डेली मन्ना
दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
Saturday, 13th of April 2024
31
20
998
Categories :
दैवी भेट
यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारे वर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. (उत्पत्ति २१:१)
पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वराने सारा ची भेट घेतली. सारा च्या जीवनात परमेश्वराची ही दैवी भेट होती. परमेश्वर व्यक्तीच्या जीवनात काही निश्चित घटना रचतो जेथे तो त्याच्या लोकांना भेट देतो. तुम्हाला व मला असे क्षण ओळखण्याची गरज आहे. प्रभु येशूने जेव्हा इस्राएल मध्ये त्याच्या लोकांची भेट घेतली, शोकांतिका ही आहे की त्याच्या भेटीच्या वेळेची त्यांना ओळख नव्हती. तो त्याच्या स्वतःच्या लोकांकडे आला व त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्यास ओळखले नाही व त्याचा स्वीकार केला नाही.
सत्य हे आहे की आपण प्रभु जवळ येऊ शकत नाही जोपर्यंत पिता त्याच्या पवित्र आत्म्या द्वारे आपल्याला आकर्षित करीत नाही. जेव्हा तुम्ही उपासनेला जाता, मध्यस्थी करता किंवा तुमच्या व्यक्तिगत प्रार्थनेच्या वेळी सुद्धा ह्या वास्तविकतेला समजण्यास शिकावे की तुम्ही त्या ठिकाणी पित्याच्या इच्छेमुळे आहात. ते दैवी योजनेमुळे आहे. अशा प्रकारेच तुम्ही स्वतःला प्रभूच्या दैवी भेटी साठी तयार करता.
"मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तूं, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आतां त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेंढेकोट उभारतील व तुला वेढितील तुझा चहूकडून कोंडमारा करितील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टि केल्याचा समय तूं ओळखला नाहीस." (लूक १९:४१-४४)
परमेश्वराची त्याच्या लोकांसाठी योजना ही नेहमीच विनाशापेक्षा संरक्षण, आजारापेक्षा आरोग्य, उध्वस्तपणा पेक्षा पुरवठा ही आहे. तथापि, आपल्याला वेळ ओळखण्याची गरज आहे, जेव्हा परमेश्वर आपल्या समस्यांची उत्तरे व ते ज्ञान जे विनाशापासून वाचविते त्यासह आपल्याला भेट देतो.
पवित्र शास्त्र सांगते की, "जसे परमेश्वराने सारा साठी केले जेव्हा तो बोलला". एक प्रकटीकरण हे नेहमीच भेटी नंतर येते. मला विश्वास आहे की सारा ने परमेश्वरापासूनच्या भेटीच्या क्षणाला ओळखले आणि परमेश्वराने ते प्रकटीकरण असे बदलले. तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी मोठे व्हावे असे पाहावयाचे असेल तर मग परमेश्वरापासून भेटीची इच्छा करा. तुमचे जीवन हे पुन्हा तसेच राहणार नाही.
प्रार्थना
पित्या, माझे डोळे उघड की माझ्या जीवनात तुझ्या भेटीच्या क्षणाला ओळखावे. मला समज दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सार्वकालिक निवेश● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● तुमच्या पडीक जमिनीस नांगरा
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या