डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस १४
Saturday, 25th of December 2021
41
10
3392
Categories :
उपास व प्रार्थना
देश व शहर
तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुति करावी; राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. (१ तीमथ्यी २:१-४)
जेव्हा तुम्ही आपला तारणारा परमेश्वर याच्यासमोर काहीतरी चांगले व स्वीकारावयास योग्य असे करता, तेव्हा तुम्ही परमेश्वराचे एक घनिष्ठ मित्र आहात. मला हे कसे ठाऊक आहे? प्रभु येशूने म्हटले, "मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा" (योहान १५:१४).
तसेच बायबल आपल्याला आदेश देते, "ज्या नगरात मी तुम्हाला ठेवले आहे त्यात शांति व संपन्नता व्हावी असे पाहा ......त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा, कारण जर त्याची वृद्धि झाली तर तुमची सुद्धा वृद्धि होईल" (यिर्मया २९:७). तुम्ही पाहा, जेव्हा तुम्ही देश व शहरासाठी प्रार्थना करता ज्यामध्ये तुम्ही राहत आहात, तुम्ही व तुमचे प्रियजन सुद्धा संपन्न होतील.
पश्चाताप करा
जर तुम्ही तुमचा देश किंवा नगर याबाबतीत वाईट बोलले आहे किंवा ह्या सवयीत असाल की त्याच्या विरोधात वाईट बोलत राहावे, तर मग तुम्ही प्रभूला विनंती करा की तुम्हाला क्षमा करावी. (ह्यावर काही वेळ घालवा)
मननासाठी पवित्र शास्त्र वचन
स्तोत्रसंहिता ३३:१२
यशया २:४
प्रकटीकरण २२:२
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र जोपर्यंत तुमच्या हृदयातून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (ते वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा, आणि प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह ते कमीत कमी १ मिनीट करा.)
पित्या, आम्ही तुला विनंती करतो की भारत देशाच्या पुढाऱ्यांच्या हृद्य व मनाला योग्य दिशा दे (तुमच्या देशाचे नाव घ्या) की ते निर्णय घ्यावेत जे देशाला तुझ्या मार्गात व तुझ्या वचनानुसार मार्गदर्शन करेल. येशूच्या नांवात.
पित्या, ह्या भारत देशात तुझे राज्य येवो, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. येशूच्या नांवात.
पित्या, भारत देश तुझ्या शुभवर्तमानासाठी जागरूक होवो. येशूच्या नांवात. (योएल ३:१२)
असे होवो की भारताने प्रभूची वाणी ऐकावी. येशूच्या नांवात. (यशया १:२)
पित्या, भारत देशाला भ्रष्टाचारच्या बंधनातून मुक्त करून देवाच्या लेकरांच्या गौरवी स्वतंत्रते मध्ये आण. (रोम ८:२१)
पित्या, भारत देशावर तुझ्या सत्याचा आत्मा पाठिव की तुझी साक्ष दयावी, येशूच्या नांवात. (योहान १५:२६)
पित्या, भारत देशावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर, आणि भारत देशाला पाप, धार्मिकता आणि न्यायाविषयी दोषी ठरव. (योहान १६:८)
पित्या, भारत देशाला त्यांच्या मुर्त्या, व मनुष्यरचित तत्वज्ञानापासून पश्चाताप करावा आणि त्यापासून मागे वळावे असे कर. (यहेज्केल १४:६)
पित्या, तुझ्या लोकांना संपूर्ण भारत भर उभारून यावे असे कर. येशूच्या नांवात. (गणना २३:२४)
पित्या, तुझे राजदूत भारतामधून जगाच्या सर्व देशांमध्ये पाठिव. (यिर्मया ४९:१४)
पित्या, असे होवो की भारत देशातील प्रत्येक जीभ आणि प्रत्येक गुडघा हा टेकला जावा आणि त्याने ही कबुली दयावी की येशू हा प्रभू आहे. (फिलिप्पै २:१०-११)
पित्या, असे होवो की भारत देश हा प्रभूच्या गौरवाच्या ज्ञानासह भरला जावा, जसे पाणी समुद्र व्यापून राहते. येशूच्या नांवात. (इब्री २:१४)
पित्या, असे होवो की भारत देशातील तुझ्या लोकांद्वारे सर्व देश हे आशीर्वादित होवो. येशूच्या नांवात. (गलती ३:८)
प्रार्थनेचे तेच मुद्दे पुन्हा म्हणा, आता देशा ऐवजी तुमच्या नगराचे नाव घ्या.
ह्या प्रार्थनांच्या उत्तरा बद्दल प्रभूला स्तुती आणि धन्यवाद दया.
शुभेच्छा
एक परिपूर्ण जो अशा अपूर्ण जगात तुमच्या आणि माझ्यासाठी आला.
तोच केवळ ह्या उत्सवासाठी कारण आहे.
माझे कुटुंब आणि माझ्याकडून आपणां सर्वांना आशीर्वादाचा आणि आत्म्याने-भरलेला असा हा नाताळ २०२१ व्हावा.
जगा साठी आनंद, कारण प्रभू आला आहे...(गीत गा)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?
● संबंधामध्ये आदराचा नियम
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● प्रार्थनारहित जीवन जगण्याचे पाप
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
टिप्पण्या