जर तुम्हाला जीवनात मोठे होण्याची इच्छा आहे, तर तुमच्यावर सोपविलेल्या जबाबदारीमध्ये सर्वोत्तम ते नेहमीच करण्यास शिका, आणि त्यास उत्कृष्टरीत्या पूर्ण करण्यास शिस्तबद्ध राहा. (२ तीमथ्यी ४:६)
गोष्टी ज्या तुम्ही सध्या घरी, कामावर किंवा चर्च मध्ये करीत आहात त्याच्या तुलनेत इतर लोक ज्या उत्साहवर्धक गोष्टी कदाचित करताना दिसत आहेत त्या कदाचित नीरस अशा दिसत असतील. तरीसुद्धा, पवित्र शास्त्र म्हणते, "जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर" (उपदेशक ९:१०). सेवा करण्यासाठी पदाची अपेक्षा करू नको. कोणतेही पद नसताना देखील सेवा करा-ती जबाबदारी आहे.
दाविदाने त्याच्या पित्याची मेंढरे राखण्यासाठी मोठी जबाबदारी दाखविली तरीही नियुक्त कार्य हे त्याच्या भावांच्या कार्याप्रमाणे उत्साहवर्धक असे दिसत नव्हते, जे राजाच्या सेनेमध्ये युद्ध करीत होते. ८ पुत्रांच्या कुटुंबामध्ये मला हे अद्भुत असे दिसते की त्यांच्यापैकी सर्वात धाकटा पुत्र कुटुंबाच्या मेंढरांची राखण करण्यास तयार आहे.
दावीद जरी युद्धाच्या ठिकाणी गेला होता, तेव्हा त्याने मेंढरांची काळजी घेण्यास इतर कोणत्याही भावाच्या हवाली केले नाही, तर मेंढपाळाकडे दिले होते:
१ शमुवेल १७:२० म्हणते, "दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून इशायाने त्यास सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तु घेऊन गेला."
तुम्ही जेव्हा कंटाळवाणे व नित्याचे दिसणारे काम दिवसरात्र विश्वासुपणे व परिश्रमपूर्वक करता, तेव्हा ते तुमच्यामध्ये एक दुर्मिळ गुणधर्मास जन्म देते ज्यास "जबाबदारी" म्हणतात. ते तुमच्या डीएनए मध्ये अक्षरशः निगडीत असते.
पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणते, "जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे" (लूक १६:१०).
दुसरे, जेव्हाकेव्हा तुम्हाला सेवा करण्याची संधी आहे, तेव्हा नेहमीच सर्वोत्तम असे करा की तो एकमेव व्यक्ति व्हावे ज्यावर अवलंबून राहणे व विश्वास ठेवू शकतात. त्याव्यक्तीसारखे होऊ नका जे गोष्टींना प्रथम सुरुवात करतात पण त्यास कधीही पूर्ण करीत नाहीत. त्याऐवजी, तो व्यक्ति व्हा जो सुरु करतो व योग्यपणे पूर्ण करतो.
ही चारित्र्याची गुणधर्में आहेत जी तुम्हांला महान लोकांसमोर आणतील आणि तुम्हांला कायम राहणारे यश देईल. जेथेकोठे तुम्ही जाता तेथे ही गुणधर्में तुम्हांला केवळ यशच देणार नाही, परंतु तुम्ही जे करता व तुम्ही जे बोलता त्यामध्ये लोक विश्वास ठेवण्यास सुरु करतील. हे तुम्हांला प्रभु येशूचे शुभवर्तमान मोठया प्रभावाने पसरविण्यास साहाय्य करील.
म्हणून मग, तुमच्या वाटेला जी जबाबदारी येते तीचा तिरस्कार करू नका, ते किती क्षुल्लक व नित्याचे असे दिसते याची पर्वा करू नका. नेहमी हे लक्षात ठेवा की जे महान भविष्य तुमच्यापुढे आहे त्यासाठी देव तुम्हांला प्रशिक्षण देत आहे.
शेवटी, तुम्हांला तुमच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबावयाचे नाही. त्याऐवजी, तुम्हांला हे शिकावयाचे आहे की देवाला कसे शरण जावे. प्रार्थना, उपासना व देवाच्या वचनामध्ये स्वतःला दररोज सुसज्ज करण्याद्वारे तुम्ही तसे करू शकता जोपर्यंत बाहेरील गोंधळापेक्षा देवाची आतील शांति प्रबळ होत नाही.
यामुळेच प्रभु येशूने म्हटले, "मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही, तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये" (योहान १४:२७).
अतिरिक्त अभ्यासासाठी, पास्टर मायकल फर्नांडीस द्वारे "मेंढरांची पवित्र शास्त्रातून जबाबदारी" पाहा.
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानितो, की मी तुझ्या दृष्टीसमोर अनमोल आहे की मी तुझा जबाबदार सेवक आहे. तुझ्या गौरवाकरिता जी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे ती पूर्ण करण्यासाठी मला शिकीव. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपेचे माध्यम होणे● दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
● दिवस ०७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● बीभत्सपणा
● अन्य भाषेत बोला व प्रगती करा
टिप्पण्या