत्र उघड. येशूच्या नांवात. आमेन.
देवाच्या पवित्र आत्म्या, तुझ्या वचनाद्वारे तुझ्यामध्ये माझी ओळख आणि पात्रता पाहण्यास माझे नेत्र उघड. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● पुढच्या स्तरावर जाणे
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
टिप्पण्या