"आणखी तो म्हणाला, कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यापैंकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला दया. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली." (लूक १५:११-१४)
जेव्हा उधळा पुत्र पित्याच्या घरात होता, त्याने कधीही कोणत्याही प्रकारे कशाचाही अभाव अनुभव केला नाही. तेथे सर्व प्रकारे संपन्नता होती. तथापि, जेव्हा तो पित्याच्या घराकडून दूर निघून गेला, तो त्याच्या जीवनात अभाव व गरजा अनुभवू लागला.
दावीदाने हा सिद्धांत समजला आणि स्तोत्र २३:१ मध्ये लिहिले
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
मूळ अर्था मध्ये, जोपर्यंत परमेश्वर दावीदास मार्गदर्शन करीत होता, त्यास कशाचाही अभाव नव्हता. दावीदाने आणखी एका ठिकाणी लिहिले आहे: "तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही." (स्तोत्र ३४:१०)
येथे आणखी एक व्यक्ति होता ज्याचे नाव ओबेद-एदोम होते.
देवाच्या कराराचा कोश तीन महिने त्याने आपल्या घरात सांभाळू पर्यंत त्याच्याविषयी काही अधिक ठाऊक नव्हते आणि परमेश्वराने त्याच्या संपूर्ण घराण्याला आशीर्वाद दिला. ओबेद-एदोम हा आशीर्वादित आहे ही संपन्नता इतकी अधिक होती की ती राजाच्या [दावीद] कानी गेली.
ह्या शेवटच्या समयात आपण हे रहस्य समजले पाहिजे की ही देवाची उपस्थिती आहे जी आपल्याला अभाव व टंचाई पासून राखेल. आपण कधी नाही इतके परमेश्वराशी संबंध जोडले पाहिजे. अभाव व कमतरता कधीही तुमच्या पर्यंत येणार नाही.
अंगीकार
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; माझ्या जीवनात कशाचीही उणीव भासणार नाही. (हे सतत बोलत राहा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे प्रत्यक्ष गुणवैशिष्ट्ये● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
टिप्पण्या