डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस २०
Friday, 31st of December 2021
49
9
2424
Categories :
उपास व प्रार्थना
ओलांडून जाणे
एका क्षणी जेव्हा येशू शिष्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवण देत होता, त्याने त्यांना म्हटले, "चला आपण पलीकडे जाऊ या" (मार्क ४:३५). त्यास पाहिजे होते की त्यांना परिवर्तनामधून घेऊन जावे.
जेव्हा आपण २०२१ कडून २०२२ ओलांडून जात आहोत, याची खात्री करा की तुम्हाला तुमच्या जीवनात त्याचे सान्निध्य आहे. संपूर्ण दिवस उपास व प्रार्थना करीत घालवा.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
उपदेशक ७:८
नीतिसूत्रे २९:२५
नीतिसूत्रे २३:१८
यशया ४३:१९
इफिस ४:२२-२४
यिर्मया २९:११
प्रकटीकरण २१:५
धन्यवादाची प्रार्थना
पित्या, मी तुझी उपकारस्तुति करतो व तुला धन्यवाद देतो की माझ्या व माझ्या कुटुंबासोबत संपूर्ण २०२१ वर्ष राहिला.
पित्या, संपूर्ण २०२१ वर्षभरात तुझ्या संभाळ करणाऱ्या कृपे साठी तुझा धन्यवाद ज्याने मला साहाय्य केले.
पित्या, मी तुझा धन्यवाद करतो की तूं नेहमीच माझी हाक ऐकतो.
पित्या मी २०२२ वर्षासाठी तुझा धन्यवाद करतो ज्यात मी प्रवेश करीत आहे, येशूच्या नांवात मला व माझ्या कुटुंबासाठी हे वर्ष मोठया विजयाचे व नवीन द्वार उघडणारे असे कर.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही, केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा.
येशू च्या रक्ता द्वारे, २०२१ हे वर्ष मी शोकात व दु:खात संपविणार नाही परंतु येशूच्या नांवात आनंद व शांति मध्ये मी त्याचा शेवट करेन.
प्रत्येक दुष्ट शक्ति जी माझ्या नवीन वाटचाल विरुद्ध नियुक्त केली असेन ती येशूच्या नांवात पडो व नष्ट होवो.
कोणतीही शक्ति जी म्हणते मी व माझे कुटुंबीय २०२२ ह्या वर्षात पुढे प्रगती करणार नाही, ती येशूच्या नांवात अग्निद्वारे काढून टाकली जावो.
पित्या, येशूच्या नांवात, मी आदेश देत आहे जसे इस्राएली लोक त्यांच्या आश्वासित देशात ओलांडून गेले, मी सुद्धा पवित्र आत्म्यात आनंदाने व शांति मध्ये ह्या नवीन वर्षात ओलांडून जाईन.
येशूच्या नांवात, मी सर्व गोष्टींचा पाठलाग करतो, त्यावर प्रभुत्व करतो व ते प्राप्त करीत आहे, येशूच्या नांवात.
प्रत्येक सैतानी दोरी जी मला व माझ्या कुटुंबियांना भूतकाळात बांधून ठेवत आहे, येशूच्या नावात अग्निद्वारे तुटून जावो.
खात्रीने कल्याण व दया ही माझ्या व माझ्या कुटुंबीयांसोबत ह्यादिवसापासून पुढे व त्याही पलीकडे येशूच्या नांवात राहील.
पित्या येशूच्या नावात २०२२ ह्या नवीन वर्षभरात, असे होवो की तुझी दया मजपासून निघून न जावो, माझ्या व माझ्या कुटुंबियांवरून तुझ्या शांतीचा करार काढून टाकू नको.
२०२१ ह्या वर्षात ज्या प्रत्येक कठीण परिस्थितींना मी तोंड दिले आहे ते २०२२ मध्ये त्याचे विकृत रूप पुढे परत वर काढणार नाही, येशूच्या नांवात.
पित्या, येशूच्या नांवात, करुणा सदन सेवाकार्य ह्या देशाला व जगाच्या देशांसाठी आशीर्वाद होऊ दे.
२०२२ मध्ये माझी आशा ही भंग होणार नाही, परमेश्वराकडून जी मी अपेक्षा करीत आहे त्या प्रकटीकरणाचा अनुभव येशूच्या नांवात मी करीन.
२०२२ मध्ये माझ्या कुटुंबातील प्रत्येक तारण न पावलेले सदस्य तारण प्राप्त करतील, येशूच्या नांवात.
परमेश्वरा, आतापासून, तुझी वाणी अधिक स्पष्टपणे ऐकण्यास मला साहाय्य कर जेणेकरून माझ्या शारीरिक, आध्यात्मिक व वित्तीय जीवनात येशूच्या नांवात योग्य निर्णय करावे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
तुम्हाला हे २०२२ वर्ष आत्म्याने भरलेले व फलदायक होवो ही सदिच्छा मी व्यक्त करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे● संकटाच्या काळाकडे पाहणे
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या