डेली मन्ना
पृथ्वीवरील राजांचा अधिपती
Sunday, 30th of June 2024
22
18
421
Categories :
ख्रिस्ताची देवता
आणि 'विश्वसनीय साक्षी', मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला' व'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांस कृपा व शांति असो. जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला 'पातकातून मुक्त केले'. (प्रकटीकरण १:५)
वरील वचनात प्रभु येशूला दिलेले तिसरे नाव हे:'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' आहे.
जेव्हा आपण जग ज्या गोंधळात आहे ते पाहतो,कधीकधी आपल्याला त्यावर विश्वास ठेवण्यास कठीण जाते की ख्रिस्त हा प्रत्यक्षात 'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' आहे. हे या कारणासाठी की जरी ख्रिस्ताला पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार आहे, तो यावेळेस राजे व राज्यांवर हा अधिकार दाखवीत नाही.
सैतानानेह्या जगावर राज्य करण्याचा तात्पुरताकायद्यात्मक अधिकार मिळविला आहे जेव्हा आदामाने एदेन बागे मध्ये त्यास देवाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन केले होते.
पवित्रशास्त्रातील खालील वचनाकडे पाहा:
मग सैतानाने त्याला [येशूला]उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली; आणि त्याला म्हटले, ह्यांवरचासर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनासयेईल त्याला मी हे देतो.
म्हणून तूं मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, 'परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,' असे शास्रात लिहिले आहे. (लूक ४:५-८)
जरी प्रभु येशूने सैतानाला हे अगदी स्पष्ट केले होते की उपासनेच योग्य कोण आहे, त्याने सैतानाच्या ह्या जगावरील तात्पुरत्या दाव्यावर वादविवाद केला नाही.
प्रभु येशूला ठाऊक होते जेव्हा वधस्तंभावरील त्याचे कार्य हे पूर्ण झाले, सैतान सुद्धा संपला होता! (योहान १२:३१ पाहा)
प्रभु येशू मृतामधून पुनरुत्थित झाल्यावर, त्याने घोषित केले, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे." (मत्तय २८:१८)
आज, प्रभु पृथ्वीवरील राजांचे हृद्य सुद्धा नियंत्रित करतो,
राजाचे मनपाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे.
त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो. (नीतिसूत्रे २१:१)
त्याचा अर्थ आपण आपल्या देशात देवाची इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या पुढाऱ्यांसाठीकी त्यांनी देवाचा धावा करावा व त्याचे ऐकावे यासाठी प्रार्थना केलीपाहिजे. आपण प्रार्थना केली पाहिजे की त्यांच्याभोवती ईश्वरीय सल्ले देणारे असले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे, की आपल्या पुढाऱ्यांनी व्यक्तिगतरीत्या देवाला ओळखावे व तारण हे केवळ येशू ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारेच मिळते हे जाणावे.
प्रार्थना
१. पित्या, ह्या देशात अंत:करणे पारखणारे, निडर विश्वास, व बुद्धिमान मन जे तुझ्या चारित्र्याच्या आदर्शां सह असतील असे पुढारी उत्पन्न कर.
२. पित्या, सामर्थ्य केवळ तुझ्याकडेच आहे की पुढाऱ्यांना वळवावे, आमच्या प्रार्थनांना ऐक की त्यांना योग्य दिशे मध्ये न्यावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चला आपण परमेश्वराकडे वळू या● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● स्वयं-गौरवाचा सापळा
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
टिप्पण्या