english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते
डेली मन्ना

शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते

Saturday, 1st of February 2025
24 19 340
Categories : एस्तेरचे रहस्य: मालिका परिपक्वता
"परदेशीय लोक गलित झाले, ते आपल्या कोटातून कांपत कांपत बाहेर आले." (स्तोत्र. १८:४५)

मी एकदा वाचले की जुलमी हिटलर आणि नाझी एकाग्रता शिबिराच्या सेनापतींनाही एस्तेरच्या पुस्तकाच्या सामर्थ्याची भीति वाटत होती. हे असे लोक होते ज्यांना मानवी जीवनाची पर्वा नव्हती, तरीही, त्यांना त्याच्या लोकांसाठी देवाच्या हस्तक्षेप शक्तीच्या सामर्थ्याची भीति वाटत होती. वास्तवात, त्यांना इतकी भीति वाटली होती की त्यांनी त्यांच्या मृत्यू शिबिरांमध्ये त्यावर बंदी घातली. एस्तेरच्या पुस्तकामधील घटनेची पुनरावृत्ती होण्याविषयी ते घाबरत होते, जेथे देवाच्या लोकांना सोडविण्यात आले होते, आणि शत्रूची योजना उलथून टाकली होती.

हे सरळपणे मला सांगते की दुष्टता ही अजूनही एस्तेरच्या कथेला आज देखील घाबरते कारण ते मनुष्यामध्ये दडलेले ईश्वरत्व प्रकट करते. २ करिंथ. ४:७ काय म्हणते त्याकडे पाहू, "ही आमची संपत्ति मातीच्या भांडयात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी [असामान्य, परिवर्तीत] देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे." हे अद्भुत वचन आहे.

सैतानाला ठाऊक आहे की आज तुमचा अशक्तपणा हा शेवट नाही. त्यास ठाऊक आहे की तुमच्यामधील बलाढय योग्य वेळ उद्भवण्याची वाट पाहत आहे. तुमच्या व माझ्यासाठी प्रभु येशूने जे वधस्तंभावर केले त्यामुळे, परमेश्वर आपल्याला कृपेच्या दृष्टीकोनातून पाहतो. आणि म्हणून तो कृपेवर कृपा पुरवितो की मानवी अशक्तपणा आणि अपयशावर विजय मिळवावा, आपले स्थान आणि पद स्वर्गातील त्याच्या सिंहासनापर्यंत उंच करावे.

बहुतेक वेळा आव्हान हे आहे की आपल्याला शत्रूची भीति दिसत नाही. बायबल म्हणते की, तो एका गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो" (१ पेत्र. ५:८). तो एका सिंहासारखा नाही जसे आपण अनुमान लावतो आणि पळतो; तो केवळ तसे सोंग घेणारा आहे. मुलांच्या पार्ट्यांमध्ये लोक मिकी माऊसचे वेगवेगळे पोषाख कसे घालतात हे तुम्हांला ठाऊक आहे काय? होय, सैतान तेच करतो. तो केवळ पोषाख घालीत आहे की तुम्हांला भीति दाखवावी. तो पराभूत शत्रूशिवाय काहीही नाही.

स्तोत्र. १८:४३-४५ मध्ये दावीद राजाने लिहिले, "लोकांच्या बखेड्यांपासून तूं मला मुक्त केले; तूं मला राष्ट्रांचा प्रमुख केले; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. परदेशीय लोक गलित झाले, ते आपल्या कोटातून कांपत कांपत बाहेर आले.

एस्तेर ही कधी काळी एक कमकुवत लहान तरुण मुलगी होती जी प्रसिद्ध नव्हती किंवा तिच्याबद्दल ऐकले नव्हते. ज्याक्षणी ती राणी झाली, सर्व काही वाईट होत होते. पण का? तिने कोणाचा अपमान करावा असे काहीही केलेले नव्हते, तर मग हे सर्व वाद कशासाठी? हामानास अचानकपणे धमकावण्यास सुरु झाले होते. मला आश्चर्य वाटते की, तो असुरक्षित का होता. ती एक राणी आहे, आणि तो राजाचा मुख्य सल्लागार. हामान हा राणी होऊ शकत नव्हता, तर विषय काय होता?"

कदाचित तुम्ही सुद्धा तोच विचार करीत आहात? ही सर्व आव्हाने माझ्यासमोर का आहेत? मी दुर्दैवी आहे असे का दिसत आहे, आणि माझ्यावर कृपा होण्यासारखे काहीही घडतांना का दिसत नाही? मला या भावना का आहेत की देव माझ्यावर रागावलेला आहे किंवा मला या आव्हानांमधून जाताना त्याने पाहत राहावे असे कोणते इतर कारण करू शकते. माझ्या मित्रा, हे तुमच्याबद्दल नाही, हा तो शत्रू आहे जो तुम्हांला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तो तुमच्या भविष्यातील परिवर्तनाबद्दल घाबरलेला आहे.

हेरोद राजा देखील येशूच्या परिवर्तनाबद्दल घाबरलेला होता; एक लहान असहाय्य मुलगा असून देखील, त्याने त्याच्या वयाच्या आसपास असलेल्या सर्व मुलांची कत्तल करण्याची आज्ञा दिली. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जुलमी "राजाच्या" हाती अडकलेला असे तुम्हाला वाटत असेन. कदाचित हा देहाचा विषय असेन इत्यादी. परंतु मी विश्वास ठेवतो हे प्रकटीकरण तुमच्याकडे या हंगामात एका कारणासाठी येत आहे.

एस्तेरचे प्रकटीकरण तुमचा सांभाळ करू शकते, होय, पण ते तुम्हाला देखील "सादर" करू शकते आणि तुमचे भविष्य बदलू शकते. एस्तेरची कथा ही शत्रूच्या योजनांची पुढे होणाऱ्या विनाशाची भविष्यवाणी आहे. परंतु ही तुमच्या दैवी परिवर्तनाची आणि तुमच्या बढतीची भविष्यवाणी देखील असू शकते. तुमचे भविष्य हे सुरक्षित आहे, म्हणून धीर धरा आणि सैतानाची मागणी आणि दबावाच्या अधीन होऊ नका.

Bible Reading: Exodus 39-40
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी तुझे आभार मानतो की मी विजय मिळविणाऱ्यापेक्षा मोठा आहे. मी तुझे आभार मानतो की कारण तूं सर्व काही माझ्यासाठी केले आहे. मी प्रार्थना करतो की तूं मला तुझ्यामध्ये दृढ राहण्यास साहाय्य कर. मी फर्मान काढत आहे की सैतान माझ्यावर जीवनावर विजय मिळवू शकणार नाही. मी सर्व प्रसंगी विजय मिळवील. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
● परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● महानतेचे बीज
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● अत्यंत वाढणारा विश्वास
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन