सध्याच्या वर्तमान पत्रात बातमी होती की दोन तरुण मुलांनी त्यांच्या वर्ग मित्राचा खून केला होता, कारण तो त्यांना धमकावत असे. त्यांनी बदला घेण्याच्या वृत्तीने त्याला ठार मारले, धक्कादायक!
शमुवेल २५:४-९ मध्ये, आपण पुढे हे जाणतो की दावीद स्वतः जबाबदारी घेऊन, नाबालचे सेवक व त्यांची गुरेढोरे धोक्यापासून वाचवीत होता. दावीद व त्याच्या सेवकांच्या संरक्षक उपस्थितीमुळे नाबाल हा त्याची संपत्ति वाढवित खुशाल व सुरक्षित होता. ह्यावेळे पर्यंत, दावीदाने त्याच्या बदल्यात काहीही मागितले नव्हते.
एके दिवशी दावीदाने त्याच्या व त्याच्या लोकांसाठी काही वस्तू मागितल्या. दावीद व त्याच्या लोकांनी त्यास जे सर्व काही चांगले केले होते त्यासाठी कृतज्ञ होण्याऐवजी, त्याने दावीद व त्याच्या लोकांचा अपमान केला. दावीदाने जेव्हा हे ऐकले, त्याला फार संताप आला व बदल्याच्या भावनेने त्याने नाबालाच्या घरच्या सर्व पुरुषांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. (१ शमुवेल २५: २१-२२)
तथापि, नाबालाची पत्नी, अबीगईल, ही दावीद व त्याच्या लोकांना मार्गात भेटली जे बदला घेण्यास जात होते. ह्या स्त्रीने दावीदाला म्हटले हे बोलत, "संताप करून घेऊ नका व बदला घेऊ नका. आतापर्यंत परमेश्वराने आपले सर्व युद्ध लढले आहेत, आणि म्हणून परमेश्वराला हे सुद्धा लढू दया. (१ शमुवेल २५:२४-३१ सारांशीत)
दावीदाने बुद्धीमत्तेपूर्वक तिचे म्हणणे मान्य केले आणि तो विषय परमेश्वराच्या हातात सोडून तेथून निघून गेला. नंतर, तिने जे केले ते नाबाल ला जेव्हा सांगितले, "तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला. नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला को तो मृत्यू पावला (१ शमुवेल २५:३७, ३८). परमेश्वराने दावीदाच्या वतीने बदला घेतला.
परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही (प्रेषित १०:३४). तो पक्षपाती परमेश्वर नाही (रोम १२:११). जे त्याने दावीद साठी केले, तो ते तुमच्या व माझ्यासाठी सुद्धा करेल.
काही वेळ येते जेव्हा आपल्याला कोणाद्वारे फार संताप होतो आणि आपली अंत:प्रेरणा पेटून उठते. स्वाभाविकपणे बदला घेणे असे आपल्याला वाटते. सिनेमा व खेळाचे ऐप आपल्याला ह्यासाठी निरंतर प्रेरणा देतात की "वाईट लोकांना फटके दयावे". आपला पतित स्वभाव आपल्याला सांगतो की तेथे विजय आहे जेव्हा आपल्या "शत्रूला शिक्षा होते", किंवा "त्यास काढून टाकण्यात येते."
तथापि, परमेश्वर त्याच्या लोकांना काहीतरी अद्भुत करण्यास सांगत आहे, "प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट दया; कारण असा शास्त्रलेख आहे की, 'सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,' असे प्रभु म्हणतो" (रोम १२:१९). जेव्हा दुसऱ्याद्वारे आपल्यावर अन्याय केला जातो, चला आपण परमेश्वरावर भरंवसा ठेवू की तो हिशेब घ्यावा.
आता, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या स्वतःचे समर्थन करू नये, मग ती आपली प्रतिष्ठा, भौतिक किंवा आर्थिक कल्याण असो. याचा अर्थ हा सुद्धा नाही की नागरिक अधिकाऱ्यास या चुकीची माहिती देऊ नये. हे सर्व मान्य आहे.
बायबल चा असे म्हणण्याचा काय अर्थ आहे तो हा की आपण संताप आल्यामुळे, रागाच्या भावनेने दुसऱ्यावर आक्रमण आणि नष्ट करण्यास पाहू शकत नाही. शेवटी परमेश्वर सर्व हिशेब ठीक करेल.
येशू जेव्हा वधस्तंभावर होता, "त्याची (येशूची) निंदा होता असतां त्याने उलट निंदा केली नाही; दु:ख भोगीत असतां त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे (पिता परमेश्वर)) स्वतःला सोपवून दिले. (१ पेत्र २:२३)
Bible Reading: Job 24-29
प्रार्थना
१. पित्या, बदला घेण्याच्या भावनेस सांभाळण्यास मला क्षमा कर. तुझ्या वचनात भरवंसा ठेवण्यास मला साहाय्य कर जे म्हणते, "बदला घेऊ नका पण त्याऐवजी देवाला तुमच्या वतीने बदला घेऊ दया."
२. प्रभु येशू, तूं शांतीचा राजकुमार आहे. असे होवो की तुझी शांती माझ्या हृदयात व माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागात राज्य करो. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आदर व ओळख प्राप्त करा● धैर्यवान राहा
● विचार करण्यास वेळ घ्या
● अडथळ्याचा धोका
● दैवीव्यवस्था-२
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
टिप्पण्या