आता प्रत्येक स्पर्धक जो प्रशिक्षणात जातो स्वतःलासंयमीत ठेवून आचरण ठेवतो आणि स्वतःला सर्व गोष्टींमध्ये मर्यादेत ठेवतो. ते असे करतात की तो मुकुट प्राप्त करावा जो लवकरच नष्ट होतो, परंतु आम्ही तसे करतो कीसार्वकालिक आशीर्वादाचा मुकुट प्राप्त करावा जो कधीही नष्ट होणार नाही. (१ करिंथ ९: २४ ऐम्पलीफाईड बायबल)
आपण आपल्या शरीरास प्रशिक्षण दयावे आपणावर प्रभूता करण्यासाठी नाही म्हणजे आपण ख्रिस्त जो आपला प्रभु याच्या अधीनतेत राहावे. प्राचीन ग्रीस मध्ये, प्रशिक्षणास 'गुम्नोस' हा शब्द होता. या शब्दाचा शब्दशः अर्थ हा "नग्न." वास्तवात, ह्या ग्रीक शब्दावरून आपण इंग्रजी शब्द 'जीम्नाशियम' हे काढतो.
प्राचीन ग्रीक संस्कृती मध्ये त्यांनी असे गृहीत धरले होते की स्वतःला सर्व गोष्टींपासून मुक्त केल्यानंतर, जे त्यांना अडथळा करते, ते त्यांना पूर्णपणे सामर्थ्याने प्रशिक्षित करू शकतात. म्हणून, ते नग्न होऊन कसरत करतात किंवा प्रशिक्षण घेतात. हे असे मी कोणत्याही प्रकारे सल्ला देत नाही, तरी सिद्धांत हा लक्षात घेण्याजोगा आहे.
एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या शरीराच्यागोष्टींपासूनअलिप्त व्हावयाचे आहे, जेणेकरून आपण आपल्या स्वतःला ईश्वरीय गुणाकडे प्रशिक्षित करू शकावे.
यास कठीण परिश्रम लागतात कीआपल्याला एका चांगल्या शरीरयष्टी मध्ये आणावे आणि एक चांगली शरीरयष्टी जपण्यास समर्पण लागते. त्याचप्रकारे, यास सुद्धा कठीण परिश्रम आणि समर्पण लागते की एक चांगली आध्यात्मिक स्थिती जपावी.
मोठी इच्छा आणि स्वप्ने असणे ही सुरुवात आहे परंतु ह्या सर्वांच्या शेवटी, जर कोणाला चांगल्या आध्यात्मिक स्वरुपात यायचे असेन, त्याने परिश्रमिक असले पाहिजे की स्वतःला आध्यात्मिकरित्या प्रशिक्षित करावे. ह्याचकारणामुळेप्रेषित पौलाने तीमथ्यी ला म्हटले,
"ईश्वरीयपणा (सुभक्ती) कडे स्वतःला प्रशिक्षित कर, [स्वतःला आध्यात्मिकरित्या दृढ ठेव] (१ तीमथ्यी ४: ७ ऐम्पलीफाईड). आपल्या स्वतःला ईश्वरीयपणाकडे प्रशिक्षित करणे हे आध्यात्मिकरित्या दृढ ठेवणे आहे.
त्यामुळे, कारणकीजेव्हा आपण विश्वासाच्या जीवनासाठी साक्षीदारांच्या एवढया मोठया संख्येने घेरलेले आहोत, चला आपण त्या सर्व ओझ्यांना काढून टाकावे जे आपल्याला मागे ओढते, विशेषतः पाप जे फार सहजपणे आपल्याला अडकवते. आणि चला आपण आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. (इब्री १२: १)
शरीराच्या कार्याकडून आपल्या स्वतःला अलिप्त करण्याद्वारे, आपण स्वतःला ईश्वरीयपणात चांगल्या प्रकारे शिस्तीत आणू शकतो. जेव्हा अनेक हे सोपा मार्ग पाहत असतात, तूं मात्र दृढ राहा की तूं तुझ्या जीवनातील हा समय तुझा विश्वास दाखविण्यास आणि प्रभु मध्ये बलशाली होण्यास उपयोगात आणावा.
अंगीकार
मी हे कबूल करतो की मी प्रभु मध्ये प्रबळ आणि प्रबळ होत आहे. मी निवड केली आहे की सर्व काही उपयोगात आणावे जे माझ्या जीवनात एक संधी म्हणून येते की माझ्या विश्वासाला व्यक्त करावे आणि माझ्या स्वतःला आध्यात्मिकरित्या विकसित करावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१● वातावरणावर महत्वाची समज - १
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● बुद्धिमान व्हा
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
टिप्पण्या