आणि तो सर्वांसाठी ह्यांकरीता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. (२ करिंथ ५:१५)
असा विश्वास ठेवला जात आहेकी ख्रिस्ताच्या वेळे दरम्यान जवळजवळ ५००० विश्वासणारे होते. त्या विश्वासणाऱ्यांमध्ये तीन प्रकार होते. मोठया संख्येने असणारे विश्वासणारे हे ते होते जे येशू कडे केवळ तारणासाठी आले होते.केवळ तारण प्राप्त करावेयासाठी त्यांनी त्याची थोडीशी सेवा केली होती.खूपच लहान संख्या, म्हणा ५००, हे प्रत्यक्षात त्याच्या मागे चालले व त्याची सेवा केली. आणि मग येथे शिष्य होते. हे ते होते ज्यांनी येशू बरोबर ओळख दाखविली. येशू जे जीवन जगला, तसे जीवन ते जगले. ह्यापैंकी प्रत्येकजण शेवटी कठीण परिस्थिती मध्ये मरण पावले. त्यांनी संकटे, चमत्कार, वदेवा बरोबर मानवी रुपात संगती अनुभविली.
जर तुम्हाला म्हणावे लागले की कोणता गट तुमच्या जीवनास उत्तमरित्या सादर करतो, तुम्ही कोणत्या गटात याल?-५००० ज्यांनी केवळ विश्वास ठेवला, ५०० जे त्याच्या मागे चालले व तारणाऱ्याकडून जे ते शिकत होते ते त्यांनी त्यांच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला किंवा १२ ज्यांनी तारणाऱ्याचे जीवन व सेवाकार्यात पूर्णपणे स्वतःची ओळख करून घेतली होती?
प्रभु येशूने आपल्या प्रत्येकाला त्याच्याबरोबर योग्य ओळख मध्ये चालण्यास बोलाविले आहे. "अशा प्रकारे ओळखले जाते की आपण त्याच्यामध्ये आहोत, जो कोणी त्याच्या बरोबर चालण्याचा दावा करतो त्याने तो जसा चालला तसे चालले पाहिजे. (१ योहान २:५ब-६) खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे हे सार आहे; हा एक अध्यात्मिक प्रवास आहे जो आपल्याला ख्रिस्तामधील आपल्या दैवी ओळखीस, आणि त्याच्याबरोबरच्या घनिष्ठ एकात्मतेच्या केवळ विश्वासाच्याही पलीकडे घेऊन जाण्यास स्वीकारण्यास प्रवृत्त करतो.
ख्रिस्तासोबत ओळखले जाणारे जीवन जगणे हे आंतरिक परिवर्तन आणते जे बाह्यपणे प्रज्वलित होते. जसे प्रेषित पौल म्हणतो, "म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे." (२ करिंथ ५:१७)
Bible Reading: Psalms 2-10
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने मला नफा मिळवायला शिकव. मी ज्या मार्गाने जावे त्या मार्गाने मला घेऊन जा (यशया ४८:१७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● चेतावणीकडे लक्ष दया● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● धैर्यवान राहा
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● ख्रिस्ता समान होणे
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● येशूने गाढवावर स्वारी का केली?
टिप्पण्या
