डेली मन्ना
एक आदर्श व्हा
Monday, 26th of April 2021
20
15
1229
Categories :
आत्मपरीक्षण
खरा साक्षीदार
अनेक वेळेला, लोकांनी इतर प्रश्ने स्वतःहून सोडविण्याअगोदर त्यांना एका विशेष विषयावर उदाहरणे दिली जातात जेव्हा शिक्षक उदाहरणे वापरण्यास स्पष्ट करतो, तेव्हा ते उत्तरे मिळविण्यासाठी ज्या पद्धती व कार्यपद्धती वापरल्या आहेत त्याविषयी ते अधिक सतर्क असतात. त्यानंतर, जे काही बाकी आहे ते सोडविण्यासाठी ते स्वतःवरच अवलंबून असतात.
उदाहरणांद्वारे कोणाच्याही साहाय्याशिवाय ते सारख्याच समस्या सोडविण्यात समर्थ होतात. तुमच्या सभोवतालचे लोक जीवनाच्या जिवंत-उदाहरणा साठी पाहत आहेत; म्हणजे ते त्याच्यापासून शिकू शकतील. तुम्ही कधी अशा परिस्थितीत आला होता काय जेव्हा कोणाला तरी जसे तुम्ही केले आहे तसे करण्यास पाहिजे होते? हा तो कोणीतरी असू शकतो, ज्यास पाहिजे की जसे तुम्ही वागला आहात, तसे वागावे, जसे तुम्ही हसता तसे करावे, आणि तुम्ही कसे बोलता तसे बोलावे? जेव्हा हे तुमच्या स्वतःची खुशामत होत आहे असे दिसते जेव्हा तुम्ही हे जाणता की कोणाला तरी तुमचे अनुकरण करावयास पाहिजे आहे, ती एक मुख्य जबाबदारी सुद्धा होऊ शकते. मी एकदा कार च्या बम्पर वरील स्टीकर पाहिले जे म्हणत होते, "माझे अनुकरण करू नका, मी सुद्धा चुकलो आहे". दुर्दैवाने, ह्या जगाचे व अनेक प्रतिष्ठित ख्रिस्ती लोकांचे सुद्धा तसेच दयनीय व्यवहार झालेले आहेत.
ख्रिस्ती म्हणून तुम्हाला व मला एक आदर्श होण्यासाठी बोलाविले गेले आहे, अनुकरण करण्यास पात्र अशी जीवनशैली जगावे. आपली कृत्ये, आपले बोलणे, लोकांना गर्वाने प्रगट करते की आपण एका अशा गौरवी कुटुंबाचे आहोत ज्याचा परमेश्वर हा आमचा पिता आहे. याची पर्वा नाही की तुमचे वय हे किती आहे-तो फक्त एक आंकडा आहे. प्रेषित पौलाने तीमथ्यीला लिहिले ज्यास तो प्रशिक्षण देत होता. "कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीति, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो." (१ तीमथ्यी ४:१२)
ईश्वरीय आदर्श होणे हा काही पर्याय नाही, पवित्र शास्त्रा मध्ये त्याचा आदेश दिला आहे. प्रेषित पौलाने तीताला लिहिले, "सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखीव, शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे; ह्यासाठी की, विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी." (तीताला पत्र २:७-८)
तीत ला ख्रिस्ती असण्यापेक्षा अधिक असले पाहिजे होते, त्यास एक आदर्श, एक पद्धत, सुद्धा असावयाचे होते. आपण आपले कुटुंब, आपले नातेवाईक व आपल्या सभोवती राहणाऱ्या लोकांना प्रभावित करण्याचा एक मार्ग हा, ज्यावर आपण विश्वास ठेवण्याचा दावा करतो तसा आदर्श होणे होय. हे सामर्थ्यशाली आहे आणि तरीही मुलभूत सिद्धांत ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. एक आदर्श व्हा!
प्रार्थना
पित्या, मी तुला धन्यवाद देतो, कारण तूं नेहमीच माझे ऐकतो. बोलणे व कृती मध्ये मला इतरांसाठी एक सामर्थ्यशाली आदर्श कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● याची प्रत्यक्ष पर्वा आहे काय?
● ते व्यवस्थित करा
● तुमचा हेतू काय आहे?
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● येथून पुढे अस्थिरता नाही
टिप्पण्या