डेली मन्ना
23
15
182
युद्धासाठी प्रशिक्षण-१
Monday, 14th of April 2025
Categories :
आध्यात्मिक युद्ध
तयारी
"१दावीद सिकलाग येथे किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने लपून राहत होता त्या समयी जे त्याजकडे आले व ज्यांनी त्यास युद्धात कुमक केले ते शूर वीर हे: २ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते." (१ इतिहास १२:१-२)
दाविदाच्या मागे आलेल्या लोकांचे एक मुख्य वैशिष्ट्य हे युद्धामध्ये ते कुशल होते. उजव्याडाव्या हाताने दगड कसे प्रभावीपणे मारावे हे त्यांनी शिकले होते.
जर तुम्ही एखादा बॉल कधी फेकला असेन, तर तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या उजव्या हाताने तो अचूक कसा फेकावा हे सोपे होते, परंतु हे त्याहूनही अधिक आव्हानात्मक होते जेव्हा तुमचा डावा हात वापरून ते फेकावे. तथापि जे लोक दाविदाच्या मागे आले होते ते दोन्ही हाताने अचूकपणे फेकण्यात सक्षम होते! असे कौशल्य प्राप्त करण्यासाठी कदाचित महिनोमहिने प्रशिक्षण आणि सराव करावा लागला असेन.
१ करिंथ. ९:२५ मध्ये, प्रेषित पौल लिहितो, "स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो; ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो."
२०१६ दरम्यान, रिओ येथे ऑलिम्पिक खेळामध्ये, अमेरिकन स्पर्धक सायमन बाईल्सने चार वर्षे आठवड्याला सहा दिवस, अनेक तास सराव केला होता. तिच्या प्रशिक्षणामध्ये शक्ती व लवचिकपणा सामाविलेला होता, तसेच मानसिक तयारीचे तंत्र होते.
त्याचप्रमाणे, जमैका येथील धावपटू उसेन बोल्ट, ज्यास जगातील एक सर्वात महान धावपटू असे समजले जाते, त्याने सुद्धा एक कठोर प्रशिक्षण पद्धतीचे अनुसरण केले होते ज्यामध्ये तासंतास धावणे, वजन उचलणे, आणि त्याच्या शरीरास बरे करणे आणि बलशाली करण्यासाठी काही चांगला वेळ दिला होता.
ज्याप्रमाणे ऑलिम्पिक खेळात भाग घेणारा स्पर्धक त्यांच्या प्रशिक्षणात वेळ व प्रयत्न देत राहतो की त्यांचे सर्वात उत्तम ते करावे, त्याप्रमाणेच आपण आपल्या आध्यात्मिक प्रशिक्षणात वेळ दिला पाहिजे की आध्यात्मिक क्षेत्रात प्रभावी योद्धे व्हावे. जसे इब्री. १२:११ म्हणते, "कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते."
देवाचे वचन हे एखादया धारदार तरवारीसारखे आहे जे विलक्षण आरोग्य आणि सुटका आणू शकते जर कौशल्य आणि आध्यात्मिक अधिकाराने त्याचा वापर केला. तथापि, एखादया परिस्थितीसाठी योग्य वचन वापरण्यासाठी, आपल्याला वचनात गहन ज्ञान व आत्म्यात चालले पाहिजे.
याशिवाय, प्रत्येक समर्पित मध्यस्थी करणारा त्यांचे मन व इच्छेला तीव्रपणे केंद्रित करणे समजतो जेव्हा आध्यात्मिक युद्धात व्यस्त होतो. प्रभावी आध्यात्मिक योद्धे होण्यासाठी, आपल्याला आपली मने व इच्छांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे की लक्ष केंद्रित करावे जेणेकरून आपल्या प्रार्थना ह्या सामर्थ्यशाली शस्त्रे व्हावे जे लेजर प्रमाणे, आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करू शकेल.
आजच्या जगामध्ये, प्रभु येशू आपल्याला बोलावीत आहे की आध्यात्मिक युद्धामध्ये व्यस्त व्हावे आणि आपले प्रशिक्षण हे महत्वाचे आहे की विजय आणि यश प्राप्त करावे. आपल्याला वचनाचे गहन अध्ययन असले पाहिजे आणि त्यास कुशलतेने आणि हुशारीने वापरण्यास शिकावे. तसेच, आपल्याला प्रार्थनेमध्ये एकाग्र होणे आणि आध्यात्मिक ध्येयामध्ये केंद्रित होण्याची योग्यता विकसित करण्याची गरज आहे ज्यासाठी आपल्याला पाचारण झाले आहे.
चला आपण महान पुरुषांकडून प्रेरणा प्राप्त करावी जे दाविदामागे गेले, परिश्रमपूर्वक प्रशिक्षण घेतले की अंधाराच्या सामर्थ्याविरोधात त्यांच्या युद्धामध्ये अचूकपणे नेम धरावा!
Bible Reading: 2 Samuel 6-8
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, माझा खडक असण्यासाठी आणि युद्धासाठी माझ्या हाताना आणि लढाईसाठी माझ्या बोटांना प्रशिक्षण देण्यासाठी मी तुझे आभार मानतो.
जे युद्ध लढावे म्हणून तू मला बोलाविले आहे त्यामध्ये व्यस्त होण्यासाठी कृपा करून आध्यात्मिक कुशलता विकसित करण्यास मला साहाय्य कर.
मला शक्ती, ज्ञान व एकाग्रता दे की तुझे वचन कुशलतेने व प्रभावीपणे वापरावे म्हणजे मी तुझ्या राज्यासाठी शक्तिशाली योद्धा व्हावे. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो, आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● सुंदर दरवाजा● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● पैसे कशा साठी नाही
● कृपेवर कृपा
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे
● देव पुरस्कार देणारा आहे
टिप्पण्या