देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? (गणना २३:१९)
"केवळ तुमच्या हृदयाचे ऐका", "जर मनाला पटते तर ते करा" लेकरांची व्यंगचित्रे ते ऐहिक गीते ते सिनेमे, आपणांवर असे संदेश सतत घोंघावत असतात. आज ज्या समाजात आपण राहत आहोत ते आपल्याला अत्यंत प्रोत्साहन देते व या वास्तविकतेवर भर देते की आपल्या मनाला काय पटते त्या आधारावर आपल्याला आपल्या निवडी व जीवनाचे निर्णय घ्यावयाचे आहेत.
ज्यावेळेस हे सर्व फारच उत्तम व प्रेरणादायी असे दिसते, त्याचवेळेस अशी विचार-धारणा आत्मसात करणे ही आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी विनाशकारी होऊ शकते. बायबल आपल्याला इशारा देते, "हृद्य सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?" (यिर्मया १७:९)
आपण जेव्हा आपली मनोवृत्ती व आपल्या भावनांना आपल्यावर प्रभुत्व करू देतो, तेव्हा आपण अनेक अज्ञानी, अधार्मिक, स्वयं-केंद्रित निर्णय घेऊ लागतो-आणि मग आपल्या जीवनास अस्तव्यस्त करून टाकतो. आपल्या हृदयाचेच केवळ ऐकणे हे समर्पण करण्याऐवजी स्वार्थीपणाच्या आचरणास जोपासते.
आपण ख्रिस्ताचे करारबद्ध-सेवक होऊ शकत नाही, जर आपण आपली मनोवृत्ती व आपल्या भावना द्वारे नियंत्रित राहिलो. याकोब १:६-८ हे स्पष्टपणे त्या मनुष्याविषयी वर्णन करते जो त्याच्या जीवनात पूर्णपणे त्याची मनोवृत्ती व भावनेद्वारे मार्गदर्शित होता. "पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये."
एक व्यक्ति जो त्याची मनोवृत्ती व भावने द्वारे मार्गदर्शित होतो, तो कधीही स्थिरता प्राप्त करणार नाही. तर मग काय उपाय आहे? ते जे स्वतःमध्येच भरवसा ठेवतात ते मूर्ख आहेत, पण ते जे ज्ञानात चालतात त्यांस सुरक्षित राखले जाते. (नीतिसूत्रे २८:२६) आजपासून, देवाच्या ज्ञानात (जे त्याचे वचन आहे) चालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा.
तुमचे जीवन आशीर्वादित होईल, आणि लवकरच, तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद व्हाल.

प्रार्थना
हे प्रभु, मला तुझ्या धार्मिकतेमध्ये मार्गदर्शन कर; तुझे मार्ग मजसमोर सरळ कर. येशूच्या नावात. (स्तोत्र. ५:८ वर आधारित)
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● ही एक गोष्ट करा
● प्रार्थनाहीनता दुतांच्या कार्यास अडथळा आणते
टिप्पण्या