डेली मन्ना
25
18
623
पहाडीव दरी यांचा परमेश्वर
Wednesday, 3rd of July 2024
Categories :
ख्रिस्ताची देवता
जुन्या करारात, देवाच्या लोकांच्या शत्रूंनी युद्धाच्या योजनेत गंभीर चुक केली होती. इस्राएल बरोबर युद्धात पराभूत झाल्यानंतर, अराम च्या राजाच्या सल्लागार ने म्हटले, "त्यांचा देव पहाडी देव आहे; म्हणूनच आम्हांवर त्यांचे प्राबल्य झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आमचे त्यांच्यावर प्राबल्य खात्रीने होईल." (१ राजे २०:२३)
युद्धाची नवीन नीति वापरून जेव्हा ते आक्रमणाच्या तयारीत होते, परमेश्वराकडे त्यांच्यासाठी एक आश्चर्य ठेवले होते: "तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही असे अरामी लोक म्हणाले आहेत, यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांस जाणीव होईल." (१ राजे २०:२८)
अरामी लोकांची कल्पना होती की इस्राएली परमेश्वर हा "सपाटीचा" देव आहे; की त्यास त्याच्या लोकांना सोडविण्यास अडचण येऊ शकते. त्यांनी विचार केला की हा परमेश्वर हा केवळ पहाडी परमेश्वर आहे. परंतु परमेश्वराला पाहिजे की आपण जाणावे की तो पहाडी, सपाटी व दरी यांचा परमेश्वर आहे.
पर्वत हे परमेश्वराद्वारे जेव्हा भेट व प्रकटीकरण करावयाचे आहे तेव्हा वापरले आहे जेव्हा त्याचे गौरव हे विशेषरित्या प्रदर्शित केले गेले आहे. पर्वत आपल्या जीवनात चांगल्या वेळेस सादर करते, त्या घटना व अनुभव ज्या आपल्याला समर्थ करतात व देवाच्या योजनेत आपल्याला प्रेरणा देतात.
परंतु आपण जेव्हा अत्युच्च शिखरावर आहोत तेव्हाच केवळ परमेश्वर आपल्याबरोबर असतनाही. तो सपाटीचा परमेश्वर सुद्धा आहे. सपाटी त्यास संबोधित करते ज्यास आपण नित्याचे, सामान्य, दररोजच्या जीवनाच्या घडामोडी असे पाहतो.
परमेश्वराने आपल्यावर इतकी प्रीति केलीकी त्याने स्वतःला त्या गौरवापासून अलिप्त केले आणि खाली आपल्या दरी मध्ये मनुष्य म्हणून आला. तो आपल्या ठिकाणी मरण पावला आणि त्याचा विजय आपल्याशी सहभागी केला.
याची पर्वा नाही की तुम्ही आता कशा परिस्थितीमधून जात आहात, मला हे पाहिजे की तुम्ही हे जाणावे की तो केवळ पहाडी परमेश्वर नाही परंतु तोपहाडी, सपाटी व दरी यांचा परमेश्वर आहे. तो आमच्या जीवनाच्या सर्व वेळेला व सर्व ऋतू मध्ये आपला परमेश्वर आहे.
अंगीकार
जरी मी मृत्युच्छायेच्या दरीतून जात असलो, मी भिणार नाही; कारण तूं मजबरोबर आहेस; तुझी आंकडी व काठी मला धीर देतात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
● विश्वासाचे जीवन
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● ते व्यवस्थित करा
● परिवर्तनाची किंमत
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
टिप्पण्या