डेली मन्ना
तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
Sunday, 31st of March 2024
31
20
720
Categories :
उद्देश
वास्तवात, आपण सर्व जण अनेक चुका करतो. कारण, जर आपण आपली जीभ ताब्यात ठेवू शकलो, तर आपण सिद्ध होऊ, व आपल्या स्वतःला इतर सर्व मार्गात संयमित ठेवू शकू.
घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवितो. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरविली जातात. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठया गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठया रानाला पेटविते! (याकोब ३:३-५)
वरील वचन आपल्या जीवनाला तारवे जेमहासागरावर वाहतात त्याशी तुलना करते, जे मोठया वाऱ्याने हेलकावे खातात.
याकोब, जो प्रेषित,स्पष्ट करतो कीआपण आपल्या तारवांना त्यांच्या मुक्कामाच्याठिकाणी निर्देशित करू शकतो.
प्रेषित याकोब पाच गोष्टींचा उल्लेख करतो:
- तारू- ते म्हणजे आपले जीवन
- नावाडी- ते म्हणजे आपला आंतरिक मनुष्य
- प्रचंड वारा- ते जीवनाच्या घडामोडी व परिस्थिती आहेत
- सुकाणू- ते म्हणजे आपली जीभ
- महासागर – ते म्हणजे स्वयं जीवन
तीन मुलभूत सत्य जे आपल्याला आपल्यामुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यास साहाय्य करू शकतात ते:
- तुम्ही व मी हे देवाने-दिलेल्या शक्तीने परिपूर्ण आहोत
- प्रबळ शक्ति जे तुमच्या जीवनाला कदाचित नियंत्रित ठेवून त्यास वळविण्याचा प्रयत्न करतील
- तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य दिशेमध्ये नेऊ शकता
- तुम्ही व मी देवाने-दिलेल्या शक्तीने परिपूर्ण आहोत
प्रभु येशूने अंतिम किंमत भरली आहे व तुमच्या मध्ये अधिक निवेश केला आहे (इफिस ४:८ वाचा). तुम्ही एकमेव आहात व तुमच्या आत वरदान व कौशल्ये आहेत. तुम्ही एखाद्या मालवाहू जहाज प्रमाणे आहात जे एका मिशन साठी पूर्णपणे भरलेले आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, तुम्हाला व मला देवाच्यागौरवाकरिता व ते जे आपल्या भोवती आहेत त्यांच्या लाभासाठीहे शोधणे, शुद्ध करणे, वती वरदाने वापरावयाची आहेत.
विचित्र शक्ति तुमच्या जीवनावर नियंत्रण करणे व त्यास वळविण्याचा प्रयत्न करतील
ख्रिस्ती असणे याचा अर्थ असा नाही की आपण वादळातून जाणार नाही. कोणतीही शिकवण जी तुम्हाला सांगते की जर तुम्ही येशू वर विश्वास ठेवता व त्याच्याबरोबर चालता, ते तुमच्यासाठी फुलांवर चालणे असे असेल हे खोटे आहे. अनेक वेळा ह्या शक्ति ज्या तुमच्या विरोधात येतात त्यांस कदाचित स्वाभाविक किंवा तर्कमय कारण नसेल. हेच तर कारण आहे की मी त्यास विचित्र शक्ति म्हणत आहे.
एके दिवशी शिष्य येशू सोबत तारवात होते, व अचानक एक वादळ उठले व असे दिसत होते की ते त्यांना बुडवीत आहे.
मनोरंजक गोष्ट ही आहे की हा प्रवास स्वयं प्रभूच्या आदेशाने सुरु केला होता: "चला आपण पलीकडे जाऊ या" (मार्क ४:३५). शिष्यांनी पूर्ण आज्ञाधारकपणे प्रत्युत्तर दिले. शिष्यहे मोठया आश्चर्यात असतील जसे आपल्यापैकी अनेक असतात, "जर आपण प्रभूची आज्ञा मानतो, तर मग आम्ही ह्या गंभीर वादळातून का जात आहोत?" कधीकधी वादळे ज्यास आपण तोंड देतो आज्ञापालन करून ते सामान्य वादळापेक्षा मोठे असतात.
महत्वाची गोष्ट ही की वादळात आपण धैर्य सोडू नये. मागे जितके आपण येशूच्या मागे चाललो नसेल त्यापेक्षा अधिक येशूच्या घनिष्ठते मध्ये चालले पाहिजे. मनोरंजक गोष्ट ही आहे की वादळाच्या आवाजाने येशूला उठविले नाही परंतु ही शिष्यांची ओरड होती जिने येशूला उठविले. त्याच्याकडे प्रार्थने मध्ये हाक मारा.
३. तुम्ही तुमच्या जीवनास योग्य दिशे मध्ये नेऊ शकता
तुमचे जीवन हे एका तारवा प्रमाणे आहे, आणि देवाने तुम्हाला त्याचा नावाडी असे नियुक्त केले आहे. कोणतेही तारू त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी असेच सहज येत नाही. तेथे नेहमीच एक नावाडी असतो जो त्यास तेथे दिशा देत नेतो.
प्रचंड व वादळी वाऱ्याच्या मध्य, नावाडीला कोठे जात आहे हे ठाऊक असले पाहिजे व तेथे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तीन गोष्टी तुम्हाला साहाय्य करतील कीतुमच्या तारवास दिशा देत न्यावे.
- दृष्टांत
- आशा
- पापकबुली
४० दिवसांची बायबल वाचन योजना
प्रेषितांचीं कृत्यें ३-९
अंगीकार
ख्रिस्ता मध्ये मी एक नवीन सृष्टि आहे; जुने ते होऊन गेले आहे; पाहा, सर्व नवे झाले आहे. ख्रिस्तामधील माझा उद्देश मी पूर्ण करीन. (२ करिंथ ५:१७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे● तुमच्या संपूर्ण सामर्थ्यापर्यंत पोहचा
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● सात-पदरी आशीर्वाद
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?
● ते लहान तारणारे आहेत
● नवीन तुम्ही
टिप्पण्या