डेली मन्ना
23
17
358
परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
Saturday, 12th of July 2025
Categories :
भावनाएं
१ शमुवेल ३० मध्ये, छावणी मध्ये परत आल्यावर, दावीद आणि त्याच्या लोकांनी हे पाहिले की अमालेकी लोकांनी त्यांच्या छावणीवर छापा मारला होता आणि कोणालाही जिवंत न मारता त्यांच्या पत्नी आणि लेकरांना पकडून नेले होते.
जेव्हा दावीद आणि त्याच्या लोकांनी तो विनाश पाहिला आणि हे जाणले की त्यांच्या कुटुंबाला काय झाले आहे, तेव्हा ते हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही.
ह्या दु:खात भर म्हणून, त्याचे स्वतःचे लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. (१ शमुवेल ३०:६)
लक्षात घ्या की दाविदानेनिराशेने त्याचे मनोधैर्य खचू दिले नाही. त्याऐवजी त्याने स्वतःला परमेश्वरामध्ये प्रोत्साहित आणि समर्थ करू दिले. येथे अशी वेळ येईल कीतुम्हाला साहाय्य करण्यास, तुम्हांला धीर देण्यास तुमच्याभोवती कोणीही असणार नाही, हे त्या अशा वेळी अनेकजण हे पुन्हा कधीही न उभारण्यास पतन पावले आहेत. ही तुमची कथा असणार नाही. उठा! आणि प्रभू मध्ये स्वतःला प्रोत्साहित करा!
काय मनोरंजक आहे ते हे की जेव्हा दाविदाने स्वतःला परमेश्वरा मध्ये प्रोत्साहित केले, कदाचित त्याने त्याची वीणा हाती घेतली, एखादया एकांत ठिकाणी गेला असेन, आणि परमेश्वराला स्तुति आणि उपासनेचे गीत गाऊ लागला असेन. हे असे असू शकते की दाविदाला गीत गावेसे वाटत नसेन, पण तरीही त्याने तसे केले.
तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक परिस्थितींना अधिक मोठे करण्याचा नकार करा. त्याऐवजी, परमेश्वराला उंचवा. तुमचे हेडफोन लावा, काही उपासनेचे गीत वाजवा, आणि त्याच्या नावाला उंचवा. नाहीतर तुम्ही तुमचे बायबल उघडा आणि प्रोत्साहित करणारे बायबल भाग मोठयाने वाचा. तुमचा आत्मिक मनुष्य ती वाणी समजेल जे वचन बोलत आहे आणि तुमच्या आत्मिक मनुष्यात विश्वास निर्माण होईल. (रोम १०: १७)
देवाच्या एका महान मनुष्याने एकदा म्हटले, "जेव्हा तुम्ही देवाला उंचाविता, तुम्ही तुमच्या समस्या लहान करता." सामर्थ्यशालीआहे हो की नाही? अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःला परमेश्वरा मध्ये प्रोत्साहित करा. विजय हा लवकरच तुमचा असेल!
Bible Reading: Palms 134-142
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तूच केवळ माझी आशा आणि सामर्थ्य आहे. मी तुझ्यावर विसंबून राहतो हे जाणून की तूमला कधीही अपयशी होऊ देणार नाही. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दानधर्म करण्याची कृपा-२● निराशेवर मात कशी करावी
● तुलना करण्याचा सापळा
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
टिप्पण्या
