येथे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रोत्साहन देतात, परंतु एक सर्वात सामर्थ्यशाली प्रोत्साहन देणारे हे भीति आहे. परंतु काय भीति ही चांगली प्रोत्साहन देणारी आहे? आणि काय हे आवश्यक आहे की लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी भीतीचा वापर करावा?
"अग्नि व गारा" यावर संदेश देणे हे कदाचित लोकांना प्रथम पळावयास लावेल परंतु, मग लांबच्या पल्ल्यामध्ये, ते प्रत्यक्षात लोकांना परिपक्व होण्यास कारणीभूत होत नाही. ते केवळ त्यावर लक्ष ठेवून आहे भीतीच्या घटकामुळे.
आई-वडील या नात्याने मी व अनिता नेहमी आवाहनांचा सामना करतो जसे इतर आई-वडील करीत आहेत. तथापि, नुकतेच देवाच्या आत्म्या द्वारे आम्हांवर काय छाप पडली की लांबच्या पल्ल्यामध्ये जर आम्ही आमच्या लेकरांनी चांगली निवड करावी हे पाहत असतो, भीति ही प्रत्यक्षात कार्य करीत नाही.
जर आपण आपल्या लेकरांना केवळ भीतीच्या आधारावर सीमित करीत राहतो, शेवटी ती भीति ही निघून जाते. त्यातच भर म्हणून मानवी स्वभाव हा नेहमी उत्सुक राहतो की तेच प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करावा जे आपल्याला करण्यास सांगितलेले नाही. उदाहरणार्थ: लेकरांना सांगावे की गरम इस्त्री ला हात लावू नये, तो किंवा ती शेवटी जातील व त्यास स्पर्श करतील. मला आशा आहे की तुम्ही समजत आहात जे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?
याउलट, ज्ञान हे भीति पेक्षा उत्तम प्रोत्साहन देणारे आहे. जेव्हा मी चर्च किंवा माझ्या लेकरांना सुद्धा शिकवितो, मी प्रयत्न करतो व केंद्रित राहतो की एखादी विशेष गोष्ट का करण्याची गरज आहे. मी हे पाहतो की जरी यास काही वेळ व प्रयत्न लागतात, लोक हे सहसा ऐकत असतात जेव्हा ते स्वतः त्यास पाहत असतात. भीति ही कदाचित अल्पकाळात काही लाभ देईल परंतु ज्ञान हे नेहमीच दीर्घकालीन व टिकणारे लाभ देते.
भीति याउलट व्यक्तीचा छळ करते आणि नेहमी धिक्कार आणते. तसेच, जेव्हा आपण भीति ही प्रोत्साहनपर अशी वापरतो, लोक तुमच्या मार्गदर्शनानुसार चालतील जोपर्यंत तुम्ही लक्ष देऊन आहात, पण एकदा की तुम्ही तेथून निघून गेलात तेव्हा ते पुन्हा एकदा जे त्यांस महत्वाचे वाटते त्याकडे गेलेले असतात.
२ तीमथ्यी १:७ आपल्याला सुवार्ता सांगते की एक ख्रिस्ती म्हणून, तुम्हांला व मला भीतीचा आत्मा हा दिलेला नाही परंतु सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. १ योहान ४:१८ म्हणते की, "पूर्ण प्रीति भीति घालवून देते." जितके अधिक तुम्ही देवाची प्रीति व त्याच्या पुरवठ्यावर केंद्रित असाल, तितकेच उत्तमरित्या तुम्ही भीतीवर वर्चस्व करण्यास समर्थ व्हाल.
पवित्र शास्त्र सांगते, "देवावर-प्रीति करणारे उत्तम सल्लागार बनवितात. त्यांच्या शब्दात ज्ञान असते, आणि ते योग्य व भरवसा करण्याजोगे असते" (स्तोत्र ३७:३०). जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीचा पाठपुरावा करता, दैवी ज्ञान हे तुमच्यामध्ये कार्य करण्यास सुरु करेल; अशा ज्ञानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
अंगीकार
परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. भीति माझ्यावर वर्चस्व करू शकत नाही, कारण परमेश्वर स्वतः माझ्या जीवनाचे सामर्थ्य आहे. मी येथूनपुढे भिणार नाही. येशूच्या नांवात. (स्तोत्र २७:१)
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)● कृतज्ञतेसाठी एक धडा
● मोठी कार्ये
● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● धैर्यवान राहा
टिप्पण्या